Wednesday, 25 March 2020

कविता ( गुढी मांगल्याची )

स्पर्धेसाठी

कविता

विषय- गुढी मांगल्याची

शिर्षक-- नूतनवर्ष


गुढी मांगल्याची उभारुन,
नूतनवर्ष आज करु साजरे.
नवसंकल्पांना धरुन हाती,
सदाचार आचरु मिळून सारे.

स्वच्छतेची कास धरुनी,
आरोग्यसंपन्न होऊ या.
नव्यापिढीला नवतेजाचा,
भारत देश हा सोपवूया.

नकोच आजार अन् रोगराई,
नकोच शितयुद्ध हे विषाणूंचे.
कीती राबतील बंधुभगिणी,
प्रश्न उभे त्यांच्याच जीवनाचे.

संचारबंदी पाहून जनता,
नजरअंदाज करत आहे.
बाहेर पडून लागण रोगाची,
घरात स्वतःच्या आणत आहे.

संकल्प नववर्षादिनी करा,
आदेश माणून शासनाचा.
टाळून स्पर्श एकमेकांचा,
संसर्ग टाळू कोरोनाचा.

गुढी मांगल्याची चढवू,
घराघरात स्नेहभाव वाढवू.
माणुसकीचे झरे आटलेले,
पुन्हा प्रयत्नाने इथे वाहवू.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

No comments:

Post a Comment