स्पर्धेसाठी
कविता
कसे जगावे तिने
नाजुक साजुक कायेची,
लेक असुरक्षित पोटामध्ये.
निर्दयपणे चालती हत्यारे,
नाही स्थान तिला जगामध्ये.
जरी आली जगी जन्माला,
दडपण मोठे आईबापाला.
लेक लाडकी प्रेमच देते,
बांधून ठेवते कुटुंबाला.
जागोजागी वासनांध टपले,
सावज शोधण्या आसुसलेले.
कसे जगावे तिने या जगी ?
तन धास्तीने आक्रसलेले.
कधी हत्या तर कधी हल्ला,
मारण्या,जाळण्या आतुरलेले.
नाही लागता हाती त्यांच्या,
क्रूर पशू जणू वखवखलेले.
सुरक्षित ती ना घरी ना दारी,
स्वसंरक्षण उपाय एकच नामी.
पाडून मुडदे नामर्दांचे येथे,
एकच एक्का असे हुकमी.
कसे जगावे नकोच प्रश्न हा,
रणरागिणी बनून जगावे.
हिमतीच्या जोरावर आपल्या,
स्थान आपले टिकवावे.
कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment