यशवंत काव्य लेखन स्पर्धा,२०२० स्पर्धेसाठी
काव्यप्रकार- अभंग (छोटा अभंग)
विषय- यशवंत
शिर्षक- माझे बाबा
नांव तयांचे भूपाल
शोभे जणू गुणपाल ।।१।।
आदर्शाचा देती पाठ
संस्काराचा परीपाठ ।।२ ।।
झाले जगी यशवंत
पुण्यवान शिलवंत ।।३।।
मोत्यासम हस्ताक्षर
केले सर्वांना साक्षर ।।४।।
संघर्षमय जीवनी
यशच नेहमी मनी ।।५।।
यशवंत शिल्पकार
दिला सर्वांना आकार ।।६।।
प्रज्ञावंत केली मुले
जणू ज्ञानवंत फुले ।।७।।
दान शिक्षणाचे दिले
ज्ञानासक्त घडविले ।।८।।
समाधानी आयुष्यात
आदर्शच भविष्यात ।।९।।
आम्हा सर्वस्व असती
सदा देवच दिसती ।।१०।।
आशिष राहो शिरी
माणिक आनंदे उरी ।।११।।
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment