Friday, 17 July 2020

कविता, अष्टाक्षरी (आला श्रावण महिना )

राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्यस्पर्धेसाठी

विषय- आला श्रावण महिना 

आला श्रावण महिना 
मोद मनास जाहला 
चला मजेत राहूया
छान निसर्ग पाहिला 

सरी श्रावणाच्या आल्या 
अंग मोहरुन गेले 
शीत तुषाराने तन 
पुलकित पहा झाले

झोका झाडास बांधला 
वर आकाशी झेपावे 
सारे बांधव भगिणी 
लक्ष्य असे उंच जावे 

सण समारंभ खूप 
लगबग सुरु होते 
माहेरवाशीण खुष 
मायबाप भेट घेते 

हर्ष मनास देतात
श्रावणाच्या जलधारा
झोंबतोय शरीराला 
गार धुंद रानवारा 

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment