Tuesday, 30 June 2020

चारोळी ( नागपंचमी )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय-- नागपंचमी

खरा मित्र पोशिंद्याचा करी रक्षण
सण नागपंचमीचा करु औक्षण 
पूजा नागोबाची लाह्या, दुधाने 
संवर्धन यांचे हेच उत्तम लक्षण

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( वचन )

चारोळी

वचन

शब्द पाळणे होते वचनबद्धता 
वचनानेच सुरवात आयुष्याची 
निभावण्यासाठी जीवन खर्ची 
तरच नांदी सुखमय भविष्याची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( विठ्ठल )

उपक्रम

चित्रचारोळी

विठ्ठला

कर कटेवरी उभा हा विठ्ठल
कानी कुंडल गळा हार छान
भाळी चंदनटिळा मागे प्रभावळ 
पडछाया मागे पंढरीचा मान 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 29 June 2020

चारोळी ( उंबरठा ओलांडून )

उपक्रम

चारोळी

विषय-उंबरठा ओलांडून

      1

उंबरठा ओलांडून आली लक्ष्मी
सोडून आपले सगेसोयरे दूर 
मिळावा मानसन्मान स्नेहाने
मगच पालटेल तिचा नूर

        2

ओलांडून उंबरठा निघाली नार
करण्या पादाक्रांत यशवाटेला 
नाही अबला,ती सबला जगी 
नका अडवू तिच्या अग्नीवाटेला 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( करार )

चारोळी

करार

नात्यात हवाच कशाला करार? 
कोणत्या व्याखेत बसवावे याला
करार म्हणजे अविश्वासार्हता 
अर्थ उरत नाही मग जगण्याला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( बाल आनंद )

चित्रचारोळी

बाल आनंद

ना उपमा बाल आनंदाला 
स्नेहबंध टपके जलातून
निरागसता बंधूप्रेमाची बरसे
सचैल न्हाणे दिसे पाण्यातून 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू (आकाशाच्या अंगणी )

हायकू

आकाशाच्या अंगणी

नील गगन
आकाशाच्या अंगणी
नभ प्रांगणी

लुकलुकत्या
तारका प्रकाशती
आनंद देती

चांदण्या रात्री
सफर चांदोबाची 
चैन जीवाची

रजनीनाथ 
धरतीला सुखावे 
हसत जावे

ग्रह नक्षत्र
ज्योतिषात मांडती
दैव सांडती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 28 June 2020

अष्टाक्षरी चारोळी (मृगधारा )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी चारोळी

विषय- मृगधारा

आस मृगधारांचीच
धरतीला आज लागे 
तळपत्या भास्कराची 
आच,तृष्णा नच भागे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर

काव्यांजली ( आई )

स्पर्धेसाठी

द्रोणकाव्य रचना

विषय-- आई

देवस्वरुप आई
 नमस्कार करु
  गंधीत जाई
   फुलांतली
    प्रेमाई
     माय
       ती

वात्सल्याची सरीता
 ममता सागर
  क्षीर दुहिता
   प्रेममयी
   सविता
     माय
       ही

अवर्णनीय रुप 
 सौंदर्याची खाण
   देते हुरुप
    जगण्याचे
       स्वरुप
         त्राता 
           हो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 27 June 2020

चारोळी (दान )

चारोळी

दान

दान देऊन सत्पात्री साधावे
समाधान अंतरंगात आपल्या
नाजूक, संवेदनशील आठवणी
आपोआप जातील जपल्या

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (प्रयत्न )

चारोळी

प्रयत्न

प्रयत्न हवा संघर्षाच्या जगात
त्याशिवाय गोडी नाही जगण्यात
हवी जोडीला विनयशीलता
संवेदनशीलता वागण्यात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (मन )

उपक्रम

अष्टाक्षरी चारोळी

विषय-मन

असे कसे माझे मन
साहित्यात गुंग होते
काव्य लिहताना रोज
सद्यस्थिती विसरते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( फुलांचा सडा )

हायकू

फुलांचा सडा

फुलांचा सडा
अंगणात पडला
टपटपला 

विविध रंगी
रंगीबेरंगी फुले
आनंदी मुले

 सुगंधालय 
वातावरणातला 
मस्त दिसला

भासे रजई
भूवरी पसरली 
फुले फुलली

सुंदर दृश्य
नयनी सुखावले
मना भावले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 26 June 2020

चारोळी ( जीवन )

उपक्रम

चारोळी

जीवन

जीवन सुंदर आहे सांगा जगाला
नको उदासी हवी सकारात्मकता
दम हवा मणगटात अन् मनात 
निघून जाईल नकारात्मकता

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 25 June 2020

चित्र हायकू (किमया न्यारी )

चित्रहायकू

किमया न्यारी

किमया न्यारी
निसर्गाच्या जगात
नल युगात

फळांचा राजा
लगडला वृक्षाला
मोह मनाला

बीज अंकुरे 
आंब्यातून डोकावे
वरती जावे

कोवळे पर्ण
लालसर रंगाचे
छान वर्णाचे 

कैरी का आंबा
प्रश्न मनी पडला
धरी टेकला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 24 June 2020

चारोळी( अंकुर )

उपक्रम
चारोळी

अंकुर

बीज रुजले मातीत खोल 
अंकुर टरारुन वर आला 
पाहता इवलेसे रोप छान
जीवा आनंद फार झाला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 23 June 2020

हायकू(बांबूचे बेट )

हायकू

बांबूचे बेट

बांबूचे बेट
उंचच वाढलेले
वर गेलेले

वारा वाहतो
बेटातून बांबूच्या
तारा मनाच्या

नसे हा वृक्ष
वनस्पती हरित
असे गवत

वाढ वेगात
पाठबळ आर्थिक
नसे खर्चिक

खाद्य प्राण्यांचे
इमारत बांधण्या
सोपे वाढण्या

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( कल्पना )

चारोळी

कल्पना

कल्पनेच्या कुंचल्याने 
रंगवली अकल्पित कल्पना
सहजच ओढले फटकारे रंगाचे
उतरली कागदावर नवीन रचना

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 22 June 2020

हिंदी कविता ( बारीश )

प्रतियोगिता के लिए

बारीश

बारीश का मौसम सुहावना,
लगता है कभी-कभी डरावना।
जोरशे बादल ऐसे बरसे,
देखते ही रह गया सारा जमाना।

पशुपक्षी सब भिगकर सिकुडे,
थंड से काँपने लगे थरथर।
है जरुरत खाने की उन्हें भी,
देना चाहिए उन्हें पेटभर।

बहने लगे सारे जलस्त्रोत,
उफान धरती पर नदीका।
बरसात की बुँदोंको लपेटकर,
दौडणे लगा कीनारा सागरका।

धरती ने ली अंगडाई देखो,
रुप निखरा फलफुल पत्तोंसे।
बोले कोयल कुहुकुहु बानी,
सुमधुर लगे पुराने कीश्तोंसे।

बरखा बरसीँ झमझमसे,
आये नये आयाम जीवनको।
हँसीखुशी से स्विकार करो तुम
तणावरहित जीवन जीनेको।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( तुझी साथ असेल तर )

उपक्रम

तुझी साथ असेल तर

तुझी साथ असेल तर ,
हटणार नाही मी मागे.
येणाऱ्या सर्व संकटांना,
करेन मी आधीच जागे.

तुझी साथ असेल तर,
सतत मी पुढेच जाणार.
आदर्श घ्यावा कुणीतरी,
अशीच प्रेरणा मी बनणार.

कौटुंबिक जबाबदाऱ्यातून,
समाजकार्य करतच राहीन.
जमेल तेवढी जमेल तिथे,
सहकार्य करतच पुढे जाईन.

हक्काबरोबर कर्तव्याची 
जाणीव मनात ठेवणार.
आदरणीय व्यक्तींना सतत,
नजरेसमोरच आणणार.

उंच पर्वत कार्याचा नेहमी,
आनंदाने वाढवतच नेणार.
जगापुढे एक वेगळाच 
आदर्श सर्वांसमोर दाखवणार.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

दशपदी(पाऊस)

उपक्रम

दशपदी

पाऊस

आला पाऊस मुसळधार 
भिजले चिंब सारे घरदार

आला शहारा अंगावरी 
घालमेल होते तिच्या उरी

गारवा लपेटला शरीरावर 
हवा वाटे जवळी अंगार 

रानोमाळ सहजच भिजले
कोंब जमीनीत रुजले 

वृक्ष उद्याचा जमिनीत खोल
देई छाया कीती अनमोल 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू (हात मातीचा )

हायकू

हात मातीचा
गुंते एकमेकांत
आपापसात

हात पोपटी
पानांनी बहरला
छान दिसला 

खोल रुतते
मूळ भूगर्भातच
प्रयत्नातच

दहाही बोटे
एकमेका रुतली
घट्ट गुंफली

देती संदेश
राखण निसर्गाची
पुढे नेण्याची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 21 June 2020

हायकू ( ग्रहण काळ )

हायकू

ग्रहण काळ

ग्रहण काळ
घटना भौगोलिक 
आहे मौलिक

सूर्यग्रहण
कंकणाकृती झाले
सर्वा दिसले 

सुंदर दृश्य
नयन सुखावले 
नभी पाहिले

प्रकाशमय 
चमक डायमंड 
दिसे अखंड

अंधविश्वास
मानवजात पाळे 
सत्य न कळे 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी(करावा योग )

चारोळी

विषय- करावा योग

योगदिन साजरा योगासनाने 
करावा योग नित्यनियमाने 
लक्ष ठेवून श्वासावरती रोखावा 
राहू तंदुरुस्त प्राणायामाने 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 19 June 2020

हायकू ( अंधाराचे कवच )

हायकू

अंधाराचे कवच

काळोख्या रात्री
कवच अंधाराचे 
काल करांचे 

तम दाटला
भयचकीत चित्र
नाहीच मित्र

तेजस्वी तारे
चांदण्या आकाशात
अंधारी मात

गोल चंद्रमा
चमकतो नभात
जातो ढगात

सकाळ होता
रजनीकांत जातो
भास्कर येतो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( लेक )

चित्रचारोळी

लेक

काठापदराची नेसून साडी करी
मायलेक श्रीगणेशा शिक्षणाचा
घरीच राहून शिकायचे आता 
क्षण असे मातेच्या कौतुकाचा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 17 June 2020

चारोळी( तंत्रज्ञान )

चित्रचारोळी

तंत्रज्ञान

आडोशाला पिंजाऱ्याच्या ढीगाच्या
तंत्रस्नेही युवती लीन कामात 
लाल वसने शोभे सुंदर अंगावर 
पदराआड चेहरा लॅपटॉप हातात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

अभंग ( माझे बाबा )

यशवंत काव्य लेखन स्पर्धा,२०२० स्पर्धेसाठी

काव्यप्रकार- अभंग (छोटा अभंग)

विषय- यशवंत

शिर्षक- माझे बाबा

नांव तयांचे भूपाल
शोभे जणू गुणपाल ।।१।।

आदर्शाचा देती पाठ 
संस्काराचा परीपाठ ।।२ ।।

झाले जगी यशवंत
पुण्यवान शिलवंत ।।३।।

मोत्यासम हस्ताक्षर
केले सर्वांना साक्षर ।।४।।

संघर्षमय जीवनी
यशच नेहमी मनी ।।५।।

यशवंत शिल्पकार
दिला सर्वांना आकार ।।६।।

प्रज्ञावंत केली मुले
जणू ज्ञानवंत फुले ।।७।।

दान शिक्षणाचे दिले
ज्ञानासक्त घडविले ।।८।।

समाधानी आयुष्यात
आदर्शच भविष्यात ।।९।।

आम्हा सर्वस्व असती 
सदा देवच दिसती ।।१०।।

आशिष राहो शिरी
माणिक आनंदे उरी ।।११।।

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( जल प्रवाह )

हायकू

जल प्रवाह

जल प्रवाह
निरंतर वाहतो 
गीतच गातो

सागर तीरी 
जलप्रवाह येतो 
शंख आणतो 

जल प्रपात
उंचावरुन पडे
सर्वत्र खडे 

रानात वाहे 
झुळझुळ पाणी
आनंद मनी

नलिकातून
दारादारात आले
घडे भरले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 15 June 2020

चारोळी(प्रेम खरचं असतं )

चारोळी

प्रेम खरंच असतं

अवेळी कवटाळून मरणाला 
क्षणभंगुर जीवन दाखवताना
प्रेम खरंच असतं का यांचे ? 
स्वकीयांच्या भावना दुखावताना

रचना
श्रीमतघ माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( ओल्या आठवणी )

चारोळी

ओल्या आठवणी

करपून गेले जीवन जरी 
राहिल्यात मागे ओल्या आठवणी
ओलाव्यातूनच आशा फुलते 
करुन सद्वर्तनाच्या साठवणी 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी( अंतरीचा ध्यास )

चारोळी

अंतरीचा ध्यास

अंतरीचा ध्यास लागला असा 
मायबापाच्या दर्शनाचा मला 
कृपाछत्र सदा शिरावर राहो 
नात्यांचा गोतावळा जमला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 14 June 2020

कविता (आई माझी )

महास्पर्धेसाठी 2020

चतुर्थ फेरी

काव्यप्रकार- बालकविता

विषय-आई माझी

आई आई बघ ना इकडे,
चेहरा गोड गोड सुंदर तुझा.
आवडतो मला खूप खूप बाई,
आवडतो तुलाही चेहरा माझा.

रोज लवकर उठतेस सकाळी,
मलापण झोपेतून जागं करतेस
लोटझाड करुन रांगोळी घालतेस
दिवसभर कामातच असतेस.

आवडता मी तुझा बंड्या,
कधी पिल्लू तर कधी लेकरु.
पाठीवर देतेस शाबासकी, 
आनंदाने नाच मी कीती करु? 

माझा आवडता शिरा बनवते,
वेगळा खाऊ मला करुन देते.
माझी आवड जपतेस तू,
मला भरवून मग तू जेवते.

चिऊकाऊच्या गोष्टी सांगून,
झोपवतेस मला तू प्रेमाने.
माझी आई मला आवडते,
सांगतो मी सर्वांना कौतुकाने.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 13 June 2020

चारोळी * (बांध)

चारोऐ

बांध

बांध घालून मनोविकारांना
सत्यमार्ग आत्मसात करुया
फोडण्या बांध उत्सुक सारे 
काळजी आपली आपणच घेऊया

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू (उन-पाऊस )

हायकू

उन-पाऊस

उन-पाऊस
खेळ सुंदर चाले
ढग चालले

इंद्रधनुष्य
सप्तरंगी आकाशी
नभी प्रकाशी 

छान कमान
मोहवती मनाला
सुख जनाला

निसर्ग खेळ
पाहती नभांगणी
उभे अंगणी

श्रावण धारा
उन्हात बरसती 
रिमझिमती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर

चित्रचारोळी (सजला )

चित्रचारोळी

सजला

केसरी लेहंगा, पोपटी ओढणी
पावसात भिजते कोमल ललना
बरसल्या धारा झाली सजला 
चिंब कुंतल हास्य शोभे वदना

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 12 June 2020

चारोळी (नातं तुझं माझं)

चारोळी

नातं तुझं माझं

नातं तुझं माझं जन्मजन्मांतरीचे
अखेरपर्यंत आहे टिकवायचे 
एकमेकांच्या साथीने असेच 
नकळतपणे फुलवायचे 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( ऋणानुबंध )

उपक्रम - 1
कविता

ऋणानुबंध

ऋणानुबंध जीवनातील
असतात स्मरणात राहणारे
कधी आपोआप जुळलेले 
तर कधी जुळवून पाहणारे 

ऋणानुबंध समाजातील
सामाजिक आस्थेने बांधलेले
धार्मिक प्रथेनी पोसलेले
भावनिक भावानांनी जोडलेले

ऋणानुबंध कुटुंबातील
प्रेम,जिव्हाळ्याने सांधलेले 
एकमेकांना सावरण्यासाठी 
सतत कटिबद्ध असलेले

ऋणानुबंध विद्यामंदिरातील 
गुरु-शिष्यांना जोडणारे
सरस्वती चे ज्ञान देण्यास 
सदैव उत्सुकतेने धडपडणारे

ऋणानुबंध मातृभूमीचे 
देशवासियांनी जपलेले 
प्राण हाती घेऊन देशरक्षण्या 
रात्रंदिवस लढण्यास आसुसलेले

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी(बहर )

चारोळी

बहर

रानीवनी बहरला वसंत 
फुलापानांचा ताटवा डवरला 
सुगंधीत तनमन नाचू लागले 
फळांचाही मोहर फुलारला 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( बालकामगार)

चित्रचारोळी

बालकामगार

बालकामगार व्यसनाच्या अड्ड्यावर
व्यसनमक्तीचा नारा कागदावर
रचताना सिगारेट अर्धनग्नपणे 
करपले बालपण निरागस कट्ट्यावर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 11 June 2020

चित्र हायकू ( कोंब )

चित्र हायकू

कोंब

कोब अवस्था
दवबिंदुंचा खेळ 
जमला मेळ

देठ हिरवा
कळीला सांभाळतो
वारा खेळतो

पोपटी रंग
शोभतो पानाला
सुख मनाला

तीन कलिका
जीवन दर्शवती 
रुपे दिसती

तृप्त दिसती
पिउन जल थेंब 
तांबूस कोंब

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( रानवाट )

चित्रचारोळी

भारा गवताचा घेऊन निघाली 
शेतकरी भगिनी रानवाटेवरी
अनवाणी पाय चालती अखंडित
बिंडा सावरत ,किटली दुधाची करी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

दुहेरी चारोळी (स्वप्नातील भारत )

स्पर्धेसाठी

चारोळी

स्वप्नातील भारत

माणुसकीचा पाठ देणारा 
स्वप्नातील भारत महान देश
विविधतेतून एकता दर्शवणारा 
भिन्न,भाषा,पंथ,जाती,अन् वेष

सर्वधर्मसमभाव दिसावा नित 
विश्वलोकांत वंदनीय असावा
स्वप्नातील भारतात माझ्या 
कलहविरहित बंधुभाव वसावा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 10 June 2020

कविता (स्वप्नपरी )

उपक्रम

स्वप्नपरी

स्वप्नात ती आली
गोड छान परी
हसत बोलते 
मौज वाटे उरी

निळे निळे डोळे 
लुकलुकती हो
लाल लाल ओठ 
डाळिंब दाणे हो

हाती धरे छडी
जादू करण्याला 
जंतर मंतर
लागे म्हणायला

लांब लांब झगा
पांढरा पांढरा
नक्षी शोभे छान
हळूच पसरा

इवलेसे बूट 
पायात शोभते
चमचम करी 
सुंदर दिसते

केस मखमली 
कुरळे कुरळे 
फुलांची त्यावर 
पसरले जाळे

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (नेत्रदान )

चारोळी

नेत्रदान

ज्योत नेत्रदानाची पेटवूया 
अंधाऱ्या जीवनाला प्रकाशमय बनवूया
फुलु देत लोचने आनंदाने
आदर्श नवयुगापुढे ठेवूया

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू (विखुरलेले ढग )

हायकू

विखुरलेले ढग

दिसे आकाशी
ढग विखुरलेले
पसरलेले

विविध रंगी
मोहवती मनाला
मोद सर्वाला

वर पाहता
विविध आकारात
दिसे मनात

सुंदर खेळ
लहान बालकांचा
निरीक्षणाचा

मधे डोकावे
चंद्रमा ढगातून
आकाशातून

वेगे पळती
खेळती लपंडाव
वाऱ्याला भाव

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 9 June 2020

चारोळी (आभाळ )

आभाळ

धरणीने पेलले आभाळ 
सांभाळण्या मानवजातीला
कृतघ्नांनी छळले तिलाच 
भोगती सजा न जागा पश्चातापाला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( जिवलगा )

चारोळी

जिवलगा

जाणून घे गुज मनीचे जिवलगा
नको शब्दांचा फाफटपसारा 
कळतील भाव नयनभावांनी 
फुलेल मनीचा काव्यपिसारा 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( गंध फुलांचा )

कविता

नाजूक बंधन

नाजूक बंधन प्रितिचे,
असते अलवार जपायचे.
ठेवून भरवसा एकमेकांवर,
हसत हसत फुलायचे.

गुंफून हात एकमेकात,
जीवनबागेत फिरायचे.
कर्तव्याच्या फुलांवर,
अलवारपणे झुलायचे.

प्रेमगीत गाताना आळवू,
स्नेहबंधातील तराणे.
आयुष्यातील चढ उतारांचे,
गावे सुंदर सुंदर गाणे.

लोचनातून व्यक्त होती,
भावनांचे कोमल मोती.
गुंफून हार प्रेमळ मनी,
संवेदना हृदयी होती.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( गंध फुलांचा )

हायकू

गंध फुलांचा

गंध फुलांचा
मनी दरवळला
जना कळला 

छान सुगंध
वनी घमघमला
मधु जमला 

भ्रमर आला
शोषण्या मधुरस 
गीत सुरस 

फुलांफुलांत 
परागकण छान
उंचच मान 

सुख डोळ्याला 
रंगीत सुमनांचा 
शांत मनाचा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 8 June 2020

चारोळी (निसर्गाचे दान )

उपक्रम

निसर्गाचे दान 

जपून ठेवायला हवे आपण 
निसर्गाचे दान जाणिवपूर्वक 
नैसगिर्क संपत्ती अनमोल आहे
संवर्धन करुया काळजीपूर्वक 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी(वात्सल्य )

चित्रचारोळी

वात्सल्य

फांदीवर बसून भरवते पिलांना
माता पक्षीणी वात्सल्याने 
आ वासून मागती अन्न चार पिल्लं
चोचीत भरवते आई कौशल्याने

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू (महासागर )

हायकू

महासागर

महासागर
विस्तीर्ण पसरला
प्रवासी आला

बघ्यांची गर्दी
आनंदाने नाचती
मौज करती

शंख शिंपले
विविध रंगातील
मुले घेतील

जहाज डोले
महाकाय लाटांत
नाव नेटात 

खाण रत्नांची
जलचर पाण्यात
मोद जाण्यात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 7 June 2020

कविता अष्टाक्षरी (स्त्री-मुक्ती )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

फेरी क्रमांक-- 3

चित्रकाव्य

शिर्षक-- स्त्री-मुक्ती

नारा ऐकून मुक्तीचा,
नारी पेटून उठली.
दासत्वाची आडगाठ,
आज सहज सुटली.

हात राक्षसी दिसला,
नखे टोचण्या धावली.
टोकदार लालसर,
पशुसम ती भासली.

धाडसाने तोडल्या मी
दोन विषारी नखांना.
केले निर्बल धीराने,
जागी होउन धोक्यांना.

मुक्त आज झाले पहा
फास बाजूला सारला.
स्त्रीत्व जपले कष्टाने,
तारु स्वत्वाचा तारला.

ओलांडून दुष्ट छाया,
हिमतीने स्त्रीमुक्तीच्या.
बाला निधड्या छातीची,
जाणिवेने स्त्रीशक्तीच्या.

शुभ्र वसने लेवून,
मुक्त केशसंभाराची.
प्रेरणेच्या ज्योतीसम,
नाही आस आभाराची.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( गैरसमज )

गैरसमज

समजुतीच्या बाजारात चालू 
गैरसमजांचाच सारा खेळ 
कीतीही समजावलं मनाला 
तरी बसेना कसलाच मेळ 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( बंध रेशमाचे )

चारोळी

बंध रेशमाचे

जपून ठेवायचे मनाच्या कुपीत
आपल्यातील बंध रेशमाचे
नको संशयी वारा समाजाचा
अबोल धागे आहेत जपायचे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 6 June 2020

चारोळी ( विरह )

चारोळी

विरह

विरह सोसवेना सख्याचा 
आठवणींच्या बाजार नुसता 
डावलले कैकदा तरीही येती 
मनमंदीरातून नाही येत पुसता

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 5 June 2020

चित्रचारोळी (वृक्षारोपण )

चित्रचारोळी

वृक्षारोपण

झाडे लावा झाडे जगवा 
वृक्षारोपणाने वटपौर्णिमा साजरी
आधुनिक नारी नवा पायंडा 
अशीच करावी पूजा खरी 

रचना 
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

चित्रहायकू (पर्यावरण )

चित्र हायकू

पर्यावरण

साजरा झाला
पर्यावरण दिन
आज सुदिन

रक्षण करु
साधन संपत्तीचे
कार्य सर्वांचे

धरणीमाता
हातावर तोलली
गोड बोलली

सजली धरा
निळ्याशार रंगात
मोद अंगात

घोषणा दिल्या
रक्षण्यास तगड्या
मस्त रांगड्या

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 4 June 2020

चित्रहायकू ( घरटे )

चित्र हायकू

घरटे

घरटी दोन
टांगलेली झाडाला
काम चोचीला

घेऊन काडी
बांधन्यास घरटे
लोंबे उलटे

बारीक पाती
विणतसे चिमणी
नाजूक वेणी

करडा शुभ्र
चिमणीचा हा रंग
कामात दंग

मन लावून
कलाकुसर छान
योग्य प्रमाण

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाडा, जयसिंगपूर

चारोळी (येतील वादळे जातील वादळे )

चारोळी
येतील वादळे जातील वादळे

संघर्षमय या दुनियेत नक्कीच
येतील वादळे जातील वादळे
स्थितप्रज्ञ राहून लढावे नेटाने
जसे लढले शिवबाचे मावळे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 3 June 2020

चारोळी ( येतील वादळे जातील वादळे )

चारोळी
येतील वादळे जातील वादळे

संघर्षमय या दुनियेत नक्कीच
येतील वादळे जातील वादळे
स्थितप्रज्ञ राहून लढावे नेटाने
जसे लढले शिवबाचे मावळे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हिंदी लेख (पर्यावरण दिन )

5 जून विश्व पर्यावरण दिवस

 विश्व पर्यावरण दिवस संयुक्त राष्ट्र का सबसे महत्वपूर्ण ऐलान है। 1972 में संयुक्त राष्ट्र के महासभा द्वारा यह दिन पर्यावरण दिन के तौरपर मनाने के लिए मान्यता दि गयी की गई ।  इसका मुख्यालय नैरोबी, केन्या में है।  5 जून को पर्यावरण के महत्व के बारे में लोगों को जागरूक करने के लिए अंतर्राष्ट्रीय पर्यावरण दिवस मनाया जाता है।  पर्यावरण और मनुष्यों के बीच संबंध बरकरार रहे यही एक भावना इसके पिछे हमेशा रही है। पर्यावरण याने "वह वातावरण जहाँ हम रहते हैं,जिसमें सजीव, निर्जीव घटक आते हैं,वह पर्यावरण कहलाता है"। पर्यावरण में कार्बनिक और अकार्बनिक तत्व ये दो तत्व हैं। अपनी मांगों को पूरा करने के लिए, मनुष्य ने कई नए आविष्कार किए हैं।उसके लिए मानव को प्रणाम करना होगा। पर्यावरण के बारे में आज अलगसे कहना पडता है,समझाना पडता है। लेकिन
 प्राचीन काल में गुरुकुल प्रणाली के कारण, पर्यावरण को अलग से पहचानने की आवश्यकता नहीं थी।  20 वीं शताब्दी में, गुरु रवींद्रनाथ टैगोर ने एक प्राकृतिक, स्थान पर अनोखे "शांतिनिकेतन" विश्वविद्यालय  की स्थापना की।जिसने प्रकृति के प्रति छात्रों में कृतज्ञता की भावना पैदा करने का काम इस विश्वविद्यालय द्वारा किया गया। प्रकृति को बडे संवेदनशील तरीके से संभाला जा रहा था लेकिन आजकल हम हर जगह बारबार पर्यावरण को नुकसान पहुंचा रहे हैं।  मनुष्य पर्यावरण हानी के साथ साथ पर्यावरण को प्रदूषित कर रहा है।

 आज की मानवीय स्थिति शेख चिल्ली जैसी हो गई है।  हम जिस वातावरण में रहते हैं, उसे हमने नगण्य स्थान देकर उसका नुकसान ही करते जा रहे है। इसके कारण पर्यावरण प्रदूषित हो गया है।  हरसाल अनगिनत पेड़ काट दिए जाते हैं।शहरोंके विकास के नाम पर, हमने वनों की कटाई की और सीमेंट के जंगलो को बढाया। सड़क चौड़ा करने के लिए वनों की कटाई बड़ी मात्रा में की।धरणों के नाम पर कई एकड़ भूमि जलमग्न हो गई है।  साथ ही बढ़ती जनसंख्या का पर्यावरण पर जादा प्रभाव पड़ रहा है।  यह सब पर्यावरण, उसके असंतुलन को प्रभावित कर रहा है।  पर्यावरण दो प्रकार के होते हैं, मानव निर्मित और प्रकृति निर्मित। धर्म, संस्कृति, बढ़ती जनसंख्या, सामाजिक और आर्थिक, सभी मानव निर्मित वातावरण में आते हैं।  निर्जीव वातावरण में जीवित तत्व जैसे कि जानवर, पौधे और प्रकृति में सूक्ष्म जीव होते हैं।  मिट्टी, पानी, पर्यावरण के तत्व हैं।  लेकिन मानव और अन्य जीवित प्राणियों के अस्तित्व को मानव जीवन के हस्तक्षेप से खतरा बहुत बड़ा हो गया है।  अगर हम इंसान निस्वार्थ भाव से रहते, तो हम इस धरती की आवाज़ सुन सकते थे।  सूर्य की अतिनील किरणें वायुमंडल में स्थित ओझोन की परत को पतला कर रहे हैं और उसे क्षती पहुँचा रहे हैं। ग्रीनहाउस से निकलनेवाला सीएफसी वायू और कार्बनडाय ऑक्साईड जैसे गैसों के कारण और  क्लोरोफ्लोरोकार्बन, ओझोन के परत के लिए खतरा पैदा कर रही हैं।जिसके चलते कैंसर जैसी लाइलाज बीमारियों के संपर्क में मानव आ रहा है।मानल जीवन धोके में हैं। इसके बारे में हमें क्या करना चाहिए?यह सोचने का यह समय है।
 हमें पर्यावरण के विभिन्न पहलुओं को संभालना चाहिए। परिसर को साफ रखना, पानी को साफ रखना और संग्रहीत करना, भूमि, जल और जंगलों का संरक्षण करना.इसकी आज खूब आवश्यकता है।  हमें पर्यावरण के अनुकूल होने की,पर्यावरण के बारे में हमेशा सोचने की जरूरत है।  ग्रामीण है या शहरी दोनों भी क्षेत्रों में लोगों को किसी भी प्रकार के प्रदूषण का कारण नहीं होना चाहिए।  पौधों को बड़ी संख्या में लगाया जाना चाहिए।  आधुनिक तकनीक का उपयोग कर जन जागरूकता पैदा की जानी चाहिए और परिवहन के साधनों का शोर कम किया जाना चाहिए।  सरकार कोशिश कर रही है, हमें यह भी महसूस करना होगा कि पर्यावरण की देखभाल करना हमारा कर्तव्य है। प्रकृति हमें बहुत कुछ देती है।  क्या हम अपनी खुद की रक्षा के लिए पर्यावरण की रक्षा नहीं कर सकते? हाँ हम जरूर कर सकते हैं।इसलिए हमें याद रखना चाहिए कि हम ये कर सकते हैं।आज पुरे विश्व में एक वैश्विक महामारी फैली है जिसका नाम है कोरोना,जिसे कोविड-19 भी कहते है।कोरोना की वजह से पूरा विश्व आज बेहाल होकर घर में बैठा है।इसका अच्छा असर पर्यावरण में दिखाई देता है।मानव घर में कैद होने के कारण पर्यावरण को बिगाडनेका मौका उसे न मिलने के कारण पर्यावरण अब साफसुथरा हो गया है। नदियाँ अब गंदी नहीं हो रही है।पंक्षी भी निर्भय होकर चहचहाने लगे है।मोर भी बेझिझक रास्तेपर आकर नाचने लगे हैं।समंदर के किनारेपर भी पशू घुमने लगे हैं। यह देखकर अच्छा लगता है,लेकीन ये सब हमेशा के लिए रहना चाहिए.जब लॉकडाऊन खत्म होगा तब मानव फिरसे पर्यावरण को हानी पहुँचाने के लिए तैयार रहेगा।ऐसा नहीं होना चाहिए।प्रत्येक मानव का यह कर्तव्य है की इस महामारी से कुछ सिखकर पर्यावरण का रक्षण करें।

 वृक्षों को नष्ट मत करो
 पर्यावरण की रक्षा करें जरुर 
आपका भविष्य आपके हाथ 
 ध्यान रखकर पेड लगायें जरूर

 लेखिका

 श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड,
 ता.शिरोळ, जिला कोल्हापूर
  9881862530

Tuesday, 2 June 2020

चारोळी (इतिहास असा घडला )

चारोळी 
इतिहास असा घडला

पुस्तकाच्या पानापानातून कळे
इतिहास घडला भूवरी असा
साक्षिला जेष्ठ नागरिक असती 
बुद्धितेजाने आठवती जशास तसा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( गंध मातीचा )

हायकू
गंध मातीचा

तापली धरा
पाऊस बरसला
मृदगंध हुंगला

गंध मातीचा
मंद सुवास आला
बेभान झाला

भिजली माती 
चिखल रस्त्यावर
आता सावर 

आनंद झाला
मृत्तिकेचा सुगंध
मन बेधुंद

धरा हासली
चराचर नटले 
डोळे मिटले 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर