खारुताई
सरसर सरसर झाडावर,
चढते , ऊतरते वेगाने.
खारुताई खारुताई,
असे कसे गं तुझे जिणे?
तुरुतुरु पळते सगळीकडे,
टुलुटुलू बघते जगाकडे.
थांब की जरा क्षणभर ,
डोळे भरुन पाहू दे तुझ्याकडे.
शेपटी कीती झुपकेदार,
आवडते मला बाई फार.
मऊमऊ , लुसलुशीत तू,
नजर तुझी आहे धारदार.
पट्टे अंगावर शोभती छान,
करडे पिवळे काळेभोर.
दिला आशीर्वाद म्हणे रामाने,
भाग्यवान बाई तू बिनघोर.
काय हवा खाऊ तूला ?
आवडते काय सांग तूला.
हळूहळू खात जा जरा,
लगेच लागू नको पळायला.
मैत्री करशील का माझ्याशी?
दोघी मिळून खूप खेळू .
पाठशिवी खेळताना मग,
एकापाठोपाठ खूप पळू.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment