Wednesday, 10 June 2020

कविता (स्वप्नपरी )

उपक्रम

स्वप्नपरी

स्वप्नात ती आली
गोड छान परी
हसत बोलते 
मौज वाटे उरी

निळे निळे डोळे 
लुकलुकती हो
लाल लाल ओठ 
डाळिंब दाणे हो

हाती धरे छडी
जादू करण्याला 
जंतर मंतर
लागे म्हणायला

लांब लांब झगा
पांढरा पांढरा
नक्षी शोभे छान
हळूच पसरा

इवलेसे बूट 
पायात शोभते
चमचम करी 
सुंदर दिसते

केस मखमली 
कुरळे कुरळे 
फुलांची त्यावर 
पसरले जाळे

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment