Friday, 7 September 2018

कविता ( पत्नी पिडीत पती )

स्पर्धेसाठी

कविता

विषय - पत्नी पिडीत पती

शिर्षक - कारभारीण

दिवस सरले नवलाईचे ,
सुरु झाला आता संसार .
माझा मीच न राहीलो ,
जसा दिव्याखाली अंधार .

पुरता ताबा तिने घेतला ,
नकळत माझ्या जीवनाचा .
पार फज्जा उडाला पहा ,
सुखी आरामदायी आनंदाचा .

बाजाराची पिशवी हाती आली ,
यादी भली मोठी सामानाची .
आठवण झाली आपसुकपणे ,
घाण्याला जुंपलेल्या बैलाची .

आजूबाजूला बघायची ,
सोयच नाही मला उरली.
ती कोण ?, भुवया उंचावून,
पूर्वीची सवय नाही सरली .

आहे का उपाय यावर काहीं ,
पत्नी पिडीत पतीसाठी .
विचारतोय मी ज्याला त्याला ,
जोखडातून या सुटण्यासाठी.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment