Friday, 18 January 2019

चित्रकाव्य ,बालकाव्य ( कागदी होडी )

चित्रकाव्य स्पर्धेसाठी

कागदी होडी

पेपर कागदाचा,
आकार घेऊ लागला.
घड्या घड्या घालत,
ऊलगडू लागला.

दिवस पावसाचे,
बरसला जोरदार.
साचले तळे,डबके,
पाणी साचले भारंभार.

चिखलयुक्त पाणी,
रंग त्याचा लालसर.
कागदाची नाव आता,
तरंगते पाण्यावर सरसर.

इंग्रजी भाषेची अक्षरे,
शोभती नावेवर छान.
प्रतिबिंब पडले पाण्यात,
शोभे होडी कागदी लहान.

तीन दिशांच्या तीन होड्या,
मार्ग आपला शोधती.
निरोप घेऊन एकमेकांचा,
मार्गक्रमण त्या करती.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment