स्पर्धेसाठी
कविता
कधी सांजवेळी
बांध भावनांचा झाला
कधी सांजवेळी रीता
शांत जीव झाला माझा
ओठी स्फुरली कविता
मानसिक तणावांचे
नको आता ओझे माथी
नाहीतर जीवनात
येते अशांतीच हाती
सांजवेळ आयुष्याची
समाधानी असणार
संगतीने संगीताच्या
नेहमीच फुलणार
नाही आभाळ दु:खाचे
नाही मनात निराशा
बिज अंकुरते असे
जगी दिसे फक्त आशा
सायंकाळी जागवल्या
संवेदना मानवाच्या
हित पाहता स्वतःचे
बंद भिंती भावनांच्या
उघडून नयनांची
दारे खुशाल पाहता
दिसे परदु:ख खरे
शोधू त्यांचा आता त्राता
कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment