Sunday, 31 December 2017

माझा न मी राहिलो

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी

4) माझा न मी राहिलो

पाहिले तूला मी तिथे ,
त्या रम्य पहाट समयी .
माझा न मी राहिलो ,
खरचं ग हे मृण्मयी .

पाहून झालो मी बेभान ,
सुचेना काय करावे ?
नाही दिलास थारा ,
पामराने या का मरावे ?

गोड तुझी गौर काया ,
पाहून मन वेडावले .
मोहक अदांनी तुझ्या ,
माझा न मी राहिलो .

या जन्मी तरी तू ,
सखी माझी होशील का ?
नाही जरी जमले तरी ,
पुढील जन्मी मिळशील का ?

आस जागवून अशी ,
तू परत अशी जाऊ नको .
मन जडले तुझ्यावरच ,
शोधायला मला लावू नको.

स्वप्न हे जरी असले तरी ,
सत्यात कधीतरी उतरावे .
अंतरीच्या या वेदना ,
समजून कुणीतरी घ्यावे.

   कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर .

No comments:

Post a Comment