Monday, 30 March 2020

कविता ( तक्रार )

तक्रार

तक्रार सांगायची नाही,
मिळाला हा संस्कार बाईला.
राबताना रोजच पाहते ,
चिमुकली आपल्या आईला.

उसंत घ्यायची असते थोडी,
डोक्यातच कधी घेतले नाही.
राबण्यासाठीच जन्म आपला,
तक्रार कधीच केली नाही.

वाव नाही दिला तक्रारीला,
रोजच ऐकून घ्यावे लागते.
कींमतच नाही तिच्या कामाला
सर्व काळ जुंपलेलीच असते.

फुकटची मोलकरीणच जणू,
आव असतो घरादाराचा.
नसली एक दिवस जरी,
तिळपापड होतो सर्वांचा.

जाऊन सुट्टीवर दाखवून द्यावे
महत्त्व आपले पटवून द्यावे.
तक्रार कोण कुणाकडे करणार
उत्तर तक्रारीचे शोधून घ्यावे.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment