Friday, 21 September 2018

बालकविता ( पुढच्या वर्षी लवकर या )

स्पर्धेसाठी

बालकाव्य लेखन स्पर्धा

विषय - पुढच्या वर्षी लवकर या

गणपती बाप्पा मोरया,
रोज म्हणून पाठ झालयं.
तू आता जाणार घरी तूझ्या,
मला मात्र रडू खूप येतयं.

मोदक लाडू खावून रोज,
नाचलो मी आनंदाने .
चाललास तू सोडून आम्हाला,
मन भरून आलयं दु:खाने .

मारल्या आम्ही शाळेला दांड्या,
नाचलो, बागडलो तुझ्यासमोर.
दिवस कसे छान गेले बाप्पा,
ऊद्यापासून हजर शाळेसमोर .

पुढच्या वर्षी लवकरच या,
वाट पाहतो तुमची गणराया.
जरा दिवस जास्तच रहा ,
आईला तसं सांगूनच या.

नाही लावली डॉल्बी ,डीजे,
ढोल ताशा वाजवला खूप.
पाहून वाट मिरवणुकीची,
खरचं सांगू ? आली मला झोप.

जागा तूझ्या सिंहासनाची ,
मांडवाखाली मोकळी रे .
कशी काढावी कळत नाही,
भरुन ही तुझी पोकळी रे .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment