Wednesday, 11 March 2020

कविता ( संस्कार आणि संस्कृती )

स्पर्धेसाठी

विषय - भारतीय संस्कृती

बंधु-भगिनी घोष इथला,
जगात साऱ्या दुमदुमला.
भारतीय संस्कृतीचा डंका,
सहजतेने जगी वाजला.

अतिथी देवासमान मानती,
आदरसत्कार मनोभावे करती
घास ताटातला स्वतःच्या,
परक्याची तोंडी घालती.

होती मानली जात माता,
आपल्याच सभोवतालची.
नव्हते होत अत्याचार कधी,
चाड होती स्त्री च्या अब्रुची.

विविध जाती अन् धर्माचे,
गुण्यागोविंदाने राहती जन.
आपसूकच खुलते मन 
पुलकित होते भाबडे मन.

थोर माता आत्मविश्वासाने,
वाढवती पुत्राला स्वयंतेजाने.
थोर महात्म्ये राजे झाले,
राज्य केले स्वयंप्रेरणेने.

मान ठेवून वडीलधाऱ्यांचा,
आशिर्वाद घेती लहानथोर.
सडासारवण हर अंगणी शोभे
रांगोळीचा खुलुन दिसतो मोर

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment