Sunday, 7 June 2020

कविता अष्टाक्षरी (स्त्री-मुक्ती )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

फेरी क्रमांक-- 3

चित्रकाव्य

शिर्षक-- स्त्री-मुक्ती

नारा ऐकून मुक्तीचा,
नारी पेटून उठली.
दासत्वाची आडगाठ,
आज सहज सुटली.

हात राक्षसी दिसला,
नखे टोचण्या धावली.
टोकदार लालसर,
पशुसम ती भासली.

धाडसाने तोडल्या मी
दोन विषारी नखांना.
केले निर्बल धीराने,
जागी होउन धोक्यांना.

मुक्त आज झाले पहा
फास बाजूला सारला.
स्त्रीत्व जपले कष्टाने,
तारु स्वत्वाचा तारला.

ओलांडून दुष्ट छाया,
हिमतीने स्त्रीमुक्तीच्या.
बाला निधड्या छातीची,
जाणिवेने स्त्रीशक्तीच्या.

शुभ्र वसने लेवून,
मुक्त केशसंभाराची.
प्रेरणेच्या ज्योतीसम,
नाही आस आभाराची.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment