Tuesday, 12 December 2017

पशूधन

महाकाव्य स्पर्धेसाठी

फेरी क्रं. 7

विषय -- शेतकरी जीवन

शिर्षक -- पशूधन

ना चारा , ना पाणी ,
जनावरे झाली दीनवाणी .
कोरड पडली नदीला ,
महाग झाली पाण्याला .

दुष्काळ दार ठोठावतोय ,
मरणाचा सुकाळ फोफावतोय.
पशूधनाची लागली चिंता,
कसा खाऊ घालू तुला आता

काळीज तुटतय मन फाटतय,
पशूधन माझ माळावर चरतय.
रोडावलेली त्यांची काया ,
दुबळी झाली माझी माया.

होरपळ माझी नी तुझी झाली
गोठ्यालाच आता अडचण झाली
समजाऊ कसं आक्रंदना-या मनाला
बघून जाताना तूला बाजाराला

शेती झाली भकास पाण्याविना
ओसाड झाला गोठा तुझ्याविना
दगड ठेऊन काळजावरी
धाडला तुला कसाबाघरी

कोड क्रं. -- MKS-5714

No comments:

Post a Comment