कविता
नाजूक बंधन
नाजूक बंधन प्रितिचे,
असते अलवार जपायचे.
ठेवून भरवसा एकमेकांवर,
हसत हसत फुलायचे.
गुंफून हात एकमेकात,
जीवनबागेत फिरायचे.
कर्तव्याच्या फुलांवर,
अलवारपणे झुलायचे.
प्रेमगीत गाताना आळवू,
स्नेहबंधातील तराणे.
आयुष्यातील चढ उतारांचे,
गावे सुंदर सुंदर गाणे.
लोचनातून व्यक्त होती,
भावनांचे कोमल मोती.
गुंफून हार प्रेमळ मनी,
संवेदना हृदयी होती.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment