Friday, 30 June 2017

भेगाळलेली पावले

स्पर्धेसाठी

        चित्रकाव्य

    भेगाळलेली पावले

झोपलो मी निवांत वारकरी,
जरी भेगाळले पाय माझे  .
माखले धुळीने,पडल्या चिरा
तरीही शांततेत मन माझे .

थकलो जरी फिरुनी वारीत,
ऊमेदीत मन जगते आहे .
ना अपेक्षा आंथरुणाची ,
धरतीमाताच पुरेशी आहे .

अनवानी पायी प्रवास करतो
दूर ती पंढरी विठुरायाची .
रक्ताळले तळवे अन् टाचा ,
ना खंत आता मनी कशाची.

साक्ष देती सच्चेपणाची ,
शुभ्र पांढरी अंगी वसने.
बिनघोर झोपणे नशीबी ,
निरागस मनाचे असणे .

  ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Thursday, 29 June 2017

आई तुझ्याचसाठी

स्पर्धेसाठी
    
       चारोळी

     आई तुझ्याचसाठी

जीवन हे आई तुझ्याचसाठी
तुझ्यामुळेच मी जग पाहीले
नसे दुजा महान कोणी इथे
चरणी तुझ्या मी मला वाहीले

   ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Tuesday, 27 June 2017

प्रेम

स्पर्धेसाठी

     चित्रचारोळी

काश्मिरी  पोशाख माझा
तुझा काळा पांढरा रंग
एकमेकाच्या प्रेमात न्हालो
कीती मऊ तुझे गोबरे अंग

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर 416106

Sunday, 25 June 2017

ईदमुबारक

स्पर्धेसाठी

           चारोळी

    विषय -- ईदमुबारक

रोजे हुए खत्म आज
सुकुन देकर दिलको
चाँद नजर आया भाई
ईदमुबारक हो सबको

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

खाजगी शिकवण्यांचे बाजारीकरण व विद्यार्थी

स्पर्धेसाठी

खाजगी शिकवण्यांचे बाजारीकरण व विद्यार्थी

     गुरु-शिष्याची परंपरा प्राचीन काळापासून आजही अव्याहतपणे चालू आहे. शिष्य गुरुकुलात जात होता व स्वतःची कामे स्वतः करुन ज्ञानग्रहण करत होता यातून शिक्षणाबरोबर स्वावलंबनाचे धडे प्रत्यक्ष ज्ञानातून मिळत असे . ते ज्ञान त्याला आयुष्यातील प्रत्येक प्रसंगी ऊपयोगी पडत असे.
     आजही गुरु-शिष्याची परंपरा पहायला मिळते.पण विद्यार्थ्यापुढे शाळा व गुरुंचे एवढे पर्याय आहेत की ते निवडताना पालक व विद्यार्थी यांच्या नाकी नऊ येत आहे.याचे खरे कारण म्हणजे शाळांचे व खाजगी शिकवण्यांचे वाढते प्रमाण होय.

     शाळेत मिळणारे फुकट ज्ञान व दारात येणारे शिक्षक यामुळे त्यांची कींमत वाटत नाही ,पण खाजगी शिकवण्यांचे भरमसाठ फीचे दर व तिथली विद्यार्थ्यांची गर्दी पाहता एक प्रश्न पडतो की फुकटच्या ज्ञानाची काहीच कींमत नाही का ? याचे ऊत्तर काय ?

   आजच्या  "खा ऊ जा " धोरणामुळे शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे.खाजगी शिकवण्यांचे पेव फुटले आहे.याची खरोखरच गरज आहे का ? याची पालकांनी विचार करण्याची गरज आहे. शाळेत जर विद्यार्थ्यांनी पूर्ण  लक्ष दिले व पालकांनी घरात ऊजळणी करवून घेतली की आपोआपच अभ्यास पक्का होतो व आपल्या मुलांची प्रगतीही कळते.
   खाजगी शिकवणीवाले प्रत्येकाकडून समान फी घेतात व संख्याही कमी असते , वेळ असतो तर सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती व्हायला हवी .हे कधी आपल्या लक्षात येणार ? विद्यार्थ्यांना आयते तयार गाईड , नोट्स दिल्यामुळे त्यांचे सखोल वाचन होत नाही व भावी जीवनात मग ते असफल होतात.निराश होतात . हे सर्व थांबायला हवे

  श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Saturday, 24 June 2017

चातुर्य

स्पर्धेसाठी

       चारोळी

    विषय- चातुर्य

संघर्षातून यशाकडे जाणे
अवघड सोपे करुन सांगणे
चातुर्य हाच असे मार्ग खरा
गाण्यास सुखी जीवणगाणे

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Friday, 23 June 2017

पोरकी मुले

स्पर्धेसाठी

      चित्रचारोळी

       पोरकी मुले

असहाय्यतेचे जीणे जगतो ,
पहा पोरकी आम्ही मुले .
उगाच म्हणती सर्व जगी ,
मुले ही देवाघरची फुले

आश्रीत आम्ही या जगात ,
स्वताःचे असे कुणी नसे .
उपासमारीने हैराण झालो,
मनी फक्त अन्नच दिसे .

भाऊ बहीण ही दीनवाणी ,
झाली दशा केविलवाणी .
विचार करुन थकला जीव,
भाजले धुळपाय आनवाणी.

ना घर , ना दार आम्हा ,
फाटक्या गठ-यांचा आसरा
त्यापासूनच तयार केलाय ,
बसण्यास निराधार सहारा.

भविष्याची चिंता नसे आम्हा
आजच्या पोटाची खरी चिंता
नको फक्त सहानुभूती खोटी
हवी ठोस कारवाई आता .

  ✍ कवयित्री ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

व्यसनमुक्ती

स्पर्धेसाठी

        चारोळी

   विषय -- व्यसनमुक्ती

दिर्घायुषी असेल व्हायचे
तर करु एक नामी युक्ती
परिपूर्ण आरोग्यासाठी
आता राबवू व्यसनमुक्ती

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Wednesday, 21 June 2017

मैत्री तुझी माझी

स्पर्धेसाठी

        चारोळी

   मैत्री तुझी माझी

अशीच अखंड,अभंगअसेल
निस्वार्थी मैत्री तुझी माझी
नसेल थारा कधी कलहाला
विश्वासच  पुंजी तुझी माझी

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106 .

कुटुंब

स्पर्धेसाठी

          चारोळी

      विषय -- कुटुंब

जिथे नांदतो प्रेम जिव्हाळा
सहकार्याचा हात धरुन
कुटुंब असते तेच सुखी
राहती एकत्र मान राखून

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर ,416106

Tuesday, 20 June 2017

माता

स्पर्धेसाठी

     चित्रचारोळी

सगळीकडेच पाणी झाले
पावसाची बरसात झाली
माता जरी भिजली तरी
छकुलीला सुरक्षित ठेवली

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

Sunday, 18 June 2017

माझे बाबा

काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजीत पितृदिना निमीत्त   " बाप " या विषयावर 

      काव्यस्पर्धेसाठी

          माझे बाबा

प्रेमस्वरुप सिंधु ,
आहेत माझे बाबा.
मनावर असतो आमच्या ,
नेहमीच त्यांचा ताबा .

धीरगंभीर संयमी चेहरा,
प्रोत्साहनप्रसंगी होतो हसरा
संदेश जीवनी स्वताः देतसे,
साधी राहणी अंगीकारा .

लेखणीवर आहे ताबा ,
हस्ताक्षर जसे सुंदर मोती.
पाहताच मन मोहून जाते ,
सकलजन निरखून पाहती.

शिक्षणक्षेत्र पवित्र केले ,
विद्यार्थीप्रीय सदा सर्वदा .
निस्वार्थी सेवा विद्यामंदिरात
ज्ञानदानात मग्न सदा .

समाजसेवा पिंड तयांचा,
करुणासागर मायेचा ,सेवेचा
कर्तव्यदक्ष , प्रेरणास्फूर्ती ,
आदर्श व्रतस्थ जीवनाचा .

कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ.
जि.कोल्हापूर ,416106

जगण्याचा ह्या शर्यतीमध्ये

स्पर्धेसाठी

         चारोळी

जगण्याच्या ह्या शर्यतीमध्ये

जगण्याचा ह्या शर्यतीमध्ये
जो तो सुखासाठी धावतोय
अपेक्षांचे ओझे घेऊन
तुलना दुस-याशी करतोय

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

पावसाच्या धारा

स्पर्धेसाठी

     चित्रकाव्य स्पर्धा

       पावसाच्या धारा

निळ्याशार आभाळातून ,
पावसाच्या धारा आल्या .
कौलावरुन शाळेच्या त्या,
धावतच खाली आल्या .

झाली पोषणआहाराची घाई
पावसालाही भूक लागली .
पकडण्या त्याला आता ,
सर्वांची स्पर्धाच सुरु झाली.

पागोळ्याच्या संततधारा , मुलेमुली खुष झेलताना .
पन्हाळीचे पाणीही पाहती,
वेगात आता धावताना .

विसरुन गेली तहानभूक ,
धारा पावसाच्या झेलताना .
तृप्त शाळा,अन् धरतीही ,
परीसर शाळेचा पाणावताना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ
जि. कोल्हापूर ,416106

Saturday, 17 June 2017

भ्रष्टाचार

स्पर्धेसाठी
    

     भ्रष्टाचार

भ्रष्ट झाली समाजव्यवस्था
बोकाळलाय आता भ्रष्टाचार
नैतिकतेला स्थान नाही
झालेत सगळेच लाचार

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जि. कोल्हापूर, 416106

माझा छकुला

स्पर्धेसाठी

          चारोळी

       माझा छकुला

माझा सोनुला साजीरा
माझा छकुला गोजीरा
राहू दे असाच औक्षवंत
चेहरा नेहमी राहो हसरा

   श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Thursday, 15 June 2017

प्रवेशोत्सव

स्पर्धेसाठी

      प्रासंगिक स्पर्धा

  प्रवेशोत्सव काव्यस्पर्धा

दिवस पहिला आजचा ,
उत्साहाने भारुन गेला .
नविन पुस्तके , नविन वह्या,
नविन मैत्रीचा संघ झाला .

उत्सुकता मोठी लागली,
कशी असेल शाळा .
नकळत रमले सारे ,
जसा भरला मेळा .

सहजच झाल्या मैत्रीणी,
परकेपण दूर पळाले .
शिक्षकांच्या बरोबर ,
विद्यार्थीही खूष झाले .

स्वागत झाले जोरात ,
गोड बेत जेवनाचा .
फुलं , फोटो काय सांगू ?
धडा मिळाला एकतेचा .

     कवयीत्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

चिंतन

स्पर्धेसाठी

        आठोळी

      विषय - चिंतन

आत्मपरीक्षणासाठी हवे
करायला नेहमी चिंतन
त्यासाठीच करावे लागते
मनातल्या मनात मनन

चिंतन आणि मननाने
होतोय विचारांचा निचरा
याशिवाय पर्याय नाही
शेवटी याचाच आहे आसरा

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

मैत्रीचा सातबारा

स्पर्धेसाठी

  मैत्रीचा सातबारा

निखळ प्रेमाचा आरसा ,
म्हणजेच मैत्रीचा सातबारा.
मैत्रीच्या गराड्यातील ,
हाच असतो खरा उतारा .

प्रेम आणि विश्वास ,
हाच महसूल कायदा .
विश्वासघात नाही करायचा,
हाच इथला वायदा .

हरएक मित्र असतो ,
नविन नमुना प्रितीचा .
मैत्रीला नसते मर्यादा ,
सुखदुःखाच्या साथीचा.

माझी मैत्री , माझा हक्क,
नाही लागू कोणतेच कलम.
वैचारिक मतभेदांवर ,
प्रेमळ शब्दांचेच मलम .

जीवनाच्या अंतापर्यंत ,
वाहणार हा झरा .
आंत ना कधी याला ,
हाच मैत्रीचा सातबारा .

    कवयीत्री

श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे , कुरुंदवाड ,
ता.शिरोळ ,जि.कोल्हापूर,
416106 .
9881862530
mknagave21@gmail.com

Wednesday, 14 June 2017

घन ओथंबून आले

स्पर्धेसाठी

            चारोळी

      घन ओथंबून आले

ऊठले विचारांचे काहूर मनी
शांतीचा मार्ग ते शोधू लागले
पहा आज माझ्या भावनांचे
मनात ,घन ओथंबून आले

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

Monday, 12 June 2017

मराठमोळी नार

स्पर्धेसाठी

       चित्रचारोळी

प्रतिक्षेत मराठमोळी नार मी
शोभते नऊवारी,चोळी अंगी
चंद्रकोर, नथ , गळामाळा
निरांजनासम तेजस्वी  वदनांगी

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .416106

बारीश

बारीश

देख रहे हैं राह तुम्हारी ,
आस लगाए बैठे है |
जरुरत है तुम्हारी सबको ,
क्यों तुम ऐसे ऐंठे हो |

बिना तुम्हारे दशा हो गई है ,
संसार अधुरा तेरे बिना |
बरसो मेघा अब तो आवो ,
आँगन मेरा पडा है सुना |

कीसान तो है तेरे भरोसे ,
मेहनत बेकार न जाए अब |
बिज अंदर पुकार रहा है ,
पानी हमें मिलेगा कब ?

बरसो अब , नखरे ना दिखा
पेड बहुत हम लगाएंगे |
वादा न तोडेंगे कभी हम ,
हरीभरी धरती सदा करेंगे |

         रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,416106

Sunday, 11 June 2017

शृंगार

स्पर्धेसाठी

कविता  -- शृंगार

नऊरसांनी सजले साहीत्य ,
मिळवला मान शृंगाररसाने.
दर्जा वरचा सदा असे याचा ,
आस्वाद घेती आनंदाने .

जीवनाच्या या मेळ्यात ,
शृंगार सर्वांनाच असे प्यारा.
व्यक्तीगणिक याचा सदा ,
बदलत आसतो नखरा .

काव्यात शृंगार येता ,
बहर येतो नवा नवा .
ऊंची गाठली जाते ,
सर्वांनाच आसतो हवा .

नवदापंत्याच्या मनात ,
याविषयी शंका अनेक .
नवानुभवाच्या नावेत ,
हाती सुकाणु घेती सुरेख .

  कवयीत्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

पाऊस

स्पर्धेसाठी
      
            चारोळी

     विषय  -- पाऊस

तप्त धरणीमाता आता
आसुसली पावसाला
मृदगंधाने वेडावले सारे
झेलता पहीला पाऊस

   माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

Saturday, 10 June 2017

शासन

कविता

           शासन

राखून मान संविधानाचा ,
चालते तेच खरे शासन .
तालावर स्वतःच्या चालते ,
ते असते मर्कटासन .

जो तो रस्त्यावर येतो ,
हक्कासाठी भांडत बसतो .
शासनाला का माहीत नसते
ज्याचा त्याला हक्क असतो

देश आमचा कृषीप्रधान ,
अन्नदाता आला रस्त्यावर
जगणे मुष्कील केले ,
जगतो ज्याच्या जीवावर.

अंशता अनुदानाची भिक ,
दिली विनाअनुदानीतांना.
जशी दिली जाते ,
लाचार त्या भिक्षुकांना .

थांबायलाच हवे कुठेतरी ,
प्रयत्न करु सारेचजण .
नका मारु नुसत्या बाता ,
सहभागी व्हावेत सर्वजण.

   
    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

Friday, 9 June 2017

आधार

स्पर्धेसाठी

   चित्रचारोळी

           आधार

धनी तुझा , बाप माझा ,
गेलाय मोर्चात अन् संपावर . खेळवणार कोण मला ?
तू घे मला  शिंगावर .

नाही भिती मला तुझी ,
रोज खेळतो तुझ्या संग .
पांढरा ढवळ्या राजा तू ,
अनुकुचीदार लाल शिंगं.

घर जसं चंद्रमौळी झोपडी,
ना खिडकी सदा ऊघड दार.
बाप माझा येईपर्यंत ,
मला तुझाच रे आधार .

जोडी तुमची दोघांची छान,
बांधलाय जाड कासरा .
गळा घुंगुरमाळा शोभे जरी,
दावणीला तुझ्या ना चारा .

आस धरु भविष्याची ,
हिरव स्वप्न होईल साकार.
तुझ्या माझ्या जीवनाला ,
खरा येईल तो आकार .

✍ कवयीत्री ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

विरह

स्पर्धेसाठी

  काव्यस्पर्धेसाठी - विरह

राजमनीचे अधरी येता ,
      काया ही बावरते .
थरथर तनुची पाहता ,
    आपसूकच ते लाजते .

तू जवळ नसतानाही ,
तुझ्या आठवणींचा सहवास
गहिवरल्या मिठीत माझ्या ,
तुझ्या सोबतीचा भास .

असाच मनीचा भाव ,
तुझा नी माझा राहुदे .
साथ तुझी , त्या भावना,
सदैव मनात असूदे .

प्रीत माझी शोधते तू कुठे ,
  मन ते बेचैन होते .
वाट आयुष्याची बिकट ,
   तरीही मी चालते .

सहवास जरी अल्पसा ,
     मिळाला मजला .
कोंदणात मनाच्या तो ,
     कायमच वसला .

✍ कवयीत्री ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

Thursday, 8 June 2017

कर्तव्यदक्ष

स्पर्धेसाठी

विषय - कर्तव्यदक्ष

कर्तव्यदक्ष तेजस खरा
शोभून दिसतो खाकी वर्दित
तडफदार,बाणेदार नवयुवक
कीर्ती होऊदे अशीच वर्धीत

   ✍  रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

वटवृक्ष

स्पर्धेसाठी

          वटवृक्ष

वटवृक्ष पूजता वटपौर्णिमेला
वृक्षारोपणही हवे साथीला
महीमा याची काय वर्णावी
औषधी गुणधर्मही संगतीला

     ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

वटपौर्णिमा

स्पर्धेसाठी

        वटपौर्णिमा

सौभाग्याची ही वटपौर्णिमा
पवित्र दिनी प्रण चला करु
वृक्षारोपण हो पतीच्या नावे
आयुष्यभर जपून सेवा करु

   ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Wednesday, 7 June 2017

आठावड्याचे वार

उपक्रम
    
        आठवड्याचे वार

आठवड्याचे वार कीती ?
एक आधीक सहा सात .

आला आला पहा रविवार ,
खेळा , करा मस्ती भरपूर .

सोमवार आला पाठीमागून ,
हातात पुस्तक वह्या घेऊन .

एक दोन तीन चार ,
आला पहा मंगळवार .

बुधवारची बातच न्यारी ,
रंगीत कपडे खूपच भारी .

गुरुवार माझ्या आवडीचा ,
दत्तगुरुंच्या हा भक्तीचा .

पाच सहा सात आठ ,
शुक्रवार देवीचा थाटमाट .

नऊ दहा संपला पाढा ,
शनिवारी लवकर पळा .

रविवार ते शनिवार असे ,
सात दिवस मजेत गेले .

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,416106

अबोल प्रीत

स्पर्धेसाठी

             चारोळी

          अबोल प्रीत

शब्द अडखळती ओठात
प्रकट होण्यास नसे धाडस
अबोल प्रीत हिच सख्या
समजून घे नाही होत साहस

   ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

Tuesday, 6 June 2017

बालपण

उपक्रम

        बालपण

थोड सुख थोड दुःख
सतत धडपड , मौजमस्ती
शाळा , अभ्यासाचे टेन्शन
बाकी मजा ती न्यारीच होती

      ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर ,416106

राधा बावरी

स्पर्धेसाठी

        चित्रचारोळी

कृष्ण तू , राधा मी बावरी
हरपले भान ऐकुन बासरी
सरोवरातील कमळे फुलली
आसमंतात सा-या नाद भरी

   ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.. कोल्हापूर , 416106

Sunday, 4 June 2017

स्वर्गही फिका पडे

स्पर्धेसाठी
  
    चारोळी स्पर्धा

    स्वर्गही फिका पडे

जिथे नांदतो प्रेम जिव्हाळा
माणुसकीचे वाजती चौघडे
आईबाबांची जिथे सेवा घडे
तिथे स्वर्गही फिका पडे

   ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

Saturday, 3 June 2017

शेतकरी राजा

स्पर्धेसाठी

        चित्रचारोळी

मी शेतकरी राजा संपावर
खांद्यावर हल मी धरतोय
नाही हटणार मागे आता
किसान क्रांती करतोय

     ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Friday, 2 June 2017

प्रतिक

स्पर्धेसाठी

       प्रतिक

प्रतिक असते गुलाब
सुखाचे,प्रेमाचे,दुःखाचे
कधी कुठे वहायचे त्याला
प्रसंगानुरुप ठरवायचे

    ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

निरागस नजर

स्पर्धेसाठी

      चित्रकाव्य

    निरागस नजर

तुझी निरागस नजर ,
घायाळ मजला करते .
विणायचा सोडून गजरा ,
मीही तुलाच पाहते .

माझ्या गोज-या पाडसा ,
नाही तुला रे सोनपाळणा .
कसा निवांत पहुडला ,
माझा देखणा खेळणा .

सुई धाग्यात विणते ,
मी सुगंधी मोगरा .
पोटासाठी विकते मी ,
शुभ्र-धवल गजरा .

कळ्या मोग-याच्या ,
गुंफल्या मी साज-या .
तुझ्या नजरेने त्याही ,
झाल्या कशा हास-या .

मांडला संसार मी ,
असा ऊघडा रस्त्यावर .
भिस्त असे माझी राजा ,
फक्त बाळा तुझ्यावर .

    ✍ कवयित्री ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Thursday, 1 June 2017

कवितेची विण

स्पर्धेसाठी

      कवितेची विण

बाहेर येण्या धडपडतात ,
मनातील हे भावतरंग .
प्रसवली कवितेची विण ,
मोकळे झाले अंतरंग .

भावभावनांचा खेळ हा ,
शब्दातून अलवार प्रकटतो . मनातील सुप्त विचारांचा,
मेळा चांगलाच भरवतो .

मनमंदिरातील देवता ,
शब्दमूर्तीत घेते आकार .
सौंदर्य तीचे काय वर्णू ?
मंदिराचे जरी अनेक प्रकार.

अव्यक्तांचे व्यक्त होणे ,
सर्व शब्दांत पकडणे .
हीच कवितेची विण असते,
होते सुंदर रचनांचे विणणे .

झाले निरभ्र हे मन ,
मिळाली मनास धन्यता .
विसावा मिळाला पहा ,  शांत झाली मनाची आर्तता

   ✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

शेतकरी आणि संप

स्पर्धेसाठी

विषय- शेतकरी आणि संप

शेतक-याने दिली आर्त हाक   आंदोलन,मोर्चे केले लाख
दुर्लक्ष केले , केला अपमान
संपाने आता निघेल बाक

   ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106