महास्पर्धेसाठी 2020
चतुर्थ फेरी
काव्यप्रकार- बालकविता
विषय-आई माझी
आई आई बघ ना इकडे,
चेहरा गोड गोड सुंदर तुझा.
आवडतो मला खूप खूप बाई,
आवडतो तुलाही चेहरा माझा.
रोज लवकर उठतेस सकाळी,
मलापण झोपेतून जागं करतेस
लोटझाड करुन रांगोळी घालतेस
दिवसभर कामातच असतेस.
आवडता मी तुझा बंड्या,
कधी पिल्लू तर कधी लेकरु.
पाठीवर देतेस शाबासकी,
आनंदाने नाच मी कीती करु?
माझा आवडता शिरा बनवते,
वेगळा खाऊ मला करुन देते.
माझी आवड जपतेस तू,
मला भरवून मग तू जेवते.
चिऊकाऊच्या गोष्टी सांगून,
झोपवतेस मला तू प्रेमाने.
माझी आई मला आवडते,
सांगतो मी सर्वांना कौतुकाने.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment