स्पर्धेसाठी
अष्टाक्षरी
विषमता
विषमता ही दिसते,
जगी पहा ठाईठाई .
आपल्याच नादमय,
जीवनात रत होई.
बकालता वाढलीय,
विचारांची आचारांची.
आधुनिक बनण्यात,
अधोगती विचारांची.
रस्त्यावर पोर आहे,
आबाळ ही खाण्याचीच
बाप्पा निघाले ऐटीत,
हौस फक्त भक्तांचीच.
चिमुकला भागवतो,
भूक त्याच्या पोटातली.
पक्वांनाची आस नसे,
ऊष्टावणं रस्त्यातली.
देव नसे मूर्तीतच,
मानवता हवी मनी.
गरजेला अनाथांच्या,
धावे तोच वंद्य जनी.
उपासना करण्यास,
नको देव मातीचाच.
भागवणे भूक त्यांची,
भाग आहे श्रद्धेचाच.
नको दुरावा कुणात,
प्रेम असावे मनात.
दीन दलितांना द्यावा,
सदा मदतीचा हात.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment