स्पर्धेसाठी
बिभत्स रस
विषय - किळस
जात होते बाबा रस्त्याने,
काम आटोपून स्वतःचे .
होती चालू रिपरिप पावसाची,
चित्र उभे समोर घरचे.
दृष्टीस पडली एक आकृती,
रस्त्याकडेला पडलेली.
वाटे जणू गर्दी चिंध्यांची ,
बेवारसपणे विखुरलेली.
निकट जाता दृष्टीस पडली,
एक व्यक्ती नग्नावस्थेतील.
अंग सारे होते सडलेले,
थोटे अंगप्रत्यंग महारोगाने.
जखमांना नव्हती गिनती,
दुर्गंधी सगळीकडे पसरलेली.
वहात होते रक्त , पू अन् घाण,
अळ्यांची वळवळ चाललेली.
किळस आली बाबांना पाहून,
ठोकली धूम लांब गेले.
विवेकबुद्धी जागृत झाली,
निर्धाराने मागे फिरले.
पाण्याने घातली आंघोळ,
अळ्या लागल्या तडफडू.
पाट वाहिला रक्त, पसाचा,
ओकारी लागली भडभडू.
दाखल केले दवाखान्यात,
बाबा आमटे महान जगती.
ठरले मसिहा महारोग्यांचे,
गाऊ कीती मी त्यांची महती.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment