स्पर्धेसाठी
कविता
विषय - एकांत
एकांत वाटे हवाहवासा,
नको कुणाची शिरजोरी.
फसव्या जगात आता फक्त,
शिल्लक राहिलेत माजोरी.
नको कुणाची भाषणबाजी,
नकोच बाष्कळ बडबड.
पाहून पोकळ आश्वासने,
जणू वीज कोसळे कडकड,
दूर डोंगराच्या टोकावर,
वाटे बसावे जाऊन एकांत.
नको गोष्टी संसाराच्या,
झाडाखाली बसावे निवांत
असो परीक्षा जीवनातील,
वा शाळेतील विद्यार्थ्यांची.
सामोरे जाऊ शांतचित्ताने,
रांक लागेल मग यशाची.
एकांतातील रम्य आठवणी,
मोहवून मनाला सुखावते.
आयुष्याच्या सायंकाळी ,
अलवार झुल्यावर झुलवते.
कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment