Tuesday, 31 March 2020

चारोळी ( फुललेली प्रीत )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- फुललेली प्रीत

फुललेली प्रीत बहरली मनी
सहवासात येता प्रियजनांच्या 
जाणून घेता गुज मनीचे खास
 पक्क्या झाल्या भिंती नात्यांच्या

रचना ©️®️
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 30 March 2020

चारोळी ( संशय )

चारोळी

संशय

विश्वासाच्या आधारावर बनते
अतुट नाते धरेवर मानवाचे 
संशयाची सुई उध्वस्त करते
उंचच उंच इमले जीवनाचे 

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

कविता (सध्या मी काय करते )

मी सध्या काय करतेय

सध्या मी बंदिस्त घरात,
कोरोनाला घालवण्यास
स्विकारली संचारबंदी खुशीने
नाही जागा तक्रार करण्यास

सार्थकी लागला वेळ रिकामा,
साहित्यसेवेस वेळ मिळाला.
वाचन,लेखन, चालू झाले,
प्रतिभेचा मौसम बहरला.

दिला वेळ कुटुंबीयांना,
सुखदुःख घेतले वाटून.
समजून घेतले एकमेकांना,
सुखी मन सारे ऐकून.

संभाषणास वेळ दिला,
नातेवाईक, मित्रमैत्रिणींना.
जाणून घेतल्या व्यथा वेदना,
सारले बाजूला माझ्या दु:खांना

कल्पनाशक्तीने घेतली भरारी,
साहित्य प्रकार सारे हाताळले
अवघड कीती,सोपे कीती,
कसे लिहावे आता कळाले.

मदत वृद्धाश्रमास करण्या,
आवाहन केले जनतेला.
सत्वर हात धावून आले,
समाधान वाटले मनाला.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( शुद्ध हवा )

हायकू

शुद्ध हवा

शुद्ध हवेचा 
सुंदर परीसर
मन मंदिर

लावून झाडे
संवर्धन करुया
श्वास घेवूया

राखू स्वच्छता
पळवू रोगराई
साफसफाई

आरोग्यासाठी
फीरायलाच जावू
स्वास्थ्य मिळवू

फुफ्फुसे घेती
शुद्ध हवा नाकाने
जगू दमाने

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( तक्रार )

तक्रार

तक्रार सांगायची नाही,
मिळाला हा संस्कार बाईला.
राबताना रोजच पाहते ,
चिमुकली आपल्या आईला.

उसंत घ्यायची असते थोडी,
डोक्यातच कधी घेतले नाही.
राबण्यासाठीच जन्म आपला,
तक्रार कधीच केली नाही.

वाव नाही दिला तक्रारीला,
रोजच ऐकून घ्यावे लागते.
कींमतच नाही तिच्या कामाला
सर्व काळ जुंपलेलीच असते.

फुकटची मोलकरीणच जणू,
आव असतो घरादाराचा.
नसली एक दिवस जरी,
तिळपापड होतो सर्वांचा.

जाऊन सुट्टीवर दाखवून द्यावे
महत्त्व आपले पटवून द्यावे.
तक्रार कोण कुणाकडे करणार
उत्तर तक्रारीचे शोधून घ्यावे.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Saturday, 28 March 2020

कविताकविता लेखनाची सुरवात

उपक्रम

कविता

माझ्या काव्यलेखनाची सुरुवात कशी झाली.


समाजसेवा अंगी भिनली,
बालपणी बाळकडू मिळाले.
राष्ट्र सेवादलाचा पिंड माझा,
वडीलांच्या कडून ते आले.

सहवास थोर व्यक्तींचा लाभला
विचाराने त्यांच्या प्रभावित झाले
गोडी वाचनाची लागली छान
पुस्तकांचे मग दालन वाढले.

विचारांचा गुंता वाढत गेला,
भावनांचा कल्लोळ उठला.
व्यक्त होण्या धडपडू लागले,
शब्दांचा मग पाट वाहिला.

लेख,काव्य अन् कथा प्रसवल्या
मनावरचा हलका मनावरचा.
प्रकाशित होउन पसरल्या जगी
वर्षाव कोतुकांचा वाचकांचा.

स्फुरण आले,लेखणी झरली,
चरित्र संग्रह नावे झाला.
कवितासंग्रह मग दौडत आला
दुसरा चरित्र संग्रह प्रकाशला.

नांव साहित्यिक दरबारी,
समाधान मनास मिळाले.
समाजसुधारणेपायी लेखन,
सदैव लखलखतच राहिले.

बस आता आणखी काय हवे ? 
अशीच घडो साहित्य सेवा.
मिळो वाचकाला सदोदित,
विविधांगी हा साहित्य मेवा.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 25 March 2020

कविता ( गुढी मांगल्याची )

स्पर्धेसाठी

कविता

विषय- गुढी मांगल्याची

शिर्षक-- नूतनवर्ष


गुढी मांगल्याची उभारुन,
नूतनवर्ष आज करु साजरे.
नवसंकल्पांना धरुन हाती,
सदाचार आचरु मिळून सारे.

स्वच्छतेची कास धरुनी,
आरोग्यसंपन्न होऊ या.
नव्यापिढीला नवतेजाचा,
भारत देश हा सोपवूया.

नकोच आजार अन् रोगराई,
नकोच शितयुद्ध हे विषाणूंचे.
कीती राबतील बंधुभगिणी,
प्रश्न उभे त्यांच्याच जीवनाचे.

संचारबंदी पाहून जनता,
नजरअंदाज करत आहे.
बाहेर पडून लागण रोगाची,
घरात स्वतःच्या आणत आहे.

संकल्प नववर्षादिनी करा,
आदेश माणून शासनाचा.
टाळून स्पर्श एकमेकांचा,
संसर्ग टाळू कोरोनाचा.

गुढी मांगल्याची चढवू,
घराघरात स्नेहभाव वाढवू.
माणुसकीचे झरे आटलेले,
पुन्हा प्रयत्नाने इथे वाहवू.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Monday, 23 March 2020

हिंदी लेख ( जागतिक काव्यदिन )

मन की भावनाओं को जब हम शब्द रूप देते हैं, तब कविता का जन्म होता है। कविता साहित्य का एक प्रकार है। कम शब्दों में अपने भावों को प्रकट करना कविता की विशेषता है। जब भी कोई कवी, साहित्यिक समाज में कुछ घटनाएं देखते हैं, और वह देखकर जब वह व्याकुल हो उठते हैं, वह घटना शब्दों के माध्यम से लोगों तक पहुंचाने का काम वे कविता द्वारा करते हैं। जबतक वे उसे शब्दोंद्वारा प्रकठ नहीं करते तबतक उन्हें चैन नहीं आता।कविता के अनेक प्रकार हैं। जैसे की चारोली,  वृत्तबद्ध, मुक्तछंद,गेय कविता, गजल, अष्टाक्षरी, अभंग आदि। हर एक प्रकार के अपने अपने नियम होते हैं। उन्हें ध्यान में रखकर लिखना होता है। कविता लिखने के लिए  कविके पास प्रतिभा शक्ति का होना आवश्यक है। अपनी इस प्रतिभा शक्ति के आधार पर कवी अपने मन के विचार शब्दों में  पिरोकर,वृत्तों में बांधकर, शब्दालंकारसे सजाकर प्रकट करता है। साहित्य चाहे कौन सी भी भाषा में हो उसमें कविता का एक अलग स्थान होता है। रविंद्र नाथ टैगोर, कवि कुसुमाग्रज जैसे महान कवियों ने कविता को ऊंचाई का स्थान प्राप्त करके दिया है।  इनका कविता के प्रति सहयोग देखकर शासन द्वारा रविंद्र नाथ टैगोर जी का काव्य संग्रह "गीतांजलि " को नोबेल पारितोषिक भी मिला है। कवि कुसुमाग्रज को ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त हुआ है। जब हम कविता को पढ़ते हैं तब हमें उससे प्रेरणा, प्रोत्साहन मिलता है। स्वतंत्रता संग्राम के पूर्वकाल में भी साने गुरुजी जैसे नेताओं ने अनेक प्रकार के प्रेरणा गीत लिखकर, उन्हें गाकर लोगों को लड़ने की प्रेरणा दी है। कविता द्वारा अच्छे विचार देकर समाज जागृति भी की जा सकती है। तनावग्रस्त या दुखी व्यक्ति भी कविता वाचन करने से अपने मन को शांति प्राप्त कर सकता है। कविता समाज प्रबोधन का एक प्रभावी हथियार है।गेय कविता अच्छी तरह से ध्यान में रहती है। अगर साहित्य में कविता ना होती तो साहित्य निरस हो जाता। हर किसी को कविता लिखने नहीं आती फिर भी जब वह दूसरों के कविता में अपने भाव देखता है तो उसे वह अच्छा लगता है। बच्चों को भी बाल गीत बहुत अच्छे लगते हैं। वे हमेशा उसे गुणगुणाते रहते हैं। जब भी कोई व्यक्ति आनंद में रहता है तब वह कोई ना कोई गीत गाता रहता है।21 मार्च1999 को  युनेस्कोने यह दिन विश्व कविता दिन के तौरपर मनाने की घोषणा की, ताकी साहित्य क्षेत्र में काम करनेवाले कवी,लेखक,प्रकाशक सभी को प्रोत्साहन मिलें। ऐसा कहा जाता है कि जो सूरज भी नहीं देख पाता वह कभी भी पाता है। और यह सही भी है। कविता मन: शांति के लिए, मन की वेदना आनंद प्रकट करने के लिए उपयोगी है। कविता के शब्दों में प्राण है मैं एक ताल,लय है। कवि शब्द सागर में तैरने वाला राजहंस होता है। कवि समाज रूपी सागर को सिर्फ अच्छी बातें और समाज प्रबोधन करता है। कविता चेतनास विचार, आकांक्षा सब कुछ देती है। कविता हर क्षेत्र में एक नया आयाम ढूंढती है। कविता दिलों जोड़ती है।  कविता सबको प्रकृतिप्रेम, भूतदया सिखाती है।इसतरह कविता को सम्मान देने के लिए कविता दिन मनाया जाता है।

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चारोळी ( सलाम शहिदांना )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- सलाम शहिदांना


देशरक्षण्या आहुती प्राणांची
दिलेल्या शुरविरांना वंदन
सलाम शहिदांना अभिमानाने
झिजवली काया जसे चंदन

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Sunday, 22 March 2020

कविता (संचारबंदी )

स्पर्धेसाठी

विषय-मनापासून स्विकारलयं आम्ही कर्फ्यूला

शिर्षक- कर्फ्यू कोरोनाचा

आजच पाळला आम्ही कर्फ्यू
मनापासून स्विकारलयं याला.
आदेश शासनाचा कोरोनासाठी
बंदी बाहेर पडण्या सर्वांला.

तंतोतंत पालन जनतेने केले,
सानथोर सारे घरातच राहिले.
टाळला संपर्क अन् स्पर्श ,
कोरोनापासून अलिप्त झाले.

संचारबंदीने अटकाव केला,
सुरक्षित जीवन जनतेचे.
केले सर्वांनी मिळून आपण,
रक्षण धोक्यातील मानवाचे.

सर्व काही शांत शांत होते,
घरातील संवेदना जागी झाली
ओळख एकमेकांची झाली,
नाती व प्रेमाने गट्टी केली.

मुलाबाळांचे गुणदोष कळाले
कुटुंबाची ओळख पटली.
सारे माझेच आहेत भाव आले
जीवनाची खरी ओळख पटली

मनापासून स्विकारला मी कर्फ्यू
सहकार्य शासनाला केले.
दुसऱ्याबरोबर स्वत:चेही,
रक्षण आम्ही साऱ्यांनी केले.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Friday, 20 March 2020

कविता ( चिऊताई )

स्पर्धेसाठी

कविता

विषय- चिऊताई चिऊताई

चिऊताई

रोज येत होती माझ्या अंगनी,
चिऊताई छोट्या छोट्या सुंदर
पाहून मन माझे हरखून जाई,
आनंदाने नाचे लागू मनमंदिर.

जोडीजोडीने यायच्या दररोज
लोळायच्या मातीत मनसोक्त.
डबके पाण्याचे होते न्हाणीघर
आमच्या घरावर साऱ्या आसक्त.

काळ बदलला, घरे बदलली,
वासे स्थान चिमण्यांचे खास.
शोधून सापडेनात झाडे वेली,
जीवनाचा त्यांना लागला ध्यास


बांधून अधांतरी आता कुठेही
जगतोय आम्ही आगतीकपणे
करुन विनंती दमली चिऊताई
समजून घ्या तिला मानवतेने.

चिऊकाऊची गोष्ट नष्ट होत आहे
पुढच्या पिढीसाठी जतन करुया
पाणी, धान्य ठेवू घराबाहेर
चिमणीला घरी बोलवूया

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर
9881862530

हायकू ( चिमणी )

स्पर्धेसाठी

हायकू

चिमणी

माझी चिमणी
येते माझ्या दारात
हर्ष मनात

लोळे मातीत
 भरपूर पाण्यात
डुंबे मौजेत

करडा रंग
पट्टे अंगावरती
छान शोभती

खाते कीटक
रक्षण पीकपाणी
खरी पर्वणी

पाहूया तिला
घरटी सांभाळूया
पिढी जपूया

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 19 March 2020

कविता (कोरोना- एक आपत्ती )

स्पर्धेसाठी

कविता

कोरोना-एक आपत्ती

येते जेंव्हा एखादी आपत्ती,
तेंव्हाच सारे जागे होतात.
शोधू लागतात उपाय सगळे,
असहाय्य होउन जगतात.

आला कोरोना व्हायरस,
विळखा मानवाला घातला.
स्पर्श संसर्गाने एकमेकांच्या
जिवावरच आता बेतला.

खवखव घशाची सुरवातीला,
लक्षण प्रादुर्भाव करोनाचा.
गरम पाणी, योग्य उपचार,
तडाखा सहन करा उन्हाचा.

नको हस्तांदोलन, नको स्पर्श,
स्वच्छता वारंवार हाताची करु 
नको गर्दीत जाणे प्रवासाला,
घरीच राहून काम करु.

कोरोना एक आपत्ती जगाची,
हतबल मानव निसर्गासमोर.
मारल्या कीती बाता अहंपणे, कस्पट सारे पकृतीसमोर.

मिळून एकदिलाने लढूया,
कोरोनाला पळवून लावूया.
संस्कृती भारताची महान,
तिलाच आपण सांभाळूया.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Wednesday, 18 March 2020

कविता ( पळस )

स्पर्धेसाठी

कविता

शिर्षक-- पळस


ठाव मनाचा घेणारा खास,
लालसर केसरी रंगाचा.
लक्षवेधक वृक्ष दिसतो,
घटक एक हा निसर्गाचा.

पळसफुले मोहवती नजरेला,
जणू भासती पेटत्या ज्वाळा.
गुणधर्म याचे आयुर्वेदिक,
म्हणूनच भासतो हा वेगळा.

तीनच पाने असती याला,
उपयोगात आणती बोलताना.
द्रोण,पत्रावळी करती याच्या,
खास नैसर्गिक ताट जेवताना.

रंगपंचमी सजली रसरंगाने,
बहुआयामी चित्ताकर्षक.
पानगळीने शेवट वाटतो,
फुलकोंबानी वाटे जणू चषक.

ऋणात राहू करु संवर्धन,
देतो शितलता पेटत्या उन्हात.
बहरुन ,फुलून मोहवू दे,
मनमोहक दिसू दे रानावनात.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर
9881862530

Tuesday, 17 March 2020

चारोळी ( तुझा माझा वारा )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय-तुझा माझा वारा

उनाड तुझा माझा वारा
खेळतो शब्दांच्या झुल्यावर
साहित्यिकांच्या प्रतिभेतून
अलवार प्रकटतो कागदावर

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चारोळी ( माझा जीव )

उपक्रम

चारोळी

 माझा जीव

भयग्रस्त वातावरणात झाला
घाबराघुबरा माझा जीव 
कोरोनाच्या आठवणीनेसुद्धा
थरथर काया कंपते अतीव

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 16 March 2020

चारोळी ( संसर्ग )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- संसर्ग

विषाणूंच्या संसर्गाने करोना
फोफावला साऱ्या जगभरात
समाजव्यवस्था झाली बेहाल
असहाय्य मानव निसर्गात

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( गुलमोहर )

स्पर्धेसाठी

कविता

हायकू

गुलमोहर

गुलमोहर
लाल केसरी रंग
सारेच दंग

देतो गारवा
मोहवतो मनाला
क्लांन्त जीवाला

दिसे सुंदर
पर्णकुटी केसरी
दु:ख विसरी

लोंबती शेंगा
शोभतो अलंकार
छान शृंगार

झोत उन्हाचा
शांत गुलमोहर
नाचे चकोर

सदाबहार
शोभे पर्णसंभार
मस्त बहार

वैशाखातील
सुखावणारे दृश्य
देव सदृश्य 

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर
9881862530

Saturday, 14 March 2020

कविता (पानगळ )

स्पर्धेसाठी

कविता 

विषय-- पानगळ

पिकलं पान गळणारचं असतं
झाडाला सोडून जाणार असतं
कीती केले प्रेम तरी एकदा,
सोडून सर्वांना जायच असतं

सुखानंतर दु:ख चक्र चालतच असतं
गोलाकार, गरगर फीरतचं असतं
सुखात हुरळून जायचं नसतं
दु:खात नाराज व्हायचं नसतं

पान हिरवे प्रतिक तारुण्याचे
पान पिवळे आहे वार्धक्याचे
हिरवे पान घट्ट पकडे फांदीला
पिवळे पान  धन धरतीचे

शरद ऋतुचा सांगावा घेऊन
देती जागा नवपालवीला 
नवजीवनाची करुन सुरवात
सज्ज वसंताच्या स्वागताला

झाडे ओकीबोकी झाली 
 नवसंजीवनीच्या प्रेमाने
बहर फुलले  पानोपानी
भास्कराच्या साक्षिने

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 13 March 2020

चारोळी ( रंग पंचमीचा )

स्पर्धेसाठी

चारोळी

उत्सव रंगाचा खेळ पंचमीचा

उत्सव रंगाचा खेळ पंचमीचा
तणावात आनंद शोधण्याचा
वैरत्वाशिवाय स्नेहबंधनाचा 
प्रेमकुंचल्याने जीवन रंगवण्याचा

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Wednesday, 11 March 2020

कविता ( संस्कार आणि संस्कृती )

स्पर्धेसाठी

विषय - भारतीय संस्कृती

बंधु-भगिनी घोष इथला,
जगात साऱ्या दुमदुमला.
भारतीय संस्कृतीचा डंका,
सहजतेने जगी वाजला.

अतिथी देवासमान मानती,
आदरसत्कार मनोभावे करती
घास ताटातला स्वतःच्या,
परक्याची तोंडी घालती.

होती मानली जात माता,
आपल्याच सभोवतालची.
नव्हते होत अत्याचार कधी,
चाड होती स्त्री च्या अब्रुची.

विविध जाती अन् धर्माचे,
गुण्यागोविंदाने राहती जन.
आपसूकच खुलते मन 
पुलकित होते भाबडे मन.

थोर माता आत्मविश्वासाने,
वाढवती पुत्राला स्वयंतेजाने.
थोर महात्म्ये राजे झाले,
राज्य केले स्वयंप्रेरणेने.

मान ठेवून वडीलधाऱ्यांचा,
आशिर्वाद घेती लहानथोर.
सडासारवण हर अंगणी शोभे
रांगोळीचा खुलुन दिसतो मोर

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 10 March 2020

कविता ( होळी- कालची आणि आजची )

स्पर्धेसाठी

धुलीवंदन- काल आणि आज
(संस्कार आणि संस्कृती पर्व)


धुळवड साजरी व्हायची काल
प्रेम अन् स्नेहाची खास.
आज होते धुलीवंदन साजरी
फक्त मौजमजेचीच आस.

धुळवडीच्या कार्यक्रमात,
जमती सारे सगसोयरे.
आजच्या धुलीवंदनात,
दंगामस्ती करती सारी पोरे.

जमून सारे शेजारी आस्थेने,
चौकशी व्हायची सुखदु:खांची
आज जो तो बंद घरात
गर्दी फक्त धागडधिंग्याची.

होता मान वडीलधाऱ्यांना,
होळी पेटवून पुजण्याचा.
बाकी सारे आज वाटते,
हवाय आनंद फक्त नाचण्याचा

धुळवड असो की धुलीवंदन,
परंपरेबरोबर पर्यावरण रक्षण.
काळाबरोबर बदलत रहावे,
करुया भक्तीभावाने औक्षण.

प्रेम पूर्वीचे आजही दिसूदे,
धुलीवंदनात निसर्ग वाचूदे.
येणाऱ्या भावी पिढीला,
प्राकृतिक संपदा मिळू दे.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चारोळी ( रंग )

उपक्रम

चारोळी

रंग

लेऊन फुलांच्या माळा बालक
हाती घेऊन रंग रंगला रंगात
कपड्यांसह मनही रंगले छान
सावरण्या भविष्य जोम अंगात

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 9 March 2020

चारोळी (होळी )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- होळी

करु अवगुण,आळसाची होळी
करुन रक्षण पर्यावरणाचे
दान करुन होळीतल्या पोळीचे 
शांत करु पोट भुकेजल्यांचे

रचना ©️®️ 
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( होळी )

स्पर्धेसाठी

विषय -- होळी

आला होळीचा सण,
गोड गोड पोळी खाऊ.
हात धरून हातात सर्वांचे,
एकीचे गीत आज गाऊ .

गाणी गाऊ परिवर्तनाची,
आळस,अवगुण होळीत जाळू
रक्षण पर्यावरणाचे करु,
वृक्षावीण सारे लागले होरपळू

नको लाकडे,नको गोवऱ्या,
होळी छोटीच बरी रे.
दान करुन होळीची पोळी,
पाडू नवीन रीतीच्या सरी रे.

राग,द्वेष अन् मोहाची,
होळीत आहुती देऊ या.
माया,ममता,प्रेमाची ज्योत
मनामनात आपण पेटवूया

थंडी दूर पळाली अलगद,
चाहूल ग्रीष्माची सुखावह.
होलिकोत्सवाला अंगीकारुन
पळवूया कोरोना भयावह.


कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Tuesday, 3 March 2020

चारोळी ( शिवजन्म )

स्पर्धेसाठी 
चारोळी

शिवजन्म

शिवजन्माने पावन महाराष्ट्र
ठरला संरक्षक स्त्री-जातीचा
जातीधर्माच्या छेदून भिंती 
पाया रचला भूवरी स्वराज्याचा 

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चारोळी (अवकाळी पाऊस )

स्पर्धेसाठी

चारोळी

अवकाळी पाऊस

कसा कणा मोडून गेला
हा अवकाळी पाऊस राजा
पोशिंद्याची भाकरी कष्टाची 
खाण्याचीही झालीय सजा 

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Monday, 2 March 2020

कविता (कसे जगावे तिने ? )

स्पर्धेसाठी

कविता

कसे जगावे तिने

नाजुक साजुक कायेची,
लेक असुरक्षित पोटामध्ये.
निर्दयपणे चालती हत्यारे,
नाही स्थान तिला जगामध्ये.

जरी आली जगी जन्माला,
दडपण मोठे आईबापाला.
लेक लाडकी प्रेमच देते,
बांधून ठेवते कुटुंबाला.

जागोजागी वासनांध टपले,
सावज शोधण्या आसुसलेले.
कसे जगावे तिने या जगी ? 
तन धास्तीने आक्रसलेले.

कधी हत्या तर कधी हल्ला,
मारण्या,जाळण्या आतुरलेले.
नाही लागता हाती त्यांच्या,
क्रूर पशू जणू वखवखलेले.

सुरक्षित ती ना घरी ना दारी,
स्वसंरक्षण उपाय एकच नामी.
पाडून मुडदे नामर्दांचे येथे,
एकच एक्का असे हुकमी.

कसे जगावे नकोच प्रश्न हा,
रणरागिणी बनून जगावे.
हिमतीच्या जोरावर आपल्या,
स्थान आपले टिकवावे.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चारोळी ( उशीर )

चारोळी

उशीर

झाला उशीर म्हणून खचू नये
दिलगिरी सारखे औषध नाही
प्रयत्न पुन्हा उशीर न करण्याचा
मिळेल आपोआप मग सर्वकाही

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 1 March 2020

चारोळी ( चाळ )

चारोळी

चाळ

चाळ वाजती छुम छुम छुम
चुकतो ठोका हृदयाचा माझ्या
चाहुल लागते येण्याची सखे
जीव दंगतो हुरहुरीत तुझ्या

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( परीक्षेची तयारी )

स्पर्धेसाठी

चारोळी

परीक्षेची तयारी

तणावमुक्त वातावरणात
करावी परीक्षेची तयारी
सकारात्मकताच येईल कामी
आरोग्यरक्षणाने येईल तरतरी

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर