स्पर्धेसाठी
बालकविता
विषय -पुस्तक
आई मला हवे छान पुस्तक,
सुंदर पानांचे रंगीत रंगीत.
पहायचे आहे मला चित्रे ,
समजून घ्यायचे आहे संगीत.
छोटेसेच पण जाड पानांचे,
ज्यात असतील सुंदर पाने.
पानापानातून पहायचे आहे,
जीवनाचे आनंदी गाणे.
प्राणी, पक्षी,झाडे वेली,
नदी,नाले,कोसळणारे पाणी.
सजलेली धरणीमाता अन्,
नटलेली ती निसर्गराणी.
चित्राबरोबर मिळवायचे आहे,
सर्व जगातील सर्व ज्ञान.
शिकून, वाचून होईन मोठी,
मिळवीन मी जगी मान.
पुस्तक माझे आहेत मित्र,
बरे वाईट सांगतात मला.
काय चांगले काय वाईट,
सांगून देतात ज्ञान सर्वाला.
पुस्तक मला प्रिय भारी,
करमत नाही त्यांच्याशिवाय.
नाही झोपत कधीही मी,
पुस्तकांना वाचल्याशिवाय.
कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment