Friday, 29 November 2019

चित्रकाव्य (झोप )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

झोप

मिळेल का ही असली गादी,
ऊब मायेची सहज देणारी.
श्वानावरती निवांत पहुडली,
निवांत मनीमाऊ काळीपांढरी

श्वान तपकिरी गेले झोपून,
विसरून साऱ्या वैरभावना.
करुन मुटकुळी शरीराची,
नाही मनी कसल्याच यातना.

सख्य म्हणू का म्हणू मैत्री,
दुर्मिळच झाले दृश्य असले.
विश्वास अन् प्रेमासाठी पहा,
मानव जगातील आसुसले.

गाढ झोपली मनीमाऊ,
देते मित्रत्वाचा असा नारा.
श्वानाचा चेहरा पाहून,
वाटते आता थांबावे का जरा? 

पालापाचोळा सर्वत्र पसरला,
चरतो घोडा पहा दूरवर.
नाही कल्पना याची कोणा,
दिसेनाच कोठे तरुवर.

प्रेम राहुदे असेच अभंग,
जातियवादी दुनियेत.
संवेदनशील बनावी सारी,
राहू देत माणुसकीच्या छायेत.

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment