Friday, 25 January 2019

कविता ( ढासळलेला बुरुज )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

ढासळलेला बुरुज

ढासळलेला बुरुज,
साक्ष देतो इतिहासाची.
कधी काळी होता माझा,
रुबाब अन् सय समृद्धीची.

ढासळलो तरीही आहे मी ,
अजून भरभक्कम छान.
पाहून आठवतो सहजच,
ऐतिहासिक माझा अभिमान.

आधार देती वृक्षवल्ली,
एकटेपणा घालवण्यासाठी.
हिरवीगार वृक्षराजी मला,
देती गारवा समाधानासाठी.

निखळत चाललाय आता,
एकेक दगड न दगड .
पायथ्याशी परत माझ्याच,
पडलाय होऊन अनगड.

शेळी बकरी सोबती माझे,
चरण्या येती गवतावर.
पाहून त्यांना आठवत बसतो,
मी असा घेऊन भग्न अवतार.

येणाऱ्या पिढीला कळूदे,
असते बुरुज नी गढी कशी.
ठेवा असाच साक्षिला मला,
प्राचीन ईमारत दिसते जशी.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment