चित्रचारोळी
विटंबना
विटंबनेखातर झाल्या दंगली
समाजातील दर्शन विकृतीचे
विसर्जनाअंती सर्व विसरले
पायदळी अवशेष दैवतांचे
माणिक नागावे
चित्रचारोळी
विटंबना
विटंबनेखातर झाल्या दंगली
समाजातील दर्शन विकृतीचे
विसर्जनाअंती सर्व विसरले
पायदळी अवशेष दैवतांचे
माणिक नागावे
स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - तुझ्यात जीव गुंतला
तरुणाईच्या वाटेवरचे गीत
आहे आज तुझ्यात जीव गुंतला
अविचाराच्या करणीने या जगी
प्रेमरोगी मोहमायेत फसला
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
अष्टाक्षरी
विषमता
विषमता ही दिसते,
जगी पहा ठाईठाई .
आपल्याच नादमय,
जीवनात रत होई.
बकालता वाढलीय,
विचारांची आचारांची.
आधुनिक बनण्यात,
अधोगती विचारांची.
रस्त्यावर पोर आहे,
आबाळ ही खाण्याचीच
बाप्पा निघाले ऐटीत,
हौस फक्त भक्तांचीच.
चिमुकला भागवतो,
भूक त्याच्या पोटातली.
पक्वांनाची आस नसे,
ऊष्टावणं रस्त्यातली.
देव नसे मूर्तीतच,
मानवता हवी मनी.
गरजेला अनाथांच्या,
धावे तोच वंद्य जनी.
उपासना करण्यास,
नको देव मातीचाच.
भागवणे भूक त्यांची,
भाग आहे श्रद्धेचाच.
नको दुरावा कुणात,
प्रेम असावे मनात.
दीन दलितांना द्यावा,
सदा मदतीचा हात.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
स्पर्धेसाठी
षडाक्षरी
शिर्षक -- मन
क्षणात ईकडे
क्षणात तिकडे
पळते ते मन
फीरे चोहीकडे
थांग ना लागला
मनाचा कुणाला
शोधून ऊत्तर
जीव हा शिणला
रुपेही अनेक
असती मनाची
ओळखू येत ना
दु:ख व प्रेमाची
नाही कळणार
विचार मनाचे
बदलत राही
क्षणात हो याचे
आहे म्हणून हे
मानव जगतो
शांतीसाठी याच्या
प्रयत्न करतो
शोधाव्या आपल्या
मनाच्या भावना
नका देऊ कधी
तुम्ही हो यातना
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
बांधण्या समाजाचे उंच बंगले
बालपण माझे हरवून गेले
डोईवर भार विटांचा घेऊन
भविष्य माझे शोधायला निघाले
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
फेरी क्रमांक ६
विषय - हरवलेली माणुसकी
प्रकार -मुक्तछंद
शिर्षक - जाग कधी येणार ?
झोपेचं सोंग घेऊन झोपलेला हा समाज..जागा कधी होणार?
अन्याय अत्याचार बोकाळलेत सगळीकडे, हरवत चाललीय माणुसकी...
कुणी हरवली माणुसकी ? शोध आता घ्यायला हवायं.
पडतात मुडदे ईथे रस्त्यावर ... रोजचचं झालय हे सगळं.पाहून,एकुण नजर मेली तसं मनही मेलय जणू...
हरवलेली माणुसकी शोधतोय आज ,उकीरड्यावरच्या टाकून दिलेल्या तान्हुलीत. अन् तिने फोडलेल्या त्या टाहोत. बेमालूमपणे....
रोज होतात बलात्कार न पाहता वय आन् काळ. लंगडी कारणं सांगीतली जातात या मायावी नगरीत. निर्लज्जपणे...
निवडणूक आल्यावर नेते होऊन लाचार पडतात पाया प्रेमाने. नंतर पाच वर्षे मतदार ऊभा आहे दिरावर मागत भिक स्वतःच्याच अस्तित्वाची.. लाचारपणे...
कधी संपणार ही श्रुंखला माणासांच्या अमानवतेची.पाहुया वाट मनापासून, येणाऱ्या ,हरवलेल्या माणुसकीची
कोड क्रं. PPT 5560
स्पर्धेसाठी
बालकाव्य लेखन स्पर्धा
विषय - पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया,
रोज म्हणून पाठ झालयं.
तू आता जाणार घरी तूझ्या,
मला मात्र रडू खूप येतयं.
मोदक लाडू खावून रोज,
नाचलो मी आनंदाने .
चाललास तू सोडून आम्हाला,
मन भरून आलयं दु:खाने .
मारल्या आम्ही शाळेला दांड्या,
नाचलो, बागडलो तुझ्यासमोर.
दिवस कसे छान गेले बाप्पा,
ऊद्यापासून हजर शाळेसमोर .
पुढच्या वर्षी लवकरच या,
वाट पाहतो तुमची गणराया.
जरा दिवस जास्तच रहा ,
आईला तसं सांगूनच या.
नाही लावली डॉल्बी ,डीजे,
ढोल ताशा वाजवला खूप.
पाहून वाट मिरवणुकीची,
खरचं सांगू ? आली मला झोप.
जागा तूझ्या सिंहासनाची ,
मांडवाखाली मोकळी रे .
कशी काढावी कळत नाही,
भरुन ही तुझी पोकळी रे .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
स्पर्धेसाठी
पाहुणचार
सुहास्यवदने स्वागत करती,
संस्कृती ही थोर भारताची.
पाहुणचार करुनी अतिथींचे,
मुखावर विलसे लकेर हास्याची.
अतिथी देवासम असे इथे,
राव असो वा रंक जरी .
न फीरे तो कधी रित्या हाताने,
यजमान कीती असला दीन तरी.
कार्यक्रम असो वा सणवार,
आगतम् स्वागतम् पाहुण्यांचे.
कसरत चाले सर्वांची खास,
समाधान करण्या पाहुण्यांचे.
कुटुंबात असो वा समाजात,
पाहुणचार करावाच लागतो.
हृदयात एकमेकांच्या सतत,
प्रेमवन्ही पेटवायचाच असतो.
मोठ्यांची पाहून आजची कृती,
बालपण आदर्श घेत असतो.
ठेवण्या आदर्श आपले भविष्य,
अनुकरणीय संदेश द्यावा लागतो.
नको कंजूषी पाहुणचारात,
मुक्तहस्ते हास्य ऊधळूया .
दाखवून आपला हसरा चेहरा,
रंग आयुष्यात दुसऱ्यांच्या भरुया.
अबाधित ठेऊ भारतीय संस्कृती,
गोडवे गाती परकीयही आनंदाने.
हाच आदर्श अंगी बाणवून,
संदेश जगी पोहचवू स्नेहाने.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
आठोळी
प्रथम तुज वंदिते प्रथमेशा
पार्वतीसूता हे गजानना
लंबोदराय आवडे तुज मोदक
धरीतो सदा सोंडेत गजवदना
गणाधीश तू सकल गणांचा
तूच संकटमोचन विघ्नहर्ता
भाळी शोभे चंद्र हे भालचंद्रा
चिंतामणी हारी दु:खे सुखकर्ता
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर.
हिंदी दिन
हमारा भारत देश पूरी दुनिया में सबसे अलग है, अपना एक महत्वपूर्ण स्थान बनाए रखा है। ईसका कारण है भारत की विविधता में एकता का होना।भारत में अनेक प्रांतकी अनेक भाषाएँ हैं।लेकीन ईतनी भाषाएँ होनेपरभी राष्ट्र का कारोबार चलाने के लिए एक भाषा का होना बहुत ही जरुरी है। जिसतरह बिना वाणी के मानव अधुरा है,ऊसीतरह राष्ट्रभाषा के बिना राष्ट्र गुँगा है।राष्ट्रभाषा किस भाषा को बनाया जाता है ? जिस भाषा को देश के ज्यादा से ज्यादा लोग समझ सकते हैं,बोल सकते हैं,कारोबार की भाषा में उसका उपयोग करते हैं।जिस भाषा में प्रचूर मात्रा में साहित्य उपलब्ध हों उस भाषा को ही राष्ट्रभाषा का सम्मान प्राप्त होता है।यह सब ध्यान में लेते हुए 14 सितंबर 1949 को राष्ट्रभाषा के रुप से नवाजा गया। 14 सितंबर 1953 में हिंदी को राष्ट्रभाषा प्रचार समिती,वर्धा के अनुरोधपर हरसाल 14 सितंबर हिंदी दिन के रुप में मनाया जाने लगा।
ईस अवसरपर स्कूलोंमें,सरकारी कार्यालयोंमें हिंदी दिन मनाया जाता है। साल में हिंदी का उपयोग ज्यादा से ज्यादा होने के लिए हिंदी सप्ताह, हिंदी पखवाडा भी मनाया जाता है। ईस अवसर पर हिंदी में अनेक कार्यक्रम जैसे - निबंध प्रतियोगिता,सांस्कृतिक कार्यक्रम, हिंदी के बारे में जानकारी देनेवाले कार्यक्रमोंका आयोजन कीया जाता है। स्कूली बच्चे ईस दिन हिंदी में बातचीत करते हैं। हिंदी के गीत,चुटकुलें, छोटी नाटिकाएँ,कहानियाँ जैसे कार्यक्रम करते हैं। जिसकी तैय्यारी करने के लिए समय बिताते हैं।ईसकारण वे हिंदी के संपर्क में रहते हैं। सरकारी कार्यालयोंमें कर्मचारी लोगों के लिए भी प्रतियोगिताएँ रखी जाती हैं। जिससे लोग हिंदी में सोचे,समझे और बात करें। सही है - जब हम अपनी भाषा में अपने विचार प्रकट करते हैं या ज्ञान लेते हैं तो वह अच्छी तरह से समझ सकते हैं। हिंदी ऐसी भाषा है जो हमें दुसरे राज्य में सहायक होती है। जब हम अपना राज्य छोडकर कीसी दुसरे राज्य में चलें जाते हैं तो वहाँ हमें हिंदी सहायक भाषा बनती है। हिंदी के सहारे हम एकदुसरे से वार्तालाप कर सकते हैं। ईतना ही नहीं हिंदी भाषा भारत में ही नहीं तो भारत के साथ साथ मॉरिशियस, पाकिस्तान, नेपाल,बांग्लादेश, सूरीनाम आदि देशों में भी बोली और समझी जाती है।
ईतना सब कुछ होने के बावजूद भी हिंदी को राष्ट्रभाषा के रुप में स्विकार करने में अहिंदी प्रदेश के लोगों ने ईसका कडा विरोध कीया वे चाहते थे की अँग्रेजी को राष्ट्रभाषा बनाया जाए।अंत में हिंदी को राजभाषा का स्थान दिया गया।आज हिंदी भाषा चौथे स्थान पर है। हिंदी भाषा का स्तर दिन ब दिन कम होता जा रहा है। अँग्रेजी का बोलबाला हो रहा है।लोगों को हिंदी में बोलने में शर्म महसूस हो रही है। ये सही नहीं है।
हिंदी को बढावा देने के लिए अब प्रयास हो रहें हैं। सरकारी दफ्तरोंमें हिंदी का उपयोग करने के लिए कहा जा रहा है। हिंदी को बढावा देने के लिए ,हिंदी का प्रचार और प्रसार करनेवाले व्यक्तीयोंको राजभाषा गौरव पुरस्कार, राजभाषा किर्ती पुरस्कार जैसे पुरस्कार देते हैं। जिससे हिंदी को बढावा दिया जाता है। आज के ईस अवसरपर चलो हम हिंदी के लिए , उसके प्रचार- प्रसार के लिए कार्यरत होकर हिंदी को आगे बढाएँ।हिंदी हमारे देश की माथे की बिंदी है,उसे ऐसे ही भारत माँ के माथेपर सजाएँ रखे।
हिंदी मेरी राजभाषा है,
है मुझे अभिमान ईसपर।
वार दुँगी जीवन रक्षा हेतु ,
कर दुँगी तन,मन,धन न्यौछावर।
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिला.कोल्हापूर.
9881862530
स्पर्धेसाठी
चारोळी
विषय -- सर्जा ( बैल )
मालकासाठी राबतो रानी सर्जा
कष्ट झेलून अपार आनंदाने
पाहून परीस्थिती शेतकऱ्यांची
वाही काळजी पोशिंद्याची नेकीने
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
विषय - सांजवेळ
सांजवेळीच्या सुंदर समयी,
नयनमनोहर दृश्य हे दिसले.
आकाशातील मेघांनी या ,
आसमंत सारे व्यापून टाकले.
अंधाराचे साम्राज्य पसरु लागले,
झाडेवेली काळोखात बुडाल्या.
तरीही हालतडुलत राहिल्या ,
हवेशी गप्पा करु लागल्या.
सुर्यकीरणांच्या प्रकाशात अशी,
चंदेरी रंगावली मोहक सजली .
भास्कर गेला अस्ताला सांजवेळी,
आकाशात कीरणें प्रसवली .
निरभ्र आकाश असे साथीला,
निसर्गसुंदर मोहवी मनाला.
सुखावले नयन त्या क्षणी ,
मेघांची गर्दी आहे साथीला.
जपूया या निसर्गाच्या ठेव्याला,
असाच हिरवागार, सतत राखूया.
आपल्याबरोबर दुसऱ्याचेही,
निसर्गाच्या सानिध्यात घालवूया.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
स्पर्धेसाठी
कविता
विषय - पत्नी पिडीत पती
शिर्षक - कारभारीण
दिवस सरले नवलाईचे ,
सुरु झाला आता संसार .
माझा मीच न राहीलो ,
जसा दिव्याखाली अंधार .
पुरता ताबा तिने घेतला ,
नकळत माझ्या जीवनाचा .
पार फज्जा उडाला पहा ,
सुखी आरामदायी आनंदाचा .
बाजाराची पिशवी हाती आली ,
यादी भली मोठी सामानाची .
आठवण झाली आपसुकपणे ,
घाण्याला जुंपलेल्या बैलाची .
आजूबाजूला बघायची ,
सोयच नाही मला उरली.
ती कोण ?, भुवया उंचावून,
पूर्वीची सवय नाही सरली .
आहे का उपाय यावर काहीं ,
पत्नी पिडीत पतीसाठी .
विचारतोय मी ज्याला त्याला ,
जोखडातून या सुटण्यासाठी.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
उपक्रम
अभंग रचना
माझी आई माझी शान
माझी आई माझी शान ।
वाटे मला अभिमान ।।
गाते तीचे गुणगान ।
लेक तिची लाडकी ।।1।।
सतत मग्न कामात ।
मुलांचे यश मनात ।।
ठेवते आई ध्यानात ।
काळजी हो मुलांची ।।2।।
लक्ष तिचे मुलांवरी ।
छाया त्यांच्या शिरावरी ।।
आयुष्यभर ती धरी ।
नकळतपणे हो ।।3।।
वैभव आहे घराची ।
सहनशील मनाची ।।
घ्या तुम्ही काळजी तिची ।
आयुष्यभरासाठी ।।4।।
धीर सदा मला देते ।
लढायला शिकवते ।।
संघर्षात बळ देते ।
जीवनात माझीया ।।5।।
वंदन हे तिच्या पायी ।
आदरच माझ्या ठायी ।।
गुणगान तिचे गाई ।
नतमस्तक आहे ।।6।।
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.
स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - गुरु
लघुत्व संपवून गुरुत्वाकडे
अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यास
कारणीभूत ठरतो तो गुरुच
सदैव तयार तव वंदण्यास
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
स्पर्धेसाठी
षटकोळी
विषय -- ज्ञानाचा वाहता झरा
नेणीवेकडून जाणिवेकडे नेणारा
अंधारवाटेवर प्रकाश दाखवणारा
ज्ञानाचा वाहता झरा
कष्टतो अखंड विद्यार्थ्यांसाठी
शिक्षणाच्या खाणीत शोभे
गुरुच खरा हिरा
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
द्रोणकाव्य रचना
विषय- दही हंडी
बाळगोपाळ आले
दही हंडी खेळ
सारे जमले
आनंदाने
खेळले
सर्व
ते
कृष्णसखी राधेला
घेरल्या मैत्रिणी
लाज मनाला
आपसूक
लागला
जीवा
हो
फोडली हो कान्हाने
मटकी क्षणात
खूष मनाने
सगळीच
आव्हाने
गेली
हो
थर दही हंडीचे
थरारक दृश्य
खेळणाऱ्याचे
मनोबल
जोराचे
वाढू
दे
गोपाळकाला झाला
दही हंडी झाली
श्रावण आला
सणवार
कळला
मला
रे
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
चारोळी
विषय - वेळ
समजून घ्यायला हवे वेळेला
उपयोगात आणावा क्षणक्षण
निघून गेला वेळ एकदा
नाही परत येत ठेवा भान
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
षटकोळी
यशोदेचा कान्हा
रमला गोकुळी गोपाळात
नटखट यशोदेचा कान्हा
राधा वेडी झाली
गोपिका जमल्या वृंदावनी
धुंद झाले चराचर
ऐकुन कृष्णाची मुरली
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
भयरसस्पर्धेसाठी
एक अनामिक भिती
शहारले सारे शरीर ,
ऐकून आवाज अनोखा .
एक अनामिक भिती ,
मनाचा उघडला झरोखा .
रिपरिप पावसाची चालू ,
पाय चिखलात रुतलेले .
आवाज सरकत होता पुढे,
मन पार गळून गेलेले .
स्पर्श जाणवला शरीराला ,
कीळसवाणा तो चेहरा .
थरारली सारी काया भितीने,
दाटला काळाकुट्ट कोहरा .
हवेत विरली आर्त कींकाळी ,
आसमंतात तशीच विरली .
चराचरात भेसूरता आली ,
काळोख चिरत ती गेली .
एक अनामिक भिती आज ,
काळजात खोल रुतून गेली .
कवडशांच्याही आता खरंच ,
जाणवू लागल्या हालचाली .
कीर्र रात्रीच्या अंधारात ,
रातकीड्यांचा आवाज वाढला.
सरपटणाऱ्या प्राण्यांचाही ईथे,
वावर खूपच सुरु जाहला .
शोधतेय मी विसावा
या अशांत वातावरणात .
एक अनामिक भिती
सतावतेय या काळजात.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
नंदलाला
स्थीरमुद्रेने घेऊन निघाला वासुदेव
भरपावसात टोपलीतून बाळाला
बाळकृष्ण हासत खेळे निवांत
सर्पराजाने छाया दिली नंदलालाला
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
षटकोळी
प्रेमरोग
तरुणाईला आजच्या जडलीय
बाधा आता प्रेमरोगाची
विसरलीत सगळी नातीगोती
नको झालेत आईवडील
आंधळेपणात जगती सारे
नाही कशाचीच भिती
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
चारोळी
विषय- कृष्ण जन्मला
वस्त्रहरण रोखण्या द्रौपदीचे
बंधू कृष्ण जन्मला देवकीपोटी
रक्षण केले सत्यनिष्ठ पांडवांचे
केले निर्दालन कंसाचे त्या कपटी
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर