Thursday, 31 January 2019

कविता बिभत्स रस ( किळस )

स्पर्धेसाठी

बिभत्स रस

विषय - किळस

जात होते बाबा रस्त्याने,
काम आटोपून स्वतःचे .
होती चालू रिपरिप पावसाची,
चित्र उभे समोर घरचे.

दृष्टीस पडली एक आकृती,
रस्त्याकडेला पडलेली.
वाटे जणू गर्दी चिंध्यांची ,
बेवारसपणे विखुरलेली.

निकट जाता दृष्टीस पडली,
एक व्यक्ती नग्नावस्थेतील.
अंग सारे होते सडलेले,
थोटे अंगप्रत्यंग महारोगाने.

जखमांना नव्हती गिनती,
दुर्गंधी सगळीकडे पसरलेली.
वहात होते रक्त , पू अन् घाण,
अळ्यांची वळवळ चाललेली.

किळस आली बाबांना पाहून,
ठोकली धूम लांब गेले.
विवेकबुद्धी जागृत झाली,
निर्धाराने मागे फिरले.

पाण्याने घातली आंघोळ,
अळ्या लागल्या तडफडू.
पाट वाहिला रक्त, पसाचा,
ओकारी लागली भडभडू.

दाखल केले दवाखान्यात,
बाबा आमटे महान जगती.
ठरले मसिहा महारोग्यांचे,
गाऊ कीती मी त्यांची महती.

कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

चारोळी ( प्राजक्त )

स्पर्धेसाठी

चारोळी

प्राजक्त

शुभ्रधवल फुलवून पिसारा
प्राजक्त असा हा बहरला
विसावे शिरी अलवारपणे
केशरी देठ तो आधाराला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Saturday, 26 January 2019

चारोळी ( देशासाठी काय करावे )

स्पर्धेसाठी

चारोळी

देशासाठी काय करावे

संविधानावरती ठेवून निष्ठा
बंधुभाव तनामनात जागवावा
अन्यायाविरुद्ध लढण्याची
जिद्द मनी सतत बाळगावी

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 25 January 2019

कविता ( ढासळलेला बुरुज )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

ढासळलेला बुरुज

ढासळलेला बुरुज,
साक्ष देतो इतिहासाची.
कधी काळी होता माझा,
रुबाब अन् सय समृद्धीची.

ढासळलो तरीही आहे मी ,
अजून भरभक्कम छान.
पाहून आठवतो सहजच,
ऐतिहासिक माझा अभिमान.

आधार देती वृक्षवल्ली,
एकटेपणा घालवण्यासाठी.
हिरवीगार वृक्षराजी मला,
देती गारवा समाधानासाठी.

निखळत चाललाय आता,
एकेक दगड न दगड .
पायथ्याशी परत माझ्याच,
पडलाय होऊन अनगड.

शेळी बकरी सोबती माझे,
चरण्या येती गवतावर.
पाहून त्यांना आठवत बसतो,
मी असा घेऊन भग्न अवतार.

येणाऱ्या पिढीला कळूदे,
असते बुरुज नी गढी कशी.
ठेवा असाच साक्षिला मला,
प्राचीन ईमारत दिसते जशी.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Tuesday, 22 January 2019

चारोळी ( हक्क/ कर्तव्य/निष्ठा )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय -- हक्क/कर्तव्य/ निष्ठा

१)   हक्क

हक्क सांगताना ठेवावे
जबाबदारीचे भान
तरच राहील जगती
नेहमी मानाने उंच मान

२)        कर्तव्य

कर्तव्य आईबाबांनी केले
केवळ पुत्राच्या प्रेमापोटी
धाडून त्यांना वृद्धाश्रमात
जगी मिरवी प्रतिष्ठा खोटी

३)       निष्ठा

निष्ठा कामाप्रती असावी
प्रामाणिकतेची कास धरुन
नाहीतर असफलता असते
समजून घ्या अनुभवावरून

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 21 January 2019

हायकू ( शंख शिंपले )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय- शंख शिंपले

शंख शिंपले
सागर काठावर
दिसे सुंदर

कीती आकार
वेगवेगळे छान
शंखाचा मान

विविध रंगी
शिंपल्यातील मोती
लागले हाती

केले दागिने
सजले अंगावरी
हो मनोहारी

शोभेच्या वस्तू
वाढे शोभा घराची
शांती मनाची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Sunday, 20 January 2019

किताब परीक्षण " स्पंदन "

जबतक दिलकी धडकनें शुरु हैं, तबतक ही मानवी शरीर को कीमत है। नहीं तो ये शरीर मुर्दा,बेजान और बेकार कहलाता है। उसितरह जबतक हमारे मनमें सामाजिक खयालोंके प्रती धडकन शिरकत नहीं करती,दिलमें अंगार नहीं भरतीहमें बेचैन नहीं करते तबतक यह जिस्म दर्दहिन,नामर्द कहलाता है। लेखिका प्राजक्ता पाटील की कीताब "स्पंदन " ( धडकनें ) में यह सामाजिक स्पंदनें दिखाई देती हैं। पढते समय लेखिकाकी रहम करनेवाली सोच, तो कभी सामाजिक हालात के खिलाप बगावत करनेवाली,तो कभी ईसमेंसे रास्ता सुझानेवाली ऐसे अनेक रुप सामने आते हैं। अपने पिताजीसे मिले हुए खुद्दारी के बिज दिलमें बोकर अपने छात्रोंमें मुस्तकबिल बनाने के साथ साथ समाजमें नजर आई सामाजिक सवालोंको देखकर उनका मन दुखी होता हुआ दिखाई देता है, तो कभी हालातोंपर वह हल निकालती हुई दिखाई देती है।

मा.इंद्रजीत देशमुखजी,पुर्व अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर ,इनकी प्रस्तावना मिली हुई " स्पंदन " यह कीताब पढनेवालोंको सचमेंही विचारप्रवण बनाता है। सामाजिक अनेक नासूर बने सवालोंके उपर ,जिसमें स्त्री-भ्रुणहत्या, प्रेमविवाह, ब्लू व्हेल गेम, निर्भया, कीसान को दुल्हन ना मिलना,एकतर्फा प्यार- एक सोच, संस्कृती की ऐसी की तैसी, दवाईयोंके बोझ तले जीना मुश्कील हो गया है,ऐसे विषय के माध्यम से लेखिका ने समाज के सामने अपने लेखनद्वारा प्रकाश डाला है। ऊसीतरह गुरु की महानता,मेरा महाराष्ट्र, ये मेरा देश है इसका खयाल रखो, भारतीय संस्कृती, महाराष्ट्र के नवयुवकोंका  स्थान, वजूद के संघर्ष में तणाव को दूर करके लंबी उम्र हासिल करो,बच्चोंका बचपन गुम हुआ है, मराठी हमारी मायबोली, अध्यापकोंकी बदलती भुमिका- समय की माँग,धार्मिक क्षेत्रोंकी वास्तविकता,पावित्र्य और सफाई, वृक्षवल्ली हमारे संबंधी, इन लेखोंद्वारा लेखिकाका सामाजिक खयाल और आंतरिक हलचल दिखाई देती है।इसमें उन्होंने सामाजिक समस्याओंपर प्रकाश डाला है। महत्वपूर्ण बात यह है की ऊन्होंने इसपर उपाय भी बतायें है। विज्ञान की अध्यापिका होने के कारण खून का दान (रक्तदान) का महत्त्व वे जानती है। कायक रक्त, रक्त दासो, इसमेंसे वह प्रकट होता है। रसायनशास्त्र और मानवीजीवन, चंद्रयान और अपेक्षा और परिणाम ( वेध ) जलसहयोग मद्दे और आव्हान, अणुऊर्जा सामर्थ्य और धोखे,इन लेखोंद्वारा परीपूर्ण जानकारी देने का इमानदारपूर्वक प्रयास कीया है। लेखिकाकी लेखनशैली भी प्रभावी, प्रवाही और अच्छी है।मनमें आए हुए खयालोंको सहज रुप में प्रकट कीया है। " स्पंदन " के माध्यमसे अत्यंत सटिक भाषा में लिखा है। मुखपृष्ठ पर दिखाई देनेवाले बंदिस्त तितलियाँ बडे ऊल्हास से, मुक्तभावसे बाहर आकर अपने खयालरुपी पंखोंको फडफडाकर अपने मनके खयालोंका प्रसार कर रहे हैं यह बडे समर्पक भाव से दर्शाया गया है। लेखिकाके मनका ही यह प्रतिबिंब है, जो इस किताब के रुप से प्रकट हुआ है। सामाजिक कार्य करनेवाले लोगोंके साथ साथ युवावर्ग को भी  इस किताब ने विचारप्रवण बनाया है। महाराष्ट्र शासन का अनुदान प्राप्त यह किताब कवितासागर प्रकाशन ,जयसिंगपूर के प्रकाशक डॉ. सुनिलदादा पाटीलजीने  लेखसंग्रह अत्यंत आकर्षक रुप में प्रकाशित कीया है। उनका भी गौरव करना चाहीए। ऐसेही मार्गदर्शन लेखन आनेवाले भविष्यकाल में भी लेखिका की तरफ से हों ऐसी शुभकामनाएँ । ऊनकी कलम ईसीतरह और मुक्कमल हासिल करती जाए।

किताब परीक्षण
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
कुरुंदवाड. जिला.कोल्हापूर
9881862530

Friday, 18 January 2019

चित्रचारोळी ( स्वाभिमानी )

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

स्वाभिमानी

काट्याकुट्यांचा तुडवित रस्ता
झाकून लज्जा स्वाभिमानी माता
लेकरु बांधून पोटाला सुरक्षित
मोळी डोई घेऊन निघाली आता

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

चारोळी ( डान्सबार )

स्पर्धेसाठी

चारोळी

डान्सबार

छमछम डान्सबारची सुरु झाली
मोदाने कुणी खेदाने प्रकटले 
संस्कृती चा बोलबाला आठवला
सत्तेसमोर सर्व मौनात गोठले.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

चित्रकाव्य ,बालकाव्य ( कागदी होडी )

चित्रकाव्य स्पर्धेसाठी

कागदी होडी

पेपर कागदाचा,
आकार घेऊ लागला.
घड्या घड्या घालत,
ऊलगडू लागला.

दिवस पावसाचे,
बरसला जोरदार.
साचले तळे,डबके,
पाणी साचले भारंभार.

चिखलयुक्त पाणी,
रंग त्याचा लालसर.
कागदाची नाव आता,
तरंगते पाण्यावर सरसर.

इंग्रजी भाषेची अक्षरे,
शोभती नावेवर छान.
प्रतिबिंब पडले पाण्यात,
शोभे होडी कागदी लहान.

तीन दिशांच्या तीन होड्या,
मार्ग आपला शोधती.
निरोप घेऊन एकमेकांचा,
मार्गक्रमण त्या करती.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Wednesday, 16 January 2019

अभंग ( मानवता )

शांतरस

        अभंग रचना

       मानवता

शांतता या जगी ।
नांदावी नेहमी ।।
कशाची ना कमी ।
असावीच ।। ७ ।।

नको प्राणीहत्या ।
पाळा भूतदया ।।
सिद्ध पाळावया ।
होऊयात ।। ८ ।।

अनाथांच्या प्रती ।
गरज प्रेमाची ।।
सहानुभूतीची ।
जगतात ।। ९ ।।

प्रेमाच्या या गावा ।
जाऊया सगळे ।।
रुप हे आगळे ।
पाहुयात ।। १० ।।

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
9881862530

Tuesday, 15 January 2019

रुबाई ( हसीना )

  हसीना

देखकर तेरा ये हुस्न ,
कायल मैं हो गया हसीना ।
बिना बर्फ के शराब से भी,
न छुटा मुझे पसीना।

Sunday, 13 January 2019

अष्टाक्षरी ( माझे बाबा )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

विषय - बाबा / पिता / बाप

भूपाल दिवटे ।
नांव वडीलांचे ।।
स्थान आदराचे ।
सदा असे ।।१।।

सुंदर अक्षर ।
असती तयांचे ।।
रुप भावनांचे ।
स्पष्ट दिसे ।। २ ।।

सोज्वळ दिसती ।
शब्दांचा वापर ।।
नेहमी सुधार ।
सहजच ।। ३।।

शांतच स्वभाव ।
शब्द समर्पक ।।
भावनांचा अर्क ।
बहरतो ।। ४ ।।

साधीच राहणी ।
ऊच्च ते विचार ।।
तसाच आचार ।
नेहमीच ।। ५ ।।

विद्यार्थी घडले ।
संस्कार घेऊन ।।
लेणं ते लेऊन ।
वावरती ।। ६ ।।

वंदन त्रिवार । 
बाबा मी करते ।।
तुम्हाला स्मरते ।
रात्रंदिन ।। ७ ।।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

बालकविता ( खारुताई )

खारुताई

सरसर सरसर झाडावर,
चढते , ऊतरते वेगाने.
खारुताई खारुताई,
असे कसे गं तुझे जिणे?

तुरुतुरु पळते सगळीकडे,
टुलुटुलू बघते जगाकडे.
थांब की जरा क्षणभर ,
डोळे भरुन पाहू दे तुझ्याकडे.

शेपटी कीती झुपकेदार,
आवडते मला बाई फार.
मऊमऊ , लुसलुशीत तू,
नजर तुझी आहे धारदार.

पट्टे अंगावर शोभती छान,
करडे पिवळे काळेभोर.
दिला आशीर्वाद म्हणे रामाने,
भाग्यवान बाई तू बिनघोर.

काय हवा खाऊ तूला ?
आवडते काय सांग तूला.
हळूहळू खात जा जरा,
लगेच लागू नको पळायला.

मैत्री करशील का माझ्याशी?
दोघी मिळून खूप खेळू .
पाठशिवी खेळताना मग,
एकापाठोपाठ खूप पळू.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 12 January 2019

चारोळी ( गौरव माँ जिजाऊंचा )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- गौरव माँ जिजाऊंचा

धन्य माँ जिजाऊ राजमाता थोर
तव निर्मिला छावा शिवबा शूर
स्थापण्या स्वराज्य हिंदवी जगती
दिला शत्रूचा कर्दनकाळ वीर

© रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( निवडणूक)

अष्टाक्षरी

निवडणूक

निवडणूक आली आता
आश्वासन खोटे देत
फिरतील नेते दारी
जनतेला भुलवित

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

अष्टाक्षरी ( उघड्यावरचे जग )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

अष्टाक्षरी

विषय - उघड्यावरचे जग 

अधांतरी संसारात
आगतीकतेचे जग
उघड्यावरचे जिणे
जगण्याची तगमग

विटांवर विराजला
भाकरीचा तवा गोल
मातेच्याच हातातल्या
भाकरीला नाही मोल 

अग्निज्वाळा भडकल्या
पोटासह विस्तवात
भाजीविणा गोड लागे
नाही दिसे अस्तित्वात

मोजकीच भांडी देती
जीवनाला हो आधार
नको मोह अन् माया
तुमचीच रे मदार

गुंग माता स्वैपाकात
पोरे दोन्ही आसपास
समाधानी भाव दिसे
मुखावर प्रेमभास

फिके यापुढे वैभव
महालात फार चिंता
सहजच झोप येते
दगडावरती आता

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( धन्य जिजाऊ )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- धन्य जिजाऊ

धन्य जिजाऊ राजमाता थोर
प्रसविला राजा शिवबा शूर
करण्या निर्दालन शत्रूचे
घडविला कर्दनकाळ वीर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 10 January 2019

बालकाव्य ( प्रकाशातील तारे )

बालकाव्यलेखन स्पर्धेसाठी

विषय - प्रकाशातील तारे

चला मुलांनो चला चला ,
ओळख तुम्हाला करुन देते .
माहीत आहे का तुम्हाला,
प्रकाशातील चमचम तारे ते .

माता आपली जिजाऊ,
शिबाबाची ती मातोश्री.
घडविले शिवरायांना,
झाली जीवनाची इतिश्री.

भेटुया ज्योतिबांना ,
सावित्रीच्या लेकींना .
दूर केला अज्ञान अंधार,
पसरवले ज्ञानाला.

बाबा आमटे पहा जरा,
प्रकाशातील खरे तारे.
आणला उजेड जीवनी,
महारोगी होते सारे.

सिंधुताई सपकाळ आई,
नमस्कार तिजला करुया.
अनाथांचे पुसले डोळे,
मार्ग तिचा स्विकारूया.

हेच असती जीवनातील,
हसरे प्रकाशीत तारे.
ठेऊ आदर्श डोळ्यासमोर,
हाच पाठ तुम्ही घ्या रे.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

अष्टाक्षरी ( वृक्षछाया मोहवते )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

चित्रकाव्य

वृक्षछाया मोहवते

आज माझ्या दारी मला
वृक्षछाया मोहवते
सहजच पसरली
शिरावर मोद देते

शांत निवांत समयी
आरामात विसावली
माय अंगणी आनंदी
प्रेमभरे सुखावली

घनगर्द तरुराज
माथ्यावर विसावला
सावलीने झोपडीला
आधारच गवसला

संसाराच्या आसऱ्याला
चंद्रमौळी ही सजली
पर्णसंभाराच्या खाली
अलवार आनंदली

पडे फीका महाल ही
मिळे न सौख्य असले
निसर्गाच्या सानिध्यात
दु:ख येई ना कसले

किमयाच निसर्गाची
तंत्रज्ञान कमी पडे
बांधू म्हटले आजही
बुद्धी तोकडी ही पडे

डेरेदार पर्णछाया
सुखावते लोचनांला
ऐट भारी वाकन्याची
प्रेमभावे बिलगला

सुख हेच भारी आहे
नको मजला संपत्ती
ऑक्सिजन भरपूर
नाही कुठली आपत्ती

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

षढाक्षरी ( कनक- पारस )

स्पर्धेसाठी

षढाक्षरी

विषय--  कनक-पारस

कनक-पारस
जोडी ही सुंदर
काय दडलय
दोहोंच्या अंदर

सुवर्ण बनते
परीस स्पर्शाने
लोखंडाला मग
पूजती मानाने

परीसस्पर्शाने
होते माती सोने
हवी प्रयत्नांची 
पराकाष्ठा घेणे

कनक - पारस 
हेच घट्ट नाते
कधी नाही तुटे
अखंड राहते

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Sunday, 6 January 2019

चारोळी ( मी सावित्री )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - मी सावित्री

मी सावित्री ध्येयनिष्ठ ज्योतीबांची
आखिल स्त्रीजातीची ऊद्धारक
पत्करुन विरोध सनातनी धर्माचा
रचला पाया झाले स्त्रीशिक्षा प्रचारक

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 3 January 2019

अष्टाक्षरी ( क्रांतिकारी ज्ञानज्योत )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

विषय- क्रांतिकारी ज्ञानज्योत

ज्ञानज्योत क्रांतिकारी
माता तू सावित्रीबाई
क्रांतीज्योती तू अससी
तूच उद्धारक माई

केला सांभाळ सहज
माते बालविधवांचा
सांभाळून ती संतती
निर्धाराने पाळण्याचा

यशवंत धन्वंतरी
बनवीला धाडसाने
साथ प्लेगाची ती आली
ऊपचार संयमाने

बालहत्या प्रतिबंध
गृह उभारुन दिला
खरा दिलासा स्त्रीयांना
रोष समाजाचा आला

संप घडवी न्हाव्यांचा
दिले हो समजावून
फीरु लागले कर्मठ
दाढी मिशा वाढवून

पाया शिक्षणाचा खास
स्त्रीयांसाठी हो घातला
सन्मानाचे हारतुरे
देऊ केले स्त्री-जातीला

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

चारोळी ( सावित्रीबाई फुले )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- सावित्रीबाई फुले

बनून ज्ञानज्योती, क्रांतीज्योती
पेटवलीस तू मशाल ज्ञानाची
ओलांडून उंबरठा परंपरेचा
कास धरलीस तू स्त्री- शिक्षणाची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर