स्पर्धेसाठी
कविता
विषय-- एकाच छत्रीत दोघे
शिर्षक- आठवण पावसाची
बरसला आज बेभान पाऊस,
जाग्या झाल्या गत स्मृती.
एकाच छत्रीत दोघे आपण,
आठवण पावसाची ती विस्मृती.
ती पावसाची रीपरीप होती चालू
आपण दोघे होती एकच छत्री.
नव्हता कुठे आडोसाही तिथे,
मग आली कामी आपली मैत्री.
उघडली छत्री होती एकच,
नव्हती पुरेशी ती दोघांसाठी.
आपसूकच आले जवळ येणे,
आटापिटा न भिजण्यासाठी.
नकळत स्पर्शाने मोहरलो,
नयनी तुझ्या लाली दिसली.
बाहेर पाऊस बरसत होता,
अंगात जणू आग लागली.
थरथरणारे तुझे करकमल,
बाहुवर माझ्या होते स्थिरावले.
हलकेच कर माझे नकळत,
तुझ्या कायेवर होते विसावले.
छत्री होती तरीही भिजलो,
बाहेर पाणी आतून प्रितभाव.
कपडे ओले चिकटले अंगा,
मनी प्रकटली पाहण्याची हाव.
आभार मानावे वाटले पण,
छत्रीचे मानू की पावसाचे?
निवला पाऊस रिता होउन,
मनात दाटले काहूर भावनांचे.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment