स्पर्धेसाठी
कविता
वारे निवडणूकीचे
वाहू लागले वारे निवडणूकीचे
पडघम चोहिकडे ऐकू आले
घराघरातील आबालवृद्धांना
सर्वजण मान देऊ लागले.
लावण्या वर्णी स्वतःची गोटात
जो तो चपला झिजवू लागला
मीच कीती योग्य उमेदवार
पटवण्यासाठी पुढे आला
कधीच दिसले नाही शेजारी
आता रोजच राबता सुरु झाला
पदरच्या पैशातून प्रत्येकाला
खूष ,समाधानी ठेवू लागला
दादा, आक्का, मामा अन् मामी
सगळेच आपले लागले वाटू
सोडून सगळी लाज शरम
सत्तेसाठी पाय लागले चाटू
कोण आपला कोण परका
ओळखण्याची नामी संधी
आहे एक सर्वांसाठी युक्ती
उतरवण्यास मस्तीची धुंदी
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment