Monday, 30 March 2020

कविता (सध्या मी काय करते )

मी सध्या काय करतेय

सध्या मी बंदिस्त घरात,
कोरोनाला घालवण्यास
स्विकारली संचारबंदी खुशीने
नाही जागा तक्रार करण्यास

सार्थकी लागला वेळ रिकामा,
साहित्यसेवेस वेळ मिळाला.
वाचन,लेखन, चालू झाले,
प्रतिभेचा मौसम बहरला.

दिला वेळ कुटुंबीयांना,
सुखदुःख घेतले वाटून.
समजून घेतले एकमेकांना,
सुखी मन सारे ऐकून.

संभाषणास वेळ दिला,
नातेवाईक, मित्रमैत्रिणींना.
जाणून घेतल्या व्यथा वेदना,
सारले बाजूला माझ्या दु:खांना

कल्पनाशक्तीने घेतली भरारी,
साहित्य प्रकार सारे हाताळले
अवघड कीती,सोपे कीती,
कसे लिहावे आता कळाले.

मदत वृद्धाश्रमास करण्या,
आवाहन केले जनतेला.
सत्वर हात धावून आले,
समाधान वाटले मनाला.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment