स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
अष्टाक्षरी
विषय - उघड्यावरचे जग
अधांतरी संसारात
आगतीकतेचे जग
उघड्यावरचे जिणे
जगण्याची तगमग
विटांवर विराजला
भाकरीचा तवा गोल
मातेच्याच हातातल्या
भाकरीला नाही मोल
अग्निज्वाळा भडकल्या
पोटासह विस्तवात
भाजीविणा गोड लागे
नाही दिसे अस्तित्वात
मोजकीच भांडी देती
जीवनाला हो आधार
नको मोह अन् माया
तुमचीच रे मदार
गुंग माता स्वैपाकात
पोरे दोन्ही आसपास
समाधानी भाव दिसे
मुखावर प्रेमभास
फिके यापुढे वैभव
महालात फार चिंता
सहजच झोप येते
दगडावरती आता
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment