Monday, 4 November 2019

चित्रकाव्य ( मनीमाऊ )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

मनीमाऊ

मनीमाऊ मनीमाऊ,जोडीने,
झोपलात तुम्ही कीती छान.
काळीपांढरी अन् लालपांढरी,
उभे मात्र दोघींचे कान.

उबदार स्पर्श देत एकमेकांना,
ताणून दिली जाम बाकावर.
ठेवून पाय मऊ अंगावर,
समाधान पसरते मनावर.

वाघाची मावशी म्हणती सारे,
रंग तुझा आहेच त्यासारखा.
नाकं दोघींची लाल अन् काळे
लालचुटुक चिंचेसारखा.

मिशा शोभल्या चेहऱ्यावर,
पसरल्या छान चेहऱ्यावर.
जाणिव होते लगेच तुम्हा,
मर्जी तुमची सगळ्यांवर.

पोटभर दुधभात खाऊन,
अशाच झोपा निवांतपणे.
नाहीतर चालू कराल परत,
पायात सर्वांच्या लुडबुडणे.

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment