स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
पालावरच जगणं
पाठीवरती बि-हाड घेऊन,
जगतोय पालावरच जगणं.
उघड्यावरचा संसार हा ,
सुखी ठेव देवा हेच मागणं.
माय लेकरांची घेते ,
काळजी मनापासून .
गरीबीतही मानून सुख,
तुटे न हास्य चेहऱ्यापासून.
बाबाची नजर कौतुकाची ,
राजा तो या नगरीचा.
संसाराकडे पाहुन आपल्या,
टाकतो कटाक्ष कौतुकाचा .
साखरशाळेला जाण्यासाठी,
तयार करते माय लेकीला.
छोटा भाऊही पाहतोय ,
कोण आलय हे भेटीला ?
सपान आमचे असते ,
सदैवच हिरवे हिरवेगार.
भारतभूच्या रक्षणाचे ,
आम्हीच आहोत दावेदार.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .
No comments:
Post a Comment