उपक्रम
कविता
माझ्या काव्यलेखनाची सुरुवात कशी झाली.
समाजसेवा अंगी भिनली,
बालपणी बाळकडू मिळाले.
राष्ट्र सेवादलाचा पिंड माझा,
वडीलांच्या कडून ते आले.
सहवास थोर व्यक्तींचा लाभला
विचाराने त्यांच्या प्रभावित झाले
गोडी वाचनाची लागली छान
पुस्तकांचे मग दालन वाढले.
विचारांचा गुंता वाढत गेला,
भावनांचा कल्लोळ उठला.
व्यक्त होण्या धडपडू लागले,
शब्दांचा मग पाट वाहिला.
लेख,काव्य अन् कथा प्रसवल्या
मनावरचा हलका मनावरचा.
प्रकाशित होउन पसरल्या जगी
वर्षाव कोतुकांचा वाचकांचा.
स्फुरण आले,लेखणी झरली,
चरित्र संग्रह नावे झाला.
कवितासंग्रह मग दौडत आला
दुसरा चरित्र संग्रह प्रकाशला.
नांव साहित्यिक दरबारी,
समाधान मनास मिळाले.
समाजसुधारणेपायी लेखन,
सदैव लखलखतच राहिले.
बस आता आणखी काय हवे ?
अशीच घडो साहित्य सेवा.
मिळो वाचकाला सदोदित,
विविधांगी हा साहित्य मेवा.
कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment