स्पर्धेसाठी
कविता
विषय- सुगरणीचा खोपा
झाडाला टांगला ग बाई
सुगरणीचा खोपा हा सुंदर
विणकर कुशल कारागीर
जणू वाटते पवित्र मंदिर
काडी काडी जमवून श्रमाने
आटापिटा बांधण्या आसरा
नाही दमणूक नाही कंटाळा
बांधला काळजीने निवारा
कलाकारीचा नमुना असे
अवर्णनीय वास्तुकला
वादळवाऱ्यातही न तुटता
बिनधास्त वृक्षावर लटकला
घरटे होता तयार मादी येते
बारकाईने निरीक्षण करे
हात फीरवून शेवटचा छान
सुंदर, सुबक,करुन सावरे
झाली पिल्लांची तयारी
सुखावले उबदार सदन
चिवचिवाट ऐकून त्यांचा
वाटे जणू स्नेहाचे आंदन
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment