स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
देवाच्या दरबारात
देवाच्या दरबारात घेतली,
क्षणभराची ही विश्रांती.
सारुन सारे दु:ख बाजूला,
मिळवली मनाची शांती.
आयुष्याच्या जोडीदारावर,
आहे भरवसा मनापासून.
पतीराजांच्या मांडीसारखी,
ऊशी नाही मिळणार शोधून.
भंडाऱ्यानेच पिवळी झाली,
साडीचोळी अन् धोतरजोडी.
धरतीवरही सडा पडला,
शोभून दिसली देवाची माडी.
भक्त फिरती भक्तीभावाने,
विसरून प्रपंचाचा विचार.
सोडून सारे दुराचारी वागणे,
ठेवती मनी शुद्ध आचार.
अशीच जोडी पतीपत्नीची,
देवा,सर्वांचीच राहू दे.
नको भांडण,नको तंटा,
सारी माणूसकीने वागू दे.
कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment