उपक्रम - 1
कविता
ऋणानुबंध
ऋणानुबंध जीवनातील
असतात स्मरणात राहणारे
कधी आपोआप जुळलेले
तर कधी जुळवून पाहणारे
ऋणानुबंध समाजातील
सामाजिक आस्थेने बांधलेले
धार्मिक प्रथेनी पोसलेले
भावनिक भावानांनी जोडलेले
ऋणानुबंध कुटुंबातील
प्रेम,जिव्हाळ्याने सांधलेले
एकमेकांना सावरण्यासाठी
सतत कटिबद्ध असलेले
ऋणानुबंध विद्यामंदिरातील
गुरु-शिष्यांना जोडणारे
सरस्वती चे ज्ञान देण्यास
सदैव उत्सुकतेने धडपडणारे
ऋणानुबंध मातृभूमीचे
देशवासियांनी जपलेले
प्राण हाती घेऊन देशरक्षण्या
रात्रंदिवस लढण्यास आसुसलेले
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment