स्पर्धेसाठी
विषय -- होळी
आला होळीचा सण,
गोड गोड पोळी खाऊ.
हात धरून हातात सर्वांचे,
एकीचे गीत आज गाऊ .
गाणी गाऊ परिवर्तनाची,
आळस,अवगुण होळीत जाळू
रक्षण पर्यावरणाचे करु,
वृक्षावीण सारे लागले होरपळू
नको लाकडे,नको गोवऱ्या,
होळी छोटीच बरी रे.
दान करुन होळीची पोळी,
पाडू नवीन रीतीच्या सरी रे.
राग,द्वेष अन् मोहाची,
होळीत आहुती देऊ या.
माया,ममता,प्रेमाची ज्योत
मनामनात आपण पेटवूया
थंडी दूर पळाली अलगद,
चाहूल ग्रीष्माची सुखावह.
होलिकोत्सवाला अंगीकारुन
पळवूया कोरोना भयावह.
कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment