Monday, 22 June 2020

कविता ( तुझी साथ असेल तर )

उपक्रम

तुझी साथ असेल तर

तुझी साथ असेल तर ,
हटणार नाही मी मागे.
येणाऱ्या सर्व संकटांना,
करेन मी आधीच जागे.

तुझी साथ असेल तर,
सतत मी पुढेच जाणार.
आदर्श घ्यावा कुणीतरी,
अशीच प्रेरणा मी बनणार.

कौटुंबिक जबाबदाऱ्यातून,
समाजकार्य करतच राहीन.
जमेल तेवढी जमेल तिथे,
सहकार्य करतच पुढे जाईन.

हक्काबरोबर कर्तव्याची 
जाणीव मनात ठेवणार.
आदरणीय व्यक्तींना सतत,
नजरेसमोरच आणणार.

उंच पर्वत कार्याचा नेहमी,
आनंदाने वाढवतच नेणार.
जगापुढे एक वेगळाच 
आदर्श सर्वांसमोर दाखवणार.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment