स्पर्धेसाठी
पाहुणचार
सुहास्यवदने स्वागत करती,
संस्कृती ही थोर भारताची.
पाहुणचार करुनी अतिथींचे,
मुखावर विलसे लकेर हास्याची.
अतिथी देवासम असे इथे,
राव असो वा रंक जरी .
न फीरे तो कधी रित्या हाताने,
यजमान कीती असला दीन तरी.
कार्यक्रम असो वा सणवार,
आगतम् स्वागतम् पाहुण्यांचे.
कसरत चाले सर्वांची खास,
समाधान करण्या पाहुण्यांचे.
कुटुंबात असो वा समाजात,
पाहुणचार करावाच लागतो.
हृदयात एकमेकांच्या सतत,
प्रेमवन्ही पेटवायचाच असतो.
मोठ्यांची पाहून आजची कृती,
बालपण आदर्श घेत असतो.
ठेवण्या आदर्श आपले भविष्य,
अनुकरणीय संदेश द्यावा लागतो.
नको कंजूषी पाहुणचारात,
मुक्तहस्ते हास्य ऊधळूया .
दाखवून आपला हसरा चेहरा,
रंग आयुष्यात दुसऱ्यांच्या भरुया.
अबाधित ठेऊ भारतीय संस्कृती,
गोडवे गाती परकीयही आनंदाने.
हाच आदर्श अंगी बाणवून,
संदेश जगी पोहचवू स्नेहाने.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment