राज्यस्तरीय मासिक काव्यलेखन स्पर्धेसाठी
कविता
विषय- एक तरी दिवा लाव
ओघळणाऱ्या अश्रूंच्या,
थेंबाना दाखवण्या जगाला.
मानवा एक तरी दिवा लाव,
जागवून तुझ्या मनाला.
अनाथाश्रमातील दु:खी,
बालकांना हसवायला.
मानवा एक तरी दिवा लाव,
ओळखून दुखऱ्या जीवाला.
वृद्धाश्रमातील असंख्य वेदना,
कमी करुन देण्या दिलासा.
मानवा एक तरी दिवा लाव,
सोडून अमानवतेचा उसासा.
समाजातील दांभिकतेविरुद्ध,
जागवण्या जगी मानवता.
मानवा एक तरी दिवा लाव,
दाखवून विविधतेतून एकता.
शांतता, समाधान, न्यायाने,
एकदिलाने जगण्यासाठी.
मानवा एक तरी दिवा लाव,
पेलून हे धनुष्य आपल्यासाठी
कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment