कविता
पैंजण
पायी रुणझुणले
पैंजण सभामंडपी
ठोके चुकले हृदयाचे
सावरले यद्यपी
छुमछुम वाजताना
छोटी परी आठवे
निरागसता सहजी
लोचनात साठवे
पदरव ओळखीचा
कानात साठवला
पैंजनाचा गोड रव
आपसूकच आठवला
प्रिय सखी माझी पत्नी
चालते ठेक्यात साखळीच्या
नसते जरी जवळी कधीतरी
त्या वाटतात ओळखीच्या
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर
No comments:
Post a Comment