Thursday, 7 November 2019

कविता ( विद्यार्थी )

अ.भा.शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ ( राज्य )
विद्यार्थी दिनानिमित्त विशेष राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेसाठी

विद्यार्थी

ज्ञानसागरातील हंस,
आजन्म असावा विद्यार्थी.
नेहमीच असावा जगी,
विद्येचा कायमचा लाभार्थी.

निरक्षीर बुद्धी वापरून,
चांगले वाईट ओळखावे.
जे जे वाईट,कालबाह्य,
ते ते सर्व सोडून टाकावे.

गरज एकाग्रता चित्ताची,
गुरुजनांच्या उपदेशाला.
नको नुसती उपस्थिती,
हवी चालना बुद्धीला.

आदर्श असावेत डोळ्यापुढे,
सर्व देशभक्त अन् सैनिक.
तरच घडेल उद्याच्या,
भारताचा आदर्श नागरिक.

विद्यार्जनच ध्येय असावे,
विद्यार्थी जीवन अनमोल.
नाहीतर होईल सहजच,
बहुमोल जीवन मातीमोल.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , जिल्हा. कोल्हापूर
9881862530

No comments:

Post a Comment