Friday, 30 March 2018

मन ( कविता )

काव्यधारा काव्यसमूह आयोजित महाकाव्य स्पर्धेसाठी

विषय -- मन

मन असते प्रत्येकालाच ,
व्यक्त करण्या आपले विचार.
ठरते व्यक्तीत्व सर्वांचे ,
जसे असतील तुमचे आचार .

मनामध्येच असतात सा-या ,
भावनांच्या विचारधारा .
व्यक्त करुन सुखी रहावे ,
हाच आहे विचार खरा .

नका दाबू विचार मनातले ,
प्रकट करा दिलखुलासपणे.
तणावरहित जीवन मग ,
जगा तुम्ही निरलसपणे .

असेल मन आनंदित तर ,
शरीर सुखाने नाचते .
नाही निमंत्रण आजाराला ,
आरोग्य ईथे सदा नांदते.

मनमयूर नाचू द्या मुक्तपणे ,
अभिव्यक्ती विचारांची होऊ द्या.
आनंदाने जगता जीवन ,
बेभान होऊनी जगी राहू द्या .

     कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.४१६१०६
९८८१८६२५३०

Thursday, 29 March 2018

आई ( कविता )

शीर्षक -- आई

माय माझी माझा अभिमान,
गर्व माझा माझी प्रेरणा .
वादळातल्या तारुला ,
देते पुढे जाण्यास चालना.

संकटे आली कीतीही ,
शब्द तीचे सात्वनांचे .
संघर्षातही उभारी देतात ,
बोल तीच्या अंतरीचे .

पडले कष्ट कीतीही ,
घडवण्या तीच्या मुलांना .
सहजच सोसते ती माता ,
धरुन पोटाला पिलांना .

कर्तव्य आपले नेकीने ,
करते सर्वांना सांभाळून .
जबाबदारी आता आपली ,
सांभाळू तीला जीव ओवाळून.

नका दाखवू वाट वृद्धाश्रमाची ,
नका पाहू परीक्षा ममतेची .
नाही थोर जगी आईशिवाय ,
अतुट माया ही मगझ्या आईची .

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

चारोळी ( वैशाख )

शब्दरसिक ई मासिकाच्या चारोळी स्पर्धेसाठी चारोळी

विषय - वैशाख

वैशाख वणवा जाळतोय
अंगाअंगाची लाही होते गं
सूर्यदेवाला आरती करु
वृक्षारोपण आता करु गं

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर. ९८८१८६२५३०

बंधमुक्त खेळ ( कविता )

शब्दांकुर काव्यसमुहातर्फे प्रकाश वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त  काव्यस्पर्धेसाठी चित्रकाव्य

             कविता

शिर्षक --  बंधमुक्त खेळ

ना राम येथे ना रहीम ,
आहे फक्त मानवता .
खेळ खेळता क्रिकेटचा ,
गळून पडली जातीयता .

नको मैदान ना नियम ,
विटांचीच बरी यष्टी .
व्हायला नको कधीच ,
कुणी येथे दु:खी कष्टी .

आनंद मानू बंधुभावनेत ,
रमू सगळे या खेळात .
घेऊ स्नेहाने सगळ्यांना ,
आज आपल्या या मेळात .

टोलविताना द्वेषाचा टोला ,
प्रेमाने जग जिंकुया .
पकडण्या सुखाची खेळी ,
प्रयत्न पराकाष्ठा करुया .

ना भगवा ना पांढरा ,
आड येई आपल्या .
बंधमुक्त खेळ हा खेळू ,
जागवू बंधुता मनामनात .

  कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

Sunday, 25 March 2018

षटकोळी ( सत्यवचन )

उपक्रम
षटकोळी

विषय - सत्यवचन

एकवचनी एकपत्नी श्रीराम
सत्यवचन सदा बोले
बंधुप्रेमाचे सुंदर उदाहरण
माता पित्यांच्या आदेशाने
निघाला पहा वनवासात
प्रणाम करु आनंदी मनाने.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

Saturday, 24 March 2018

आठोळी ( प्राजक्त )

उपक्रम

प्राजक्त

सडा अंगणी प्राजक्ताचा
गंधीत झाले हे वातावरण
जणू अंथरली दुलई धरेवर
धवल केसरी ह्या अंगणी

मंद सुगंध दरवळला
मने गंधीत झाली
प्रितीसुमने अधरावरती
लिलया बहरु लागली.

  रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

षटकोळी ( कल्पकता )

षटकोळी

विषय -- कल्पकता

कल्पनेच्या पलीकडे आहे
मनोराज्याची कल्पकता
सहज मनी अवतरले
शब्दरसिकांचे सुंदर शब्द
तोलून मापून घेऊ या
कल्पनेचे सुंदर ते इमले.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

लेक लाडकी ( स्त्री - भ्रूणहत्या )

स्पर्धेसाठी

   फेरी क्र.   -- ४

     कोड क्र.--  VBSS KP 13

विषय -- स्त्री - भ्रूणहत्या

शिर्षक -- लेक लाडकी

प्रथा वाईट समाजातल्या ,
विचाराला मिळाली चालना.
हेच जीवन म्हणजे बाई का ?
मज नेमके उत्तर सापडेना.

लेक लाडकी घरी आली ,
पदरवाने घर पावन केले.
बापाचं काळीज आपसूकच ,
काळजीने विचार करु लागले.

वाचून व्यथा अन्यायाच्या ,
रोजच्याच त्या बलात्काराच्या.
फक्त आणि फक्त मादीच्या ,
चिंधड्या उडाल्या विचारांच्या .

जरी आदर्श माता झाल्या ,
सावित्री, अहिल्या, जिजाऊ .
कुणाच्या भरवशावर आता ,
लाडकीला मी बाहेर पाठवू ?

मन केलं दगडासारखं ,
चाहूल लागताच लेकीची .
चिरडून टाकली गर्भातच ,
होरपळ झाली हृदयाची .

    श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

कोड क्र.-VBSS KP 13

Thursday, 22 March 2018

प्रेम

स्पर्धेसाठी

विषय -- प्रेम

प्रेम तुझे नी माझे ,
असेच अलवार फुलुदे .
संसारात सतत आपल्या ,
आनंदी वातावरण राहुदे .

प्रेमरुपी भावनांना आता ,
वात्सल्याची साथ लाभू दे .
संसार वेलीवर सहजच ,
गोड फुले दोन फुलू दे .

साथ मिळाली आजवर ,
अशीच अखंड मिळू दे .
दोघांच्याही प्रेमाचे गान ,
नित्य सर्वांच्या ओठी राहू दे.

अभिसारीका तू माझी ,
मी तुझाच ग राही दास,
होतोय आज मला खूप ,
आपल्या प्रीतीचा गोड भास.

उदंड आयुष्य लाभू दे ,
उभयतांची जोडी बहरु दे .
अभिष्टचिंतनाचा वर्षाव आता ,
सतत बरसतच राहू दे .

    कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

Wednesday, 21 March 2018

अष्टाक्षरी ( अशी असते कविता )

स्पर्धेसाठी

       अष्टाक्षरी

विषय - अशी असावी कविता

कशी असावी कविता ?,
प्रश्र्न मनाला पडले .
सहजच गोंधळले ,
शब्द मग ओघळले .

भावनांचा गोतावळा ,
विचारांचे ते वादळ .
शब्द नौका सागरात ,
शोधू लागली ओंजळ .

शब्दांजली प्रकटल्या ,
रित्या मनाच्या अंगणी .
शब्द फुले सुगंधीत ,
झाली मनाच्या कोंदणी .

प्रसवल्या वेदनांच्या ,
कळा सोसून कल्पना .
बाळ सुंदर जन्मले ,
नांव कविता ठेव ना .

आता कळले मजला ,
अशी असते कविता .
धन्य झाले मन माझे ,
तोच कर्ता करविता .

        कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर .

Tuesday, 20 March 2018

हायकू ( चिऊ वाचवा )

हायकू

स्पर्धेसाठी

विषय - चिऊ वाचवा

चिऊ वाचवा
संख्या कमी हो फार
आता वाढवा

ही चिव चिव
ऐकायला हवी
करा हो कीव

प्रमाण कमी
नकाच होऊ देऊ
द्या तुम्ही हमी

दारात पाणी
चिऊताई ला ठेवा
गातील गाणी

उन्हाळा फार
बसतात चटके
जिवाला घोर.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , या. शिरोळ ,
जिल्हा . कोल्हापूर

Sunday, 18 March 2018

चारोळी -- चैत्र पाडवा

स्पर्धेसाठी

    चारोळी

विषय- चैत्र पाडवा

सण हा मोठा भाग्याचा
आला हा चैत्र पाडवा
गुढ्या उभारुया दारी
आला वाणीत गोडवा.

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड या. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 17 March 2018

अष्टाक्षरी ( भारतीय संस्कृती )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

भारतीय संस्कृती

आध्यात्मीक त्या गुरुंचे
आहे हे माहेरघर
भारतीय ही संस्कृती
आहे खास खरोखर

पुरातन ही संस्कृती
परंपरा , चालीरीती
एकत्रीत जुळलेली
विश्र्वातील नातीगोती

घडवणे अनुकूल
देह , मन ,वापरून
पर्यटक येती इथे
गुंग होती हो बघून

आहे महान जगात
भारतीय ही संस्कृती
अभिमान यांचा मला
हीच माझी खरी माती.

जय जवान , किसान
घोष  ईथला हा न्यारा
जगी झाली थोर अशी
मज असे देश प्यारा.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड या. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 11 March 2018

षटकोळी ( संघर्ष )

उपक्रम

षटकोळी

संघर्ष

संघर्ष आहे जीवन
लढायचे आहे मला
नविन एक रस्ता मला
दाखवायचा आहे जगाला.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

घोषवाक्य स्पर्धा

स्पर्धेसाठी

घोषवाक्य

विषय - नारी तुझी कहाणी

समजून घ्या इतिहास
नारीच्या सक्षमतेचा
पाठपुरावा करा आता
महिलेच्या कर्तृत्वाचा

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 7 March 2018

षटकोळी ( धावपळ )

स्पर्धेसाठी

         षटकोळी

      विषय - धावपळ

जगत असताना जीवन
धावपळ करावीच लागते
कीती दमणूक झाली
तरीही लढावेच लागते
नका घाबरून जाऊ
यशस्वीता हाती आली

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ता.. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Tuesday, 6 March 2018

षटकोळी ( रंगाची बरसात )

राज्यस्तरीय षटकोळी स्पर्धा

विषय - रंगाची बरसात

न्हाऊन जाऊया आज
आहे रंगाची बरसात
स्नेह , प्रेमाच्या रंगात
भिजू , भिजवू सर्वांना
साजरी करु रंगपंचमी
माणुसकीच्या अनोख्या ढंगात

    रचना
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

षटकोळी ( व्यभिचार )

उपक्रम
षटकोळी

व्यभिचार

ठरवून दिलाय जगण्याचा
मूलमंत्र एक न्यारा
थारा नको व्यभिचाराला
संस्कारांची कास धरु
स्वत:बरोबर घडवू नक्की
सुंदर बणवूया देशाला.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Monday, 5 March 2018

षटकोळी ( आकांक्षा )

उपक्रम

आकांक्षा

असते मनात नेहमी
आकांक्षा यशस्वी होण्याची
प्रयत्नांची जोड दिल्याने
पूर्ण  मनीची आस
सहजच होते पूर्ण
जिद्दीने यश मिळवल्याने

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

चारोळी ( महिलांचा सन्मान)

स्पर्धेसाठी

   महिलांचा सन्मान

आदिमाया आदिशक्ती तू जननी
सन्मान जगी आदिकालापासून
ठाम विश्वास तुझ्या कर्तृत्वावर
स्वत:ला सिद्ध कर सर्वांपासून

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Sunday, 4 March 2018

चारोळी ( नजर )

उपक्रम

नजर

एका नजरेचा खेळ सगळा
भाव मनीचे समजायला
बोलून जातात डोळेच सर्व
नाही लागत वेळ उमजायला

  रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

आठोळी ( सावली )

स्पर्धेसाठी

सावली

कधी सुखाची कधी भयाची
रोज असे सोबत सावली
स्विकारु आनंदाने दोघींना
भयाला छान परतवली

सावली साथ सोडत नाही
कडक उन्हात जवळ येते
संध्यासमयी दूर ती जाते
हळूच तिला  पाहून घेते.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

दैवत छत्रपती (कविता )

स्पर्धेसाठी

विषय - दैवत छत्रपती

धन्य जाहला शिवनेरी ,
जन्म घेतला शिवरायांनी .
माता जिजाऊ जन्मदात्री ,
बाळकडू दिले शहाजीराजांनी .

मुशीत घडले राजमातेच्या ,
आदर्श सखा हा मावळ्यांचा .
प्रतिभाशाली , शक्तीशाली ,
घडला राजा जनतेचा .

हृदयात पेटली होती ,
ज्योत ती स्वाधिनतेची .
संघटीत मावळे सर्वजातीचे ,
धगधगत्या स्वामीभक्तीची .

शपथ घेतली रायरेश्वराची ,
शत्रू हा त्या मुघलांचा .
जिंकून घेऊन तोरणा गड ,
पाया रचला स्वराज्याचा .

स्त्रीजातीचा सन्मान सदोदित ,
आदर्श दैवत ठरले जगासमोर .
ज्वलंत उदाहरण आजही आहे,
झुकती माना आदर्शासमोर .

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर.

Saturday, 3 March 2018

आठोळी ( भय )

उपक्रम

  आठोळी

विषय - भय

नसे मजला भय कोठले
माते तुझ्याच या छायेखाली
बिनधास्त मी बिनघोर मी
तुझ्याच गं कृपाक्षत्राखाली

तूलाही नसावे भय माझे
तूझाच मी आधार सर्वदा
माझे जीवन तूझ्याच पायी
माथा लावतो पायी शतदा.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

चारोळी ( शिष्टाचार )

खेळ चारोळ्यांचा समुह आयोजित चारोळी स्पर्धेसाठी

विषय - शिष्टाचार

समाजमान्य वागण्यातून
येतोय जन्माला शिष्टाचार
कशाला हवीत ती बंधने
आपणच सुधारु आचार.

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Friday, 2 March 2018

चित्रचारोळी

स्पर्धेसाठी

   चित्रचारोळी

बरसात रंगाची आज
एकमेकांवर करूया
कोरड्या रंगाची आता
आज उधळण करूया

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

रंगोत्सव ( चित्रकाव्य )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

   रंगोत्सव

रंगात रंगूनी जाऊया ,
आनंदाने नाचूया .
लाल पिवळा निळा ,
हिरवा केसरी घेऊया .

बरसात रंगाची आज ,
एकमेकांवर करूया .
कोरड्या रंगाची आज ,
आता उधळण करूया .

वाचवूया आपण पाणी ,
झटकून टाकूया रंग .
रंग काढण्यासाठी मात्र ,
चला भिजवूया अंग .

निखळ या आनंदाचा ,
काय वर्णू मी सोहळा .
सर्वांच्याच मनात पहा ,
रंगांचा कारंजा आगळा .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर

षटकोळी ( होळी रंग पाणी )

स्पर्धेसाठी

     षटकोळी

विषय - होळी पाणी रंग

होळीच्या या सणात
वापरु नका पाणी
नैसर्गिक रंग वापरून
पर्यावरणीय होळी खेळा
करा नायनाट वाईटाचा
घ्या माणुसकी सावरुन

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ता. शिरोळ
जि. कोल्हापूर

आठोळी (वलय )

आठोळी

उपक्रम

विषय -  वलय

संघर्षातून यशाकडे
दु:खातून सुखाकडे
पूर्ण होते वलय
ओढ असते पूर्णत्वाकडे

पृथ्वी ही गोल आहे
हेच पूर्ण वलय आहे
रात्रीनंतर दिवसाचे
ऊगवणे मात्र नक्की आहे .

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

रंग वसंताचे ( कविता )

स्पर्धेसाठी

विषय - रंग वसंताचे

आला आला वसंत ,
रंग घेऊन रंगबिरंगी .
थंडी गेली दूर पळून ,
जोम संचारला नवा अंगी .

झाडे हिरवीगार झाली ,
नविन आलेल्या पालवींनी .
फळांनीही गर्दी केली ,
मोहवीत आपल्या रंगांनी .

ऋतूराज वसंत आला ,
होळीच्या रंगात न्हाला .
शिवरात्रीच्या आगमनाने ,
वसंत राग तो गाऊ लागला .

आनंद पसरला चोहीकडे ,
उत्साहाला भरते आले .
धरती ही फुलली प्रेमाने ,
साजशृंगार करून झाले .

नाचू-गाऊ फेर धरु ,
वसंत रंगात न्हाऊ .
एकमेकांच्या हृदयात ,
प्रेम माणुसकी ठेऊ .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Thursday, 1 March 2018

षटकोळी ( रंग तुझ्या प्रेमाचा )

षटकोळी
उपक्रम

रंग तुझ्या प्रेमाचा

आठवणीत राहतो सदैव
प्रेरणा देत असतो
रंग तुझ्या जीवनाचा
नको करु बेरंग
रंगीबेरंगी सुंदर जीवन
विसर पाडतोय जगाचा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जि. कोल्हापूर

आठोळी ( घटका )

उपक्रम

आठोळी

विषय --  घटका

नका घालवू वेळ हा भारी
वापरा एक न एक घटका
नाहीतर बसेल सहज
जीवाला तुमच्याच चटका

घटका असतात सगळ्या
अतिशय महत्त्वाच्या फार
नको समजू फालतू त्यांना
नाहीतर जीवाला हो घोर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर.