स्पर्धेसाठी
आधुनिक तंत्रज्ञान लहान मुलांसाठी योग्य की अयोग्य
आधुनिक तंत्रज्ञानाची धरु कास,
उजळूया भविष्य आमचे खास.
आजच्या संगणक युगात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून जर आपण पुढे गेले तर नक्कीच आपण आपले भविष्य उजळवून टाकण्यास समर्थ होतो. आज ज्याला संगणक हाताळता येत नाही, स्मार्टफोन, अँड्रॉइड फोन वापरता येत नाही तो अडाणी व निरक्षर ठरत आहे. आजच्या युगात चाळीस पन्नास वर्षाच्या वयाच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना यातले ज्ञान लवकर समजत नाही. यासाठी त्यांना आपल्या मुलांच्या वर व नातवंडांच्या वर अवलंबून राहावे लागते. काहीजणांना तर किती वेळा सांगितले तरी लक्षातही राहत नाही. अशावेळी या प्रौढ व्यक्ती या आपल्या घरातील लहान मुलांच्या कडून सर्व गोष्टी करून घेतात. आजची मुले ही स्मार्ट युगातील स्मार्ट मुले आहेत. आजच्या शाळा या डिजिटल झालेल्या आहेत. आजचे शैक्षणिक धोरण हे ज्ञानरचनावादी मूल्यावर अवलंबून आहे.यामध्ये मुलांच्या स्व विकासावर, स्व ज्ञानावर भर दिलेला आहे. आजचे विद्यार्थी इंटरनेटच्या सहाय्याने त्यांना न कळलेल्या गोष्टी, किंवा हवी असलेली माहिती सहजगत्या मिळवू शकतात. आजच्या शैक्षणिक धोरणात उपक्रम व प्रकल्प याला प्राधान्य दिले गेले आहे. जेणेकरून विद्यार्थी पाठाला अनुसरून असलेली माहिती मिळवून आपल्या ज्ञानात भर घालेल.ई-लर्निंगच्या माध्यमातून व ई- क्लास च्या माध्यमातून शाळेमध्ये किंवा घरात असून सुद्धा विद्यार्थी आता शिकू शकतो. कारण ज्ञानाच्या कक्षा आता खूप रुंदावलेल्या आहेत. शाळेत सुद्धा प्रोजेक्टरच्या सहाय्याने, अँड्रॉइड टीव्ही च्या साह्याने शिक्षण दिले जात आहे. त्यावेळी मुलांना शिक्षणासाठी मोबाईल संगणक फार उपयोगी पडतो. इंजिनिअरिंग मेडिकल या सारखे शिक्षण घेताना, विद्यार्थ्यांना संगणक व लॅपटॉपची आवश्यकता असते. त्यावेळी त्यांना जे आवश्यक आहे ते दिलेच पाहिजे. पण त्याचा उपयोग विद्यार्थी व मुले कशा प्रमाणात उपयोग करतात यावर बरेच अवलंबून आहे. पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. तुझ्यावर लक्ष दिले पाहिजे. व त्यांना जाणून घेतले पाहिजे.आजकाल जवळ जवळ सर्व पालकांच्या कडे अँड्रॉइड फोन आहेत. व्हाट्स,फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पालक वर्ग आपला बराचसा वेळ घालवत असतात. याचेच अनुकरण त्यांची मुले करत असतात. बऱ्याच वेळा असे पाहिले जाते की, आपल्या कामामध्ये मुलांचा व्यत्यय नको यासाठी कितीतरी माता व पालक आपल्या मुलांच्या हाती हा स्मार्टफोन देतात. यामध्ये गेम खेळणे, गाणी ऐकणे, चित्रे पाहणे,यासारख्या मनोरंजक गोष्टी असतात. पाहण्यामध्ये ते गुंगून जातात. मग त्यांना कशाचेही भान राहत नाही. एकदा सवय झाली की ती लवकर सुटणेही अशक्य असते. मग ही मुले या अँड्रॉईड फोनच्या सवयीचे गुलाम होतात. त्यांना फोन दिला नाही तर ते रडतात ,ओरडतात, त्रागा करून घेतात. अशा वेळेला पालक वर्ग मनात नसताना सुद्धा मुलांच्या फाजील लाडासाठी त्यांना स्मार्टफोन देतात. सुरुवातीला जरी ते चांगले वाटत असले तरीसुद्धा याचे दूरगामी परिणाम अतिशय वाईट आहेत. कारण परिणाम मुलांच्या मेंदूवर नसांवर होत असतो. जेवायला या मुलांच्या मेंदूवर परिणाम झाल्यामुळे त्यांना स्वतःचा तोल सावरणेही कठीण होते. अशावेळी त्या मुलाचे आयुष्य धोक्यात आपण घालतो. या वेळी पालकांची भूमिका महत्त्वाची असते. कारण आपला मुलगा ,मुलगी वापर किती व कशासाठी करते, करतो यावर लक्ष ठेवले पाहिजे. व फाजील लाड यांना करता. योग्य त्या वेळी कठोर ही वागले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान हे लहान मुलांसाठी जेवढे चांगले आहे त्याच्यापेक्षा जर त्याची वाईट सवय लावून घेतली तर ते खूपच वाईट आहे. त्यामुळे योग्य सवयी लावण्याकरता त्यांना आपण लहानपणापासूनच या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कोणत्याही वेळी व कितपत करायला हवा याची जाण ठेवून त्यांना तशी सवय लावली पाहिजे. नाहीतर मोठेपणी ते अशक्य होऊन बसते.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रमाणात केल्यास ते चांगले आहे.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment