Sunday, 2 September 2018

कविता ( एक अनामिक भिती )

भयरसस्पर्धेसाठी

एक अनामिक भिती

शहारले सारे शरीर ,
ऐकून आवाज अनोखा .
एक अनामिक भिती ,
मनाचा उघडला झरोखा .

रिपरिप पावसाची चालू ,
पाय चिखलात रुतलेले .
आवाज सरकत होता पुढे,
मन पार गळून गेलेले .

स्पर्श जाणवला शरीराला ,
कीळसवाणा तो चेहरा .
थरारली सारी काया भितीने,
दाटला काळाकुट्ट कोहरा .

हवेत विरली आर्त कींकाळी ,
आसमंतात तशीच विरली .
चराचरात भेसूरता आली ,
काळोख चिरत ती गेली .

एक अनामिक भिती आज ,
काळजात खोल रुतून गेली .
कवडशांच्याही आता खरंच ,
जाणवू लागल्या हालचाली .

कीर्र रात्रीच्या अंधारात ,
रातकीड्यांचा आवाज वाढला.
सरपटणाऱ्या प्राण्यांचाही ईथे,
वावर खूपच सुरु जाहला .

शोधतेय मी विसावा
या अशांत वातावरणात .
एक अनामिक भिती
सतावतेय या काळजात.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment