स्पर्धेसाठी
हास्यकविता
शिर्षक - कीस्से
काय सांगू एकेक किस्से
हसावं की रडावं नाही कळत
कोण अडाणी कोण सुशिक्षित
कुणीच नाही नियम पाळत
सॅनिटायझरचे चार थेंब
सुरक्षा म्हणून हातावर फवारले
तिर्थ समजून देवाचे त्याने
थोडे प्राशन थोडे शिरी लावले
खिर दिली नवऱ्याला प्रेमाने
बायकोने पातळ करुन प्यायला
पिल्यानंतर फक्त गोडच पाणी?
अहो,विसरला मास्क काढायला
सुट्टी काय मिळाली सक्तीची
कामाचे स्वरुपच पालटले
परंपरागत वाटप कामाचे
एकमेकांवर सहजच उलटले
स्वयंपाक घरात पुरुष मंडळी
आजमाऊ लागली पाककृती
लडिवाळ हसत भगिनींनी
आनंदाने दिली स्विकृती
कपाटातील कपडे बोलू लागले
सर्व ठीकठाक ना मालकाचं?
खूप दिवस जागचे हललो नाही
अस कीती झाकून रहायचं?
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment