Sunday, 31 December 2017

जुने ते सोने

स्पर्धेसाठी

    जुने ते सोने

सरले वर्ष सतरा ,
सूर्य मावळतीचा साक्षिला.
स्वागत करुया अठराचे ,
हजर सारे दिमतीला .

जुने ते सोने असते ,
गेल्यावर ते लक्षात येते.
संकल्प धरुन नविन ,
मनात गुंफण घालते .

माणसे जुनी काळ जुना,
माणुसकी जवळ होती.
सहकार्यवृत्ती अंगी होती,
संवेदना जागृत होत होती.

खरी मानवता कळत होती,
शेजारधर्म पाळत होते .
कुणी ना कुणाचा शत्रू ,
सगळेच जिवलग मित्र होते.

भेसळ अन्नाची होत नव्हती
रसायनांचा मारा नव्हता .
आता हे सगळे स्वप्न झाले ,
आठवांचा पूर नुसता .

होऊन जागे करु जागे ,
नवसंकल्पाची कास धरु.
जुने ते सोने संकल्पना ,
जनमानसात जोमाने पेरु.

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर .

काय कमवले

स्पर्धेसाठी

   काय कमवले

साक्षी ठेऊन सरत्या वर्षाला
केला हिशोब काय कमवले
हिशोब करता करता कळाले
मी खूप काही कमवले

साहित्याच्या क्षेत्रात आल्यापासून
विचार प्रगल्भ झाले
खूप सारे साहित्यीक
मित्र मैत्रीणी मिळाले

चांगल्या विचारांचा
पगडा घट्ट बसला
वाईट विचारांना मग
चांगलाच मी झापला

कल्पनेला मिळाली सुसंधी
वैचारिक अंगण मिळाले
भावनांच्या ओंजळीतले
सुंदर विचार ओघळले

खूप सारे मी कमविले
समाधान मन हे झाले
आयुष्याच्या वाटेवरती
आनंदी ते राहिले

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

दिवस गुलाबी थंडीचे

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी

5 ) दिवस गुलाबी थंडीचे

येता गार वारा ,
आला अंगावरी शहारा .
दिवस गुलाबी थंडीचे ,
भरला शरीरात कापरा .

जरी असली बोचरी ,
हवी हवीशी वाटते .
ऊबदार गरम शालीमध्ये ,
गोड गुलाबी ती भासते .

मन मोहरुन जाते ,
पाहून सौंदर्य निसर्गाचे .
सुचतात ओळी आपसुकच ,
सुंदर त्या कवितेचे .

मनपाखरु घेते भरारी ,
कल्पनेच्या दुनियेत .
न थोपवे थंडी न गारवा ,
मग्न ते आपल्याच कल्पनेत.

भासतात गोड मजला ,
दिवस गुलाबी थंडीचे .
रजईत छान वाटे ,
आहे मज ते निकडीचे .

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

माझा न मी राहिलो

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी

4) माझा न मी राहिलो

पाहिले तूला मी तिथे ,
त्या रम्य पहाट समयी .
माझा न मी राहिलो ,
खरचं ग हे मृण्मयी .

पाहून झालो मी बेभान ,
सुचेना काय करावे ?
नाही दिलास थारा ,
पामराने या का मरावे ?

गोड तुझी गौर काया ,
पाहून मन वेडावले .
मोहक अदांनी तुझ्या ,
माझा न मी राहिलो .

या जन्मी तरी तू ,
सखी माझी होशील का ?
नाही जरी जमले तरी ,
पुढील जन्मी मिळशील का ?

आस जागवून अशी ,
तू परत अशी जाऊ नको .
मन जडले तुझ्यावरच ,
शोधायला मला लावू नको.

स्वप्न हे जरी असले तरी ,
सत्यात कधीतरी उतरावे .
अंतरीच्या या वेदना ,
समजून कुणीतरी घ्यावे.

   कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर .

मोबाईल स्त्रोत्र

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी

3) मोबाईल स्त्रोत्र

हाती आला माझ्या
चमत्कार विज्ञानाचा
अहोभाग्य माझे
मोबाईल माझा सोन्याचा||

मिळाला मजला आता
आधार स्नेहीजनांचा
व्हाटसअप , फेसबुक
देवाणघेवाण विचारांचा ||

कळती मला बातम्या
याच्यामुळेच त्वरीत
जग आले जवळ
दर्शनाने झाले मोहीत||

गाती जयगान याचे
लहान थोरापर्यंत
बनला तो आज
तरुणांच्या गळ्यातील ताईत||

राहो कृपा मोबाईल देवा
तुझी अशीच आम्हावरी
स्त्रोत्र तुझे गाईन सदा
शरीरात प्राण आहे तोवरी ||

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

मिठी सैल झाली

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी

2) मिठी सैल झाली

आला पहाटवारा ,
जागवून मज गेला .
स्वप्नांची ती मग आता ,
मिठी सैल झाली .

गुंतले मन होते ,
स्वप्नांत काल माझ्या .
कवेत मी गुंफले ,
झाले मन ताजे तुझे .

आळवले सूर प्रितीचे ,
गाईले नवे तराणे ,
शब्दां शब्दांतून फुलले ,
आज माझे नवे गाणे .

घेतले शब्द अलगद ,
उचलून मी मिठीत .
मिठी सैल झाली ,
शब्द धरले ओंजळीत .

हळुच मारली फुंकर ,
शब्द लागले धावायला .
ऐकुन शब्दसुरांना ,
सारेच लागले गायला .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

भार कशाला आभाराचे

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी

1)  भार कशाला आभाराचे

पडेल ते काम करणे ,
कर्तव्य हे मानवाचे .
नकोत अपेक्षा कुणाकडूनही
भार कशाला आभाराचे ?

स्तूतीसुमने गाऊन तयांची ,
स्वागत केले पाहुण्यांचे .
अपेक्षा नको परत आता ,
भार कशाला आभाराचे ?

ऊदघाटन झाले हस्ते ,
झाले समाधान मनाचे .
खुशीत आले सगळे ,
भार कशाला आभाराचे ?

दिले ठोकून सुंदर भाषण ,
हृदय जिंकले प्रेक्षकांचे .
हेच येतसे कामी आपल्या ,
भार कशाला आभाराचे .

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर .

मावळतीचा सूर्य

स्पर्धेसाठी आठोळी

    मावळतीचा सूर्य

मावळतीचा सूर्य साक्षिला
गतकाळातील वैभवाला
यशस्वी जीवन बहराला
सुख समृद्धीच्या समयाला

अशीच लाभो यशपताका
सुगंधीत होऊ दे जीवन
शुभेच्छांचा वर्षाव होऊ दे
आनंदात न्हाऊ दे हे मन.

        रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

Saturday, 30 December 2017

( दर्पण ) मागोवा

DaRपण

मागोवा

मागोवा
मागोवा घेतला
मागोवा
सरत्या वर्षातील घटनांचा घेतला
मागोवा
कधी सुख कधी दुःख असलेल्या जीवनातला
मागोवा
घडून गेलेल्या चांगल्या वाईट प्रसंगानुरुप घटनांची साक्ष मनाला
मागोवा
गोळाबेरीज केली सर्वांची , तेव्हा कसे वागायचे ते कळले माझे मला .

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

( काव्यांजली )राहून गेले काही

स्पर्धेसाठी

      काव्यांजली

  राहून गेले काही

सांगायचे होते
मनातले मज तुला
वेळ तूला
नव्हता

अधीर मन
तडफडत खूप होते
व्यक्त करते
स्वैरपणे

समजल्या भावना
मनीच्या तूझ्या मला
आनंद झाला
मनाला

वाट पाहते
प्रतीसाद तू देना
प्रतीक्रीया घेना
माझी

भेटू आपण
त्या निवांत स्थळी
फुलेल कळी
आपली

वाट पाहते
मी वेडी राधा
नको बाधा
कुणाचीही

आनंदी मन
खरेच झाले माझे
वचन तुझे
पाळले

   रचृना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर

सरते क्षण

स्पर्धेसाठी

विषय - सरते क्षण

सरते क्षण निघून जाणार
आठवण कायम राहणार
सुखदुःखाच्या झुल्यावर ते
सतत हिंदोळे घेत  राहणार

घेऊया यातून आपण धडा
मानवतेची मनी कास धरु
सरत्या क्षणांच्या साक्षिने
सौख्याचे मंदिर ऊभारु .

     रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर .

Friday, 29 December 2017

आंदोलन

स्पर्धेसाठी

    चित्रकाव्य

   आंदोलन

हे कसले आंदोलन ?
फायदा का नुकसान ?
गरीबांना सोडून घातले ,
रस्त्यालाच दुधाने स्नान .

मागण्या जरी रास्त तुमच्या,
पद्धत ही नव्हे बरी .
पहा मेहनत यापाठीमागची,
धडकी भरते पहा उरी .

सांडून दुध रस्त्यावर ,
काय मिळवले तुम्ही ?
उपयोगात आणा त्यापेक्षा ,
पाठींबा तुम्हा देतो आम्ही.

जागा हो तू मानवा ,
अविचाराने वागू नको .
विचारपूर्वक कृती कर ,
अमानवी तू वागू नको .

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.

एक अनामिक

उपक्रम

     एक अनामिक

एक अनामिक शब्द आला
माझ्याशी तो बोलू लागला
अर्थ त्याचे कितीक असती
ऐकुण जो तो थक्क झाला

शब्द शब्द जोडत गेले
कविता सुंदर तयार झाली
अनामिक शब्द खुश झाला
सुंदरता सगळीकडे पसरली.

    रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.

Thursday, 28 December 2017

झाले मोकळे आकाश

उपक्रम

  झाले मोकळे आकाश

मन आले भरुन भावनांनी
विचारांची शृंखला सुरु झाली
झाले मोकळे हे आकाश
तगमग पण शांत ही झाली

निचरा भावनांचा हा झाला
मनमयुर आनंदी झाले
फुलवून शब्दांचा पिसारा
थुईथुई नाचू ते लागले .

  रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.

Tuesday, 26 December 2017

दिला धैर्याने लढा

आजचा उपक्रम

     दिला धैर्याने लढा

माणूसकी शोधत फीरताना
जीव हा कासाविस  झाला
दिला धैर्याने लढा एकाकी
अमानव तो परागंदा झाला

धैर्य बांधून एकाकी मनात
चालले मी नेटाने जोमात
हेच येतसे कामास माझ्या
गुंग मी माझ्या कामात .

    रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर

Sunday, 24 December 2017

खरा तो एकची धर्म

स्पर्धेसाठी

       चारोळी

विषय -खरा तो एकची धर्म

शिकविला गुरुजींनी सर्वांना
कृतीने खरा तो एकची धर्म
संस्काराने आईच्या पावन
जगा दिले जगण्याचे खरे मर्म .

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

Friday, 22 December 2017

संध्या

स्पर्धेसाठी

       आठोळी

        संध्या

दिवसाच्या विसाव्याची वेळ
आशा निराशेचा घालून मेळ
संध्यासमयी घालावा मेळ
सुखदुःखाचा सुंदर खेळ

संध्या देते शांती मनाला
दिवसभराच्या दगदगीनंतर
मिळतो वेळ घालवायला
कुटुंबातील माणसांबरोबर.

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता .शिरोळ
जि.कोल्हापूर

Tuesday, 19 December 2017

गाडगेबाबा

स्पर्धेसाठी

          काव्यस्पर्धेसाठी

    विषय -- गाडगेबाबा

शेणगाव ते पावन झाले ,
डेबूजी तेथे जन्मा आले .
महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ,
थोर संत उदया आले .

केली सेवा दीनदुबळ्यांची ,
अनाथांची माय झाले .
अपंगाच्यासाठी मसिहा ,
नाठाळांसाठी काठी झाले .

गाडून टाका अंधश्रद्धा ,
थोर उपदेश सर्वां दिला .
चमत्कारावर विश्वास नको ,
विज्ञानाचा संदेश दिला .

जीवन समर्पित केले यांनी,
रंजल्या गांजल्यां साठी .
त्यांच्यातच मानला देव ,
त्यागीले घरदार लोकांसाठी

व्रत लोकसेवेचे महान ,
नाही अभिलाषा फळाची .
गाडगेबाबा महान झाले ,
गाऊ कीर्ती थोर संताची .

    कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .416106

Sunday, 17 December 2017

शब्द

स्पर्धेसाठी

      चारोळी

विषय -- शब्द

शब्दच फुलवतात
विचाराच्या सुमनांना
शब्दच कारणीभूत
दुरावण्या माणसांना.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ
जि.कोल्हापूर.

Friday, 15 December 2017

आई

स्पर्धेसाठी
  
      विषय -- आई

वात्सल्यसिंधू करुणासागर
प्रेमळ आई ममतामयी
आशिष तुझे असेच राहो
कामना हिच ईश्वरपायी .

    रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि.कोल्हापूर .

Tuesday, 12 December 2017

ओझे जीवनाचे

स्पर्धेसाठी

       चित्रचारोळी

वार्धक्याची तमा नसे मज
बिकट ही वाट मी चालते
ओझे जीवनाचे पाठीवरी
पहा सहजच मी पेलते.

     रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.

स्वच्छ भारत

स्पर्धेसाठी

     विषय -- स्वच्छ भारत

घोषणा स्वच्छ भारताची झाली ,
राष्ट्रपित्याच्या जन्मदिना दिनी .
देश ज्यांनी केला गुलामीतून मुक्त
स्वच्छ भारताचे स्वप्न होते मनी .

निर्माण शौचालयाचे उद्दीष्ट खास
बंद उघड्यावर शौचास जाणे .
निर्मलग्राम पुरस्कार योजना आनंदाचे सर्वत्र झाले गाणे .

स्त्रीवर्गाची कुचंबना लक्षात घ्या ,
शारीरिक यातनांतून मुक्त करा .
बांधून शौचालय सगळीकडे माताभगिणींना आनंदी करा

स्वच्छ शाळा स्वच्छ परिसर,
स्वास्थ्य आपले आपल्या हाती .
देऊ कानमंत्र नवा मुलांना ,
भावी नागरिक साथ देती .

घेऊन स्पर्धा अनेकविध ,
स्वच्छता संदेश दिला घरोघरी .
आदर्श गाडगेबाबांचा आता,
पोहचवू आपण दारोदारी .

स्वच्छ भारत अभियानाला ,
देऊ आपण सक्रिय साथ .
करुया स्वच्छ भारत आज ,
देऊ एकीने सर्वांना साथ .

कवयित्री
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .
9881862530 .

पशूधन

महाकाव्य स्पर्धेसाठी

फेरी क्रं. 7

विषय -- शेतकरी जीवन

शिर्षक -- पशूधन

ना चारा , ना पाणी ,
जनावरे झाली दीनवाणी .
कोरड पडली नदीला ,
महाग झाली पाण्याला .

दुष्काळ दार ठोठावतोय ,
मरणाचा सुकाळ फोफावतोय.
पशूधनाची लागली चिंता,
कसा खाऊ घालू तुला आता

काळीज तुटतय मन फाटतय,
पशूधन माझ माळावर चरतय.
रोडावलेली त्यांची काया ,
दुबळी झाली माझी माया.

होरपळ माझी नी तुझी झाली
गोठ्यालाच आता अडचण झाली
समजाऊ कसं आक्रंदना-या मनाला
बघून जाताना तूला बाजाराला

शेती झाली भकास पाण्याविना
ओसाड झाला गोठा तुझ्याविना
दगड ठेऊन काळजावरी
धाडला तुला कसाबाघरी

कोड क्रं. -- MKS-5714

Monday, 11 December 2017

कर्म मला भोवले

स्पर्धेसाठी

धुतकारुन जेष्ठांच्या आज्ञा
तुडवीत पुढे ते निघाले
तोंडघशी पडले तेव्हाच
कळाले ,कर्म मला भोवले.

     रचना
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.
9881862530

Sunday, 10 December 2017

स्वप्नवाट

स्पर्धेसाठी 

         स्वप्नवाट

स्वप्न म्हणू की भास हा ,
किती सुंदर रम्य नजारा .
मोहवून टाकी मनाला ,
शांत निळाशार किनारा .

स्वप्नवाट ही नेतसे ,
सार्वांना श्वानांच्या दुनियेत.
सजल्या पायऱ्या फुलांनी ,
सजले श्वान या प्रतिमेत .

एकटा मी आलो खाली ,
चुकली वाट ? का चुकुन ?
सगेसोयरे आतुरतेने ,
पाहती वाट खाली झुकुन .

रम्य निळाई शोभे सुंदर ,
हिरवाईच्या काठाला .
बसली मुलगी गुंगुन ,
पाहण्या ह्या निसर्गाला .

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर

Sunday, 3 December 2017

आत्मा ईश्वर हेच सत्य रे

स्पर्धेसाठी

आत्मा ईश्वर हेच सत्य रे

नश्वर ही काया हे मानवा
आत्मा ईश्वर हेच सत्य रे
कर सांभाळ सद्गुणांचा
मानवताच येई कामी रे.

     रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.
9881862530

जनसेवा हीच ईश्वरसेवा

लेखस्पर्धेसाठी

जनसेवा हिच ईश्वरसेवा

      " खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे " असे परमपूज्य साने गुरुजी नेहमी म्हणत.त्यांनी  आपल्याला सांगीतलय की , जगात जे दीन व पददलीत आहेत , जे रंजलेले गांजलेले आहेत त्या सर्वांना आपण जवळ केले पाहिजे , त्यांना ऊठवले पाहिजे , त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले पाहिजे.कारण या लोकांच्यातच देव वसला आहे.जर आपणाला देवाची  ईश्वराची सेवा करायची असेल तर आपणाला कुठे देवळात  जायची गरजच नाही.

    आज आपण दररोजच्या जीवनात अनेक अंध , अपंग , निराधार , गरजू पिडीत व शोषित लोकं आपल्या आजूबाजूला पहात असतो.खरतर या लोकांना मदतीची नितांत गरज असते.आपण यांच्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतो व नको तिथे पैसा खर्च करतो.हे सर्व करण्यापेक्षा या लोकांची सेवा आपण करु शकतो व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो.त्यांचा हसरा व समाधानी चेहरा पाहिला की खूप आनंद वाटतो , व आपण ईश्वराची सेवा केल्याचे समाधान मिळते.

     भगवान महावीरांनीही गृहत्याग करुन आपले सारे जीवन लोकांच्यासाठी अर्पण केले व अहिंसेचा महामंत्र दिला.कुणालाही दुखवायचे नाही , सर्वांशी भेदभाव न करता प्रेमाणे वागायला शिकवले.भगवान श्रीकृष्णानंही अत्याचारी कंसाला मारुन जनतेची सुटका केली व महाभारताच्या युद्धातही न्यायी व गरजू पांडवाना मदत केली.परममीत्र सुदामालाही मदत केली.

   अनेक शास्रज्ञांनीही अनेक उपयुक्त असे शोध लावून जनतेची सेवाच केली आहे.संत महात्म्यांनीही आपल्या आचरणाने जनसेवाच केली आहे.संत कबीरांनी कापड विणून गरजू लोकांना दिले.संत तुकारामांनी स्वतःचे सर्वस्व गमविले पण जनसेवा सोडली नाही.गाडगेबाबांनी तर स्वतः पुढे होऊन सफाईचे कार्य केले आरोग्यपूर्ण जीवनासंबधी अंधश्रद्धेबद्दल जागरुकता निर्माण केली. व  " आधी केले मग सांगीतले " याची प्रचीती दिली. मदर टेरेसा यांनी आपला देश सोडून भारतात येऊन कुष्ठरोग्यांची दीनदलीतांची सेवा केली व महान बनल्या.मा.बाबा आमटे, श्री.विकास आमटे व श्री. प्रकाश आमटे यांनी स्वत्त्वाचा त्याग करुन आपले सारे जीवन कुष्ठरोग्यांची व आदिवाशींची सेवा करण्यात घालवली.मा. नसिमा हुरजूक यांनी आपले सारे जीवन अपंगाच्यासाठी वाहून टाकले.अनाथांची माय    "माई " सिंधुताई सपकाळ यांनी तर अनंत यातना सहन केल्या व आनाथांच्यासाठी व पिडीत लोकांसाठी आपले जीवन अर्पिले आहे. मा मेधा पाटकर यांनीही आदिवाशी व पिडीत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत आहेत.

   अशी अनेक जीवंत उदाहरणे आहेत ज्यांचे जीवनच जनसेवा आहे.या सर्वांचा आपण आदर्श घेतला पाहिजे व आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढीतरी जनसेवा केली पाहिजे.गरजूंना धान्य , कपडे व ईतर जीवनावश्यक वस्तू दिले पाहिजेत.ज्यावेळी बाजारात जातो त्यावेळी मॉलमध्ये न जाता रस्त्यावर विकणारे अनेक अंध , दिव्यांग ,गरजू लोक असातात त्यांच्याकडूनच वस्तू घ्याव्यात कारण त्यावरच त्यांचे पोट अवलंबून असते.

    चला तर मग करुया मदत गरजूंना व ईश्वरसेवेचा लाभ घेऊया.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

Friday, 1 December 2017

पालावरचं जगणं

स्पर्धेसाठी

      चित्रकाव्य

      पालावरच जगणं

पाठीवरती बि-हाड घेऊन,
जगतोय पालावरच जगणं.
उघड्यावरचा संसार हा ,
सुखी ठेव देवा हेच मागणं.

माय लेकरांची घेते ,
काळजी मनापासून .
गरीबीतही मानून सुख,
तुटे न हास्य चेहऱ्यापासून.

बाबाची नजर कौतुकाची ,
राजा तो या नगरीचा.
संसाराकडे पाहुन आपल्या,
टाकतो कटाक्ष कौतुकाचा .

साखरशाळेला जाण्यासाठी,
तयार करते माय लेकीला.
छोटा भाऊही पाहतोय ,
कोण आलय हे भेटीला ?

सपान आमचे असते ,
सदैवच हिरवे हिरवेगार.
भारतभूच्या रक्षणाचे ,
आम्हीच आहोत दावेदार.

    कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

श्रद्धा आणि भक्ती

स्पर्धेसाठी

विषय -- श्रद्धा आणि भक्ती

असावीच श्रद्धा आणि भक्ती
कर्तव्यावर , जीवनावर
यशाच्या शिखरावर उंच
जाण्यासाठी प्रयत्नांवर.

      रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
9881862530

मन

स्पर्धेसाठी

       शब्दचारोळी

       विषय -- मन

क्षणात इथे क्षणात तिथे
थांग ना लागे कधी मनाचा
अवलंबून आहे यावर
डोलारा मानवी जीवनाचा.

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

वार्धक्य

स्पर्धेसाठी

विषय -- वार्धक्य

असावी मनाची उभारी ,
चेतवण्या दुस-यांची मने .
जरी आले वार्धक्य तरी ,
नसावे मनाचे अंगण सुने .

ठरलो येथे निप्रभ जर ,
विचारणार नाही येथे कुणी.
स्थान आपले टिकवण्यास ,
आत्मविश्वास असावा मनी.

अडगळ वाटे सगळ्यांना ,
उपदेशाचे डोस नको .
थरथरत्या हातांचा आता ,
आशिर्वाद ही झालाय नको.

संस्कारच आपले भोगतोय,
पडायला नको कुठे कमी .
आपण सांभाळू आईबाबांना युक्ती अनुकरणाची ही नामी

तब्येत आपली सांभाळू ,
मोकळ्या हवेत रोज फीरु.
कसरत करुन कसदारपणे,
आरोग्याची कास धरु .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

Thursday, 30 November 2017

निर्मळ जीवन ( अभंग )

स्पर्धेसाठी

        अभंग प्रकार

       निर्मळ जीवन

असावे निर्मळ |
तन मन धन |
होईल जीवन |
आनंदाचे ||

द्वेष मोह राग |
सोडावा मत्सर |
आपण सत्वर |
सुधारण्या ||

दे सहानुभूती |
एकमेकाप्रती |
सफल जगती |
होण्यासाठी ||

आदर करावा |
सर्वांचा मानवा |
सोडुनी दानवा |
पाठीमागे  ||

मानवा जन्म हा |
एकदाच मिळे |
का न तुला कळे |
रीतभात ||

सत्याचीच कास
धरावी नेहमी |
तू मानवप्रेमी |
असावास ||

पाळ मानवता |
सदैव तू अंगी |
ईश्वराच्या रंगी |
रंगून जा ||

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
9881862530

स्पर्धेसाठी

सहज येऊन जाते कविता तिला पाहिल्यावर

शब्दसुमने ही आपसूकच फुलती ओठावर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर.
9881862530

Wednesday, 29 November 2017

वेळ ( काव्यांजली )

स्पर्धेसाठी

      काव्यांजली

विषय -- वेळ

महत्वाचा आहे
नेळ जपा सर्वाँनी
पटले मनोमनी
सर्वांना

गेलेला वेळ
नाही परत येत
नाही घेत
ध्यानात

केले काम
जर आपण वेळेत
यश शाळेत
मिळेल

यशाच्या वाटा
अवलंबून आहेत वेळेवर
ठेऊन ताळ्यावर
डोके

यशोशिखर गाठा
पाहून संधी तुम्ही
कौतुकाला आम्ही
हजर

यशस्वी भव
आशिर्वाद आहे सर्वांचा
वेळ पाळल्याचा
आनंद

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.
9881862530

Tuesday, 28 November 2017

निसर्गातील खेळ

स्पर्धेसाठी

          चित्रचारोळी

निसर्गात चाले खेळ हा दोघांचा
ओंडक्याचा सहारा पुरे मजला
तू हवेत असा झेपावला उंच
नाही उपमा निखळ या प्रेमाला.

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.

Sunday, 26 November 2017

स्वावलंबी जीवन

स्पर्धेसाठी

   लेख स्पर्धा

स्वावलंबी जीवन

     " आधी केले मग सांगीतले " असे म्हणतात ते अगदी बरोबरच आहे . कोणतेही काम असो मृग ते छोटे असूदे कींवा लहान ते काम आपण दुस-यांना सांगून करुन घेण्याऐवजी स्वतः केले तर तर ते काम केल्याचे एक वेगळे समाधान आपल्याला मिळतेच व दुस-यांना सांगताना आपण एका वेगळ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो.तेव्हा स्वावलंबन हे महत्वाचे आहे
   स्वावलंबन म्हणजे आपण आपले कोणतेही काम असो दुस-यांच्याकडून करुन न घेता स्वतःच्या बळावर करणे होय .स्वावलंबनाने एकप्रकारचा आत्मविश्वास येतो . मग आपण कोणतेही काम सहज करु शकतो.त्यासाठी आपण स्वतःवर अवलंबून असले पाहिजे .
" स्वावलंबन " हे मूल्य आपण आपली मुले लहान असतानाच त्यांच्यात बिंबवली पाहिजेत . यासाठी आपल्या मुलांना सुरवातीला त्यांची स्वतःची छोटी छोटी कामे स्वतःच करायला सांगावी.सुरवातीला ती चुकतील , काही नुकसानही होईल पण ते आपण सोसलं पाहिजे , कारण यातूनच ती मुले शिकणार आहेत.आपण जी काळजी करतो ती आंधळी काळजी असते , तसे करुन आपण आपल्या मुलांना परावलंबी बनवत  असतो हे आपल्या लक्षात येत नाही.

   संसारातसुद्धा अनेक स्त्रिया या आपल्या पतिवर अवलंबून असतात . लहानसहान कामासाठी त्या अडून बसतात.काहीवेळा मग कुणी नसेल तर मग कामं खोळंबली जातात.बाकीच्यांना मग आपला नाकर्तेपणा जाणवतो.मग आपली कुचंबना सुरु होते व मग आपल्यावर दबाव आणला जातो, मग आपण त्यातच पिचत जातो.स्वावलंबनाने जर आपण वागले आपली कामे जर आपणच केली तर आपले एक स्थान निर्माण होते .आपला विचार केला जातो.वागताना विचाराने वागतात.

  शाळेतही आपण विद्यार्थ्यांना सर्व उत्तरे जर लिहून द्यायला लागलो तर मुले स्वतः अभ्यासच करणार नाहीत .व आयत्या उत्तराच्या प्रतिक्षेत स्वतः प्रयत्न करणार नाहीत .परिणामी वार्षिक परीक्षेत त्यांना अडचण येऊ शकते.त्यांना स्वतः उत्तरे शोधायला शिकवा म्हणजे ती अभ्यासात परिपूर्ण होतील व स्वावलंबी होतील.

   स्वावलंबन हा अतिशय आवश्यक असा गुण आहे.जो आपल्याला या जगात मानाने , सन्मानाने जगायला शिकवतो.आपण कुणाच्या मिंद्यात रहात नाही.परावलंबी म्हणजे मृत व्यक्तीचे लक्षण आहे.जिवंत व्यक्ती नेहमी धडपडत असते.

   मग आपण आपल्या जिवंतपणाची साक्ष देऊया .यासाठी परावलंबीत्व सोडून स्वावलंबी बणूया.

लेखिका

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि. कोल्हापूर.