Wednesday, 13 November 2019

कविता ( गडकिल्ले )

कविता

गडकिल्ले

भारतभूमीची शान गडकिल्ले,
साक्ष देती इतिहासाची.
पाहून गडकिल्ले जीव घाबरा,
आठवण येते त्या युद्धाची.

गडकोट सागरी,प्रकार कीती,
प्रत्येकाची बातच न्यारी.
अभेद्य, अजिंक्य शत्रूपासून,
संदेश मिळतो बिनतारी.

सिंधुदुर्ग शोभे सुंदर,
समुद्रात उभा अभिमानाने.
बोटींचा करुन प्रवास,
भेटायला येती आनंदाने.

मुरुड जंजिरा, विजयदुर्ग,
नाते जुळले समुद्राशी.
कसे असतील बांधले,
तुलना होई विजयाशी.

प्रतापगड,रायगड,राजगड,
पायऱ्या चढून पाहुया.
वारसा जुन्या बांधकामाचा,
असाच जपून ठेवूया.

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment